पडसे पसरले
रामा योगिंद्र रावच्या चोरीच्या आजाराचे ऐकून आधीच काळजीत पडला होता आणि त्याने तसे मंत्र्यांना बोलूनही दाखवले होते.
“आम्ही तरी काय करू शकतो पंडित रामा? ही पाहुण्यांची यादी स्वतः महाराजांनी काढली आहे.” मंत्री म्हणाले.
इतक्यात तो माणूस समोर आला. मंत्र्यांनी त्याला हार घातला आणि स्वागत केले. तो मंत्र्यांच्या गळ्यात असलेल्या मोठ्या सोन्याच्या हाराकडे पाहत होता आणि त्याने तो हार हातात धरला होता. त्याचे लक्ष नाही हे पाहून मंत्र्यांनी ओळखले आणि हार त्याच्या हातातून काढून बोलू लागले; “विजयनगरमध्ये तुमचे मनापासून स्वागत.”
त्याने तो भानावर आला आणि धन्यवाद म्हणाला. त्याचे लक्ष आचार्यकडे गेले.
“महान महागुरू आचार्य तथाचार्य! मी तुमचा मोठा भक्त आहे. मला आशीर्वाद द्या.” असे म्हणून तो वाकला.
आचार्य अगदी ऐटीत उभा राहून आपला केवढा रुबाब आणि प्रसिद्धी आहे हे दाखवत होता.
“आयुष्यमान भव. विजयी भव.” आचार्यने त्याला आशीर्वाद दिला आणि तो उभा राहिला.
“पाहुण्यांना त्यांच्या कक्षात घेऊन जा.” मंत्री म्हणाले.
“आणि यांची विशेष काळजी घ्या. आमचे खास आणि लाकडे पाहुणे आहेत हे.” आचार्य म्हणाला आणि त्याला घेऊन जाण्यात आले.
तेवढ्यात आचार्यचे लक्ष त्याच्या पायाकडे गेले. त्याच्या पायातील एक पादुका (चप्पल) गायब होती.
“आमची एक पादुका?” आचार्य आश्चर्याने म्हणाला.
सगळेच त्याच्याकडे बघू लागले.
“आत्ता तर होती. ते महाशय नमस्कार करायला वाकले तेव्हाही होती. याचा अर्थ!?” आचार्य रागात म्हणाला.
तो कसाबसा हळूहळू धावत थोडा पुढे गेला.
“आचार्यवर! सापडेल तुमची पादुका. मंत्री जी म्हणाले ना ते काही पेशाने चोर नाहीयेत फक्त आजारामुळे असे वागतात.” रामा म्हणाला.
आचार्य तोंड फुगवून उभा होता. इतक्यात तिसरी पालखी आली. त्या पालखीतून ती विदेशी महिला उतरत होती.
“गुरुजी! आल्या खास पाहुण्या! एकदा बघा तरी.” मणी म्हणाला.
पण त्याचं तिथे लक्ष नव्हतं. धनी आणि मणीने त्याला सांगितल्यावर त्याने बघितलं. गोरीपान आणि डोक्यावर टोपी घालून आलेली ती महिला पाहून आचार्य पळतच पुढे हार घेण्यासाठी गेला पण त्या आधीच पटकन मंत्र्यांनी तो उचलला आणि ते तिथे उभे राहिले.
“किती सुंदर आहे ही विदेशी महिला रामा.” बंधू म्हणाली.
“हम्म. तिच्या स्वागतासाठी आधीच खूप लोक रांगेत उभे आहेत बंधू.” रामा आचार्यला उद्देशून म्हणाला.
मंत्र्यांनी तिला हार घातला.
“राजा कृष्णदेवराय यांच्या विजयनगरमध्ये तुमचे स्वागत आहे.” महामंत्री म्हणाले.
तिने गाऊन दोन हातात धरून गुडघ्यात हलकेच वाकून अभिवादन स्वीकारले.
महामंत्री पुढे बोलू लागले; “आम्ही इथले महामंत्री आहोत. तुमचे इथे हार्दिक स्वागत करत आहोत.” ते हात जोडून म्हणाले.
“थँक्यू अँड हा हँडसम कोण आहे? इतका चार्मिंग, गूड लूकिंग अँड अट्रॅक्टिव? आम्हाला माहीत नव्हते तुमच्या कंट्रीत एवढे ग्लॉसी अँड अट्रॅक्टिव लोक असतात. काय नाव आहे यांचे?” तिने विचारलं.
