नमस्कार, मी निशिगंधा. माझे नाव ऋतुजा आहे व मी 'निशिगंधा' या टोपणनावाने ईरा व्यासपीठावर साहित्य प्रकाशित करत होते. बऱ्याच दिवसांपूर्वी मी लिखाण थांबवल्याचे आपल्या निदर्शनास आले असेल. आपली जी गैरसोय झाली त्याबद्दल मनःपूर्वक क्षमा मागते. मी आधी माझ्या आईच्या इमेलवरून लिखाण करत होते आणि आता स्वतःच्या ईमेलवर हॅन्डल करत आहे. इराला माझ्या आईचा ईमेल ऍड आहे. जो बदलण्याची प्रोसेस मला अजूनही माहित नाही. मी रंग प्रेमाचा, राजनंदिनी आणि काही लघुकथा ईरा व्यासपीठावर प्रकाशित केल्या आहेत. काही कारणास्तव मी या व्यासपीठावर लिखाण पूर्ण करू शकत नाही. कारण त्याच कथा मी प्रतिलिपि या व्यासपीठावर पूर्ण केल्या आहेत. कोणतीही कथा आधी इरावर पूर्ण करायची असा नियम असल्याने मला त्या पुन्हा इथे टाकता येणार नाहीत. त्यामुळे माझ्या या व्यासपीठावरील सर्व कथा आहेत तितक्याच असतील.
मी ऋतुजा "निशिगंधा" या नावाने प्रतिलिपि व्यासपीठावर लिखाण करत असून, माझ्या कथा आपण आता तिथे वाचू शकता. ईरा व्यासपीठ अतिशय सुंदर व्यासपीठ आहे. मात्र कथा डिलीट करून इथे पोस्ट करणे शक्य नसल्याने मला कथा अर्धवट सोडाव्या लागत आहेत. भविष्यात पुन्हा लेखनाला हवा तितका वेळ उपलब्ध होऊ लागला, तर मी ईरावर लिहिण्याचा विचार नक्की करेन. प्रतिलिपिवर माझ्या कथा या मीच प्रकाशित केल्या आहेत याची खात्री व्हावी म्हणून ही पोस्ट प्रकाशित करत आहे. इरावरील अनेक कथा काहीजण थेट स्वतःची कथा म्हणून वापरत आहेत. माझ्या बाबतीत तसा काही गैरसमज होऊ नये म्हणून मी माझ्या ईरा अकाउंटवरून माझ्या प्रतिलिपि अकाउंटबद्दलची माहिती इथे अधोरेखित करत आहे. माझ्या कथा पूर्ण स्वरूपात प्रतिलिपीवर उपलब्ध आहेत.

प्रतिलिपि प्रोफाइलचे नाव: ऋतुजा "निशिगंधा"
प्रोफाइल लिंक : "ऋतुजा ❤️ "निशिगंधा..✒️"" ला प्रतिलिपि वर फॉलो करा,
प्रोफाइल लिंक : "ऋतुजा ❤️ "निशिगंधा..✒️"" ला प्रतिलिपि वर फॉलो करा,
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
कथा अपूर्ण असल्याने रोष नसावा. इरावर प्रकाशित भाग सात दिवसांनी इतर प्लॅटफॉर्म्सवर प्रकाशित करायचा असतो या नियमाबद्दल माझा जरा गोंधळ झाला होता. मी काही भाग आधी प्रतिलिपीवर प्रकाशित केले. आता ते डिलीट करणं शक्य नाही. वाचकांना हे स्पष्ट करणं मला आवश्यक वाटलं. दोन्ही प्लॅटफॉर्म्सचे काही नियम आहेत. एका प्लॅटफॉर्मवर कथा पूर्ण केल्याने ईरावर ती कथा प्रकाशित करणे शक्य होणार नाही. क्षमस्व आणि लेखनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ईरा व्यासपीठाचे मनःपूर्वक आभार! मी पुन्हा कधीतरी नक्कीच लिहीन.
-ऋतुजा (निशिगंधा)
१०-०२-२०२६
१०-०२-२०२६
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा