Login

कोकोनट राईस आणि टोमॅटो सार

कोकोनट राईस आणि टोमॅटो सार
आपण नेहमी गुळ,खोबरं,ड्राय फ्रूट वेलची पावडर आणि तांदूळ यांनी बनवलेला गोड चवीचा भात बनवतो. आज मी तुमच्या सोबत एक तिखट नारळी भाताची रेसिपी शेअर करत आहे.

नारळी भात

साहित्य -
२ वाट्या शिजवलेला बासमती तांदुळाचा भात
१ वाटी खिसलेल ओल खोबर
१ चमचा हरभरा डाळ
१/२ चमचा उडीद डाळ
१ हिरवी मिरची चिर दिलेली
सात आठ कढी पत्याची पान
१मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरलेला
१ चमचा तेल
पाच सहा काजूच्या पाकळ्या
१ सुकी लाल मिरची
लिंबाचा रस
१/४ चमचा साजूक तूप 
चवी नुसार मीठ
सजावटी साठी कोथिंबीर

कृती -

तांदुळाचा मोकळा भात शिजवून घ्या.

एका कढई मध्ये एक चमचा तेल घाला. त्यात काजूच्या पाकळ्या तळून घ्या. त्या बाजुला ठेवून दया.

तेलात जिर मोहोरी कढी पत्याची पान घाला. फोडणी करून घ्या.नंतर त्यात उडीद डाळ आणि हरभरा डाळ घालून परतून घ्यावा. .त्यात सुक्या लाल मिरच्या दोन तूकडे करून घाला.

त्यात पातळ चिरलेला कांदा ,आलं घालून परतून घ्या. कांद्याचा कच्चे पणा जाउ दया.स्लीट केलेली हिरवी मिरची घाला.

त्यात मोकळा शिजवलेला भात घाला. सगळं परतून घ्या. चावी नुसार मीठ घाला.लिंबाचा रस घालून सगळं मिक्स करून घ्या. थोडी कोथिंबीर घाला. थोडी सजावटी साठी बाजुला ठेवून घ्या.
तळलेले काजू घाला.

सर्वात शेवटी किसलेल ओल खोबर घाला. खोबर घालुन थोडा परतून घ्या. सर्वात शेवटी साजूक तूप घाला.छान स्वाद येतो.जास्त वेळ परतू नका.
गरम गरम सर्व्ह करा.

टोमॅटो सार

साहित्य -
३ मध्यम आकाराचें लाल लाल टोमॅटो
१ छोटा आकाराचा कांदा
१/२ इच आलं
१ चमचा साखर
चवी नुसार लाल तिखट
मीठ
फोडणी साठी तूप आणि जिर हिंग हळद कढीपत्ता
सजावटी साठी कोथिंबीर

कृती -

टोमॅटो , कांदा आणि आलं कुकर मध्ये शिजवून घ्या. थंड झाल्यावर मिक्सर मध्ये प्युरी करून घ्या.

हे सगळं मिश्रण गाळून घ्या. त्यात चवीनुसार तिखट मीठ साखर घालून मिश्रण ढवळून घ्या. पातळ हवं असल्यास थोड पाणी घाला.हे सगळ उकळू द्या.

कढल्यात फोडणी करून घ्या. एक चमचा तुपात जिर हिंग कढीपत्ता यांची चुरचुरीत फोडणी करा. ती या सार वर घाला. जास्त उकळवू नका.

कधी तरी वेगळ्या चवीचा तिखट नारळी भात बनवून बघा. याच्या सोबत चवीला टोमॅटोचे सार आणि तळलेला पापड मस्त मेनू होईल.