तिची टोपी तिच्या डोळ्यावर आलेली असल्याने ते नक्की कोणाकडे बघतेय हे कळत नव्हतं. आचार्यला वाटले ती त्याच्याबद्दल बोलतेय.
“आमच्या प्रशंसेसाठी धन्यवाद. हा तुमचा मोठेपणा आहे. आम्हाला प्रेमाने तथाचार्य म्हणतात पण तुम्ही आम्हाला तत्थू म्हणू शकता.” आचार्य म्हणाला.
रामा आणि मंत्री त्याला हळूच हसत होते. तिने तिची टोपी थोडी वर केली आणि ती रामाकडे पाहू लागली.
“आम्ही यांच्याबद्दल बोलतोय.” ती म्हणाली.
ती रामाकडे वळली आणि तिने हात पुढे केला.
“हाय! आय एम क्लारा आणि तुम्ही?” तिने विचारलं.
रामाने हात जोडले आणि बोलू लागला; “सेवकाला पंडित रामाकृष्णा म्हणतात देवी.”
“देवी नाही! क्लारा.” ती म्हणाली.
“क्लारा. क्लारा. परंतु कसं आहे आमच्या देशात प्रत्येक स्त्रीला देवीचे रूप मानले जाते आणि तुम्ही तर स्त्रीच आहात म्हणून तुम्ही आमच्यासाठी देवीच आहात. त्यात तुम्ही तर संगीताच्या देवी आहात. मग तुम्हाला देवी शिवाय अजून काय म्हणणार.” रामा म्हणाला.
“इंप्रेस! तुमचे बोलणे छान वाटले. तुमची स्माईल खूप छान आहे.” ती म्हणाली.
“धन्यवाद देवी.” रामा म्हणाला.
“बलारा जी!” आचार्य बोलत होता पण त्याच्या लक्षात आले आपण चुकीचे नाव घेतले आहे म्हणून त्याने स्वतःशीच नाही अशी मान हलवली आणि पुढे बोलू लागला; “कलारा जी! या तुम्हाला तुमच्या कक्षापर्यंत सोडतो.”
“मणीलक्ष्मी! हे सामान याला द्या. सामान उचलून आमच्या मागे ये.” ती म्हणाली.
“अरे नाही नाही देवी. हे सेवक नाहीयेत. हे आमचे आचार्य आहेत. कुलगुरू, राजगुरू आहेत.” रामा म्हणाला.
तिने एकदा त्याच्याकडे खालून वर पाहिले आणि जवळजवळ ओरडली; “व्हॉट?! सिरीयसली?”
आणि रामाकडे बघून निघून गेली.
“बघितलं किती निर्लज्ज आहे? याच्यामुळे आपलीही काडीची किंमत राहत नाही.” धनी कुजबुजला.
“एक नंबरचा निर्लज्ज आणि कपटी आहे.” मणी म्हणाला.
तिला जाताना बघून आचार्यचा चेहराच पडला. रामा आणि मंत्री त्याच्याकडे बघत होते. त्याने कसेबसे चेहऱ्यावर हसू आणले.
“आम्हाला काहीतरी काम आठवले आहे आम्ही निघतो. आणि हो आता राहिलेल्या पाहुण्यांचे स्वागत तुम्ही करा. आमच्यावतीनेही अभिवादन करा.” आचार्य म्हणाला.
दोघांनी माना हलवल्या आणि आचार्य एकाच पायात पादुका असल्याने लंगडत तिथून गेला. अजून एक पालखी आली आणि त्यातून अजून एक सुंदर महिला उतरली.
“शास्त्रीय संगीताचा गौरव, सुरांचा अतुल्य खजिना, गायकांची संपूर्ण पिढी सुर लावण्याआधी यांचेच स्मरण करतात.” महामंत्री म्हणाले.
“धन्य झाली विजयनगरची धरती. तुमच्यासारख्या महान कलाकाराचे चरण इथे लागले. संगीताच्या महान देवीला शत शत नमन. आशा आहे प्रवासात काही त्रास झाला नसेल.” रामा हात जोडून म्हणाला.
“प्रवास तर फक्त निमित्तमात्र आहे महोदय. खरे सुख तर लक्ष्य आहे. लक्ष्य आहे तर प्रवासाची किंमत आहे. लक्ष्य नाही तर सगळे व्यर्थ आहे.” ती म्हणाली.
“बरोबर. बरोबर देवी. तुम्ही एकदम बरोबर बोललात.” रामा म्हणाला.
