चुकीला माफी नाही : भाग १

नणंद भावजय चे एक सुंदर नाते.
आज ना आरू तुझा मामा आपल्याला न्यायला येणार आहे. मग मस्तपैकी आपण मामाकडे जायचं हा. चला चला उठा लवकर. अस म्हणतच साक्षी ने लेकीला उठवलं आणि फ्रेश व्हायला नेल. तिला दुधाचा कप देत असतानाच सचिन आणि सासूला नाश्ता पण दिला. 
अग साक्षी, तू तुझ आवर अनिकेत कधी पण पोहोचेल इकडे, परत उशीर नको व्हायला. सचिनच्या ह्या वाक्यावर साक्षी ची सासू लगेच बोलली, आजच जायचं होत का? रश्मी येणार होती इकडे चार दिवस रहायला. 
रश्मी?? अग पण गेल्याच तर आठवड्यात चांगले आठ दिवस राहून गेली, काय चाललय काय तीच? सचिन रागातच बोलला.  अरे ते काय तीच तिकडे मन रमत नाही तर येते. ती राहील. तू जा हो साक्षी. तुला पण हल्ली जाता नाही आल ना माहेरी. अस लाडी गोडी ने बोलत सासू ने विषय बदलला.
साक्षी काहीच बोलली नाही तिने किचन मधले सर्व आवरून स्वतःच्या बेडरूम मध्ये गेली. आरु ची तयारी करून, स्वतःची तयारी करू लागली.
साक्षी एक काम कर, बेडरूम ची एक चावी तू घेवून जा, आणि मी एक माझ्या सोबत नेतो.
अरे सचिन, अस नको उगाच त्यांना काय वाटेल? साक्षी च्या बोलण्याने सचिन चिडला. जे वाटायचं ते वाटू दे. पण माझ्या संसारात त्यांची लुडबुड नको आहे मला.
तुला सांगतो तसे कर. कपाट पण सर्व लॉक कर. अजून एक, आपण एकत्रच निघू. म्हणजे आई तुझ्या मागे भूणभूण लावणार नाही. 

साक्षी अनिकेत आला ग, सासू च्या आवाजाने साक्षी सामान घेवून बाहेर आली. अनिकेतला पाणी देत, काही खाणार का विचारत होती. पण तेव्हढ्यात, अरे मेव्हणे साहेब आता तुझे पोहे खात नाही बसणार तुम्हाला लेट होईल, वाटेत खा. अस म्हणत सचिन आरुला घेवून बाहेर आला. साक्षी आणि अनिकेतला लगेच गाडीत बसवायला लागला. आरु च्या डोक्यावर हात फिरवत तिला साक्षी कडे देत, नीट जा म्हणाला. आई येतो आम्ही, अस म्हणत साक्षी ने गाडीतून सासूचा निरोप घेतला. हा हा म्हणता गाडी निघाली पण. 
सचिन स्वतःचा टिफीन घ्यायला आत गेला. तेव्हा त्याची आई त्याला बडबड करू लागली. सचिन, हे काय? सूनबाई ला एवढ्या घाईघाईत पाठवलं.अशाने शेफारून जाईल ती. आई," ती माझी बायको आहे, आणि तिच्या सोबत माझी मुलगी आहे. त्यांनी दिवसाढवळ्या तिच्या माहेरी पोहोचावं असच मला वाटणार ना?" चल मी निघतो म्हणत सचिन निघाला सुद्धा.