Login

चूसकी चटपटीत कैरी कांडी

कच्च्या कैरीचे वाळवण
चूसकी कैरी कॅंडी


कैरी.. कच्ची कैरी, नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना! मलाही आवडते. मस्त ताज्या ताज्या हिरव्यागार कैरीला मीठ मिरची पावडर लावून खायला. पण आता तसं न करता थोडं युनिक स्टाईलने आपण कैरी साठवून सुद्धा ठेवू शकतो आणि त्याचा वर्षभर आस्वाद घेऊ शकतो.

चुसकी आम कॅंडी

साहित्य - कैरी एक किलो कीलो, पिठी साखर दोन ते चार चमचे, जिरे पावडर एक चमचा आणि मीठ चवीनुसार.


कृती -
१) कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची.

२) त्याच कैरीचे त्याचे पातळ काप करून घ्यायचे.

३) त्यात मीठ, जिरे पावडर आणि पिठी साखर आपल्या आवडीनुसार घालायची.

४) सगळे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे.

५) आता हे मिश्रण रात्रभर तसेच ठेवायचे.

६) दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कैरीचे काप एक एक करून ताटात वाळत घालायचे.

७) असेच चार पाच दिवस कडक उन्हात वाळवायचे म्हणजे चांगले कडक वाळतील.

८) व्यवस्थित वाळल्यावर ते कोरड्या बरणीत भरून ठेवायचे.

तयार आहे आपली कच्ची कैरी चुसकी कॅंडी. चवीला खूप छान लागते ही, लहान मोठे सगळ्यांनाच ही आवडते. जेवण झाल्यावर पण आपण ही खाऊ शकता.


🎭 Series Post

View all