“तुम्ही आमचे बोलणे समजून घेतले आहे की असंच बोलताय?” तिने विचारलं.
“जो एवढी महत्त्वाची आणि खोल अर्थाची गोष्ट समजणार नाही त्याचे तर नुकसानच आहे. तुम्ही एकदम बरोबर बोललात देवी. लक्ष्यहिन प्रवास हा वाळवंटातील मृत कृष्णा नदीच्या शोधासारखा असतो जिचा शोध सगळ्यांना असतो पण मिळत कोणालाच नाही. तर लक्ष्य ठेवून केलेला प्रवास हा समुद्रातील मोत्या सारखा आहे. जो शोधायला कठीण आहे पण मिळतोच.” रामा म्हणाला.
त्याच्या बोलण्याने ती खुश झाली.
“तू कोण आहेस? अशी एवढी प्रगल्भ विचारशक्ती याआधी कधी पाहिली नाही. नाव काय आहे तुझे?” तिने विचारलं.
“जी! रामाकृष्णा.” तो म्हणाला.
“तुला भेटून खूप छान वाटले रामाकृष्णा!” ती म्हणाली.
रामाने हात जोडून “सौभाग्य!” असे म्हणले.
“तुम्ही प्रवासातून आला आहात. थोडी विश्रांती घ्या.” महामंत्री म्हणाले आणि तीही तिच्या कक्षात जायला निघाली.
“त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता?” मंत्र्यांनी रामाला विचारलं.
“हेच की त्यांच्यासाठी प्रवास नाही तर इथे येणे महत्त्वाचे आहे.” रामा म्हणाला.
“मग सरळ सरळ का नाही सांगितलं?” मंत्र्यांनी विचारलं.
“काहीकाही जीवजंतू सरळ का नाही चालत?” रामाने विचारलं.
“हा! त्यांची प्रवृत्ती.” मंत्री म्हणाले आणि त्यांना समजायचे ते समजले.
“मंत्रीवर! तुमच्या सांगण्यानुसार पाच प्रमुख पाहुणे येणार होते. चार तर आले आता पाचवे आलेले नाहीयेत. ते कधीपर्यंत येणार?” रामाने विचारलं.
“अरे आपल्या पाचव्या पाहुण्याचे नाव सोमनाथ आहे. उच्च स्तरीय गायक आहेत आणि चांगले वादक देखील आहेत. यायला तर हवेत आता.” मंत्री म्हणाले.
इतक्यात एक सेवक तिथे आला. त्याने कंबरेत वाकून त्यांना नमस्कार केला आणि बोलू लागला; “क्षमा करा मंत्रीवर पण सोमनाथ जी येणार नाहीत.”
“नाही येणार? का नाही येणार?” मंत्र्यांनी गोंधळून विचारलं.
“त्यांचं म्हणणं आहे त्यांना श्रीमंत माणसांचे शाही चोचले आवडत नाहीत. त्यांच्या दृष्टीने हा फक्त दिखावा आहे आणि ज्याचा भावनिक स्तरावर काहीच अर्थ नाही म्हणून त्यांनी सांगितले की ते सरळ कार्यक्रमाच्या दिवशी येतील आणि सरळ स्पर्धेत सहभागी होतील.” तो म्हणाला आणि पुन्हा नमस्कार करून गेला.
“आता ही काय गोष्ट झाली!” मंत्री म्हणाले.
“काही नाही मंत्रीवर. कलाकार असतातच भावूक, संवेदनशील. ठीक आहे जर कलाकार सोमनाथ इथे येऊ इच्छित नाहीत तर आपण त्यांना भेटायला जाऊ. भेटणं तर गरजेचं आहे. कारण चंद्रमणीच्या सुरक्षेसाठी या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची पारख करून घेणे गरजेचे आहे.” रामा म्हणाला.
बिचारा शिंकत होता तरीही त्याला भेटायला गेला.
***************************
रामा त्याला भेटायला आला. तो एका मोठ्या झाडाच्या पारावर बसला होता. जुनाट कपडे आणि गरीब असाच त्याचा अवतार होता.
***************************
रामा त्याला भेटायला आला. तो एका मोठ्या झाडाच्या पारावर बसला होता. जुनाट कपडे आणि गरीब असाच त्याचा अवतार होता.
“मला श्रीमंत माणसांबद्दल काही त्रास नाहीये. त्रास हाच आहे की ते गाजावाजा करतात. ठीक आहे देवाने त्यांना अमाप दिले आहे पण त्याचा असा गाजावाजा करणे योग्य नाही.” तो चिडून म्हणाला.
“बरोबर आहे तुमचे पण माझ्यासोबत चला. आपण तुम्हाला नवीन वस्त्र घेऊया. अश्या सर्वोत्कृष्ट कलाकारावर असे फाटके, मळके कपडे चांगले नाही वाटत.” रामा म्हणाला.
“बघितलं? तूही तसाच निघालास ना? श्रीमंतीचा माज असणारा आणि लोकांची पारख त्यांच्या राहणीनुसार करणारा.” तो म्हणाला.
“असे काही नाहीये. क्षमा करा मीही काही श्रीमंत नाहीये आणि तुम्ही असे श्रीमंत लोकांचा दुस्वास करून तुम्ही तर श्रीमंत होणार नाही ना? उलट मेहनत आणि कष्ट घेऊन त्यांच्याही पेक्षा अधिक श्रीमंत होणे यालाच पुरुषार्थ म्हणतात ना?” रामा म्हणाला.
“या वेद आणि शास्त्रातल्या गोष्टी आहेत बंधूवर! याचा खऱ्या आयुष्याशी काहीच संबंध नाही.” तो म्हणाला.
“ठीक आहे मग नका येऊ तुम्ही माझ्यासोबत महालात आणि हे सिद्ध करून दाखवा गरीब लोक नेहमी गरबीच राहणार कारण ते समोर येऊन, मेहनत, कष्ट करून कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. मी येतो.” रामा म्हणाला आणि तो वळला.
“थांब! कधी जायचं नवीन वस्त्रे आणायला? महालात असे येऊन चालणार नाही.” तो म्हणाला.
रामा खुश झाला. सगळं काही नीट झालं आणि संध्याकाळी विशेष पाहुण्यांना भेटण्यासाठी खास दरबार भरला होता. आत्ता तर रामाला सकाळ पेक्षा अजूनच जास्त शिंका येत होत्या आणि त्याचे नाक देखील लाल झाले होते.
“सर्व पाहुण्यांचे विजयनगरमध्ये मनापासून स्वागत.” राजा म्हणाला.
रामाने शिंकत शिंकत का होईना पण लगेचच सगळ्यांची ओळख करून दिली.
“आत्ता सगळ्यांची ओळख आणि प्रतिभा पाहून आम्हाला राहवत नाहीये. आत्ता जर काही खास ऐकायला मिळाले तर..” राजा म्हणाला.
एक एक करून सगळे गाणार होते पण जे समोर येईल त्याला शिंक येतच होती आणि सूरही लागत नव्हते. शेवटी क्लाराची पाळी आली.
“या आपल्या विदेशी कलाकार कलारा खूप छान गातात. काय ते सुर, काय ते गायन एकदम अद्भुत महाराज!” आचार्य तिची स्तुती करताना थकत नव्हता.
“बघितलं म्हातारा कसा करतोय?” धनी कुजबुजला.
“नाहीतर काय! नुसता लाळघोटेपणा करता येतो याला.” मणी म्हणाला.
“आचार्य! आधी त्यांना गायन सादर तरी करू द्या मग प्रशंसा करा.” रामा म्हणाला.
तिने गायला सुरुवात केली पण तिलाही शिंका येऊ लागल्या.
“हे काय आहे सर्व? सगळ्याच कलाकारांना सर्दी, पडसे झाले आहे. आता कार्यक्रमाचे काय?” राजाने चिंतेने विचारलं.
“या सगळ्याचे मूळ हे पंडित रामाकृष्णा आहेत महाराज! सकाळपासून नुसते शिंकत बसले आहेत. त्यांना आम्ही म्हणलं होतं तुम्ही आराम करा आम्ही करू स्वागत पाहुण्यांचे. पण नाही! यांनाच करायचं होतं ना. आता हे महाशय चंद्रमणीची सुरक्षा देखील अशीच करणार आहेत का? नाक पुसत पुसत? सगळेच अवघड दिसतेय.” आचार्य म्हणाला.
“महाराज! अजून उत्सवाला वेळ आहे तोवर होईल सगळं ठीक आणि वचन दिलं आहे महाराज मी. आता जीव गेला तरीही चालेल पण विजयनगरच्या इभ्रतीवर आच देखील येऊ देणार नाही.” रामा म्हणाला.
क्रमशः….
Credit:- Sony SAB Tenali Rama serial.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा