Login

रंग प्रेमाचा! - ०१

प्रेमाची कथा!
निशा आणि आदित्य इअरपोर्टवर उभे होते. निशाची सगळी फॅमिली एअरपोर्टवर आलेली होती. ते प्रायव्हेट एअरपोर्ट होतं. आदित्य हा अब्जाधीश होता. त्याच्याकडे स्वतःचं विमान होतं. एक एअरलाईन्सही त्याने विकत घेतलेली होती. ती पाहत होता की निशा आपल्या आईच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडत होती.

'काय मुलगी आहे ही! तासभर झाला हिचं रडून संपतच नाही. कोर्ट मॅरेज केलं आहे आम्ही. तरी हिच्या फॅमिलीमधून निदान पन्नास लोक तरी तिथे उपस्थित होते. मी माझ्या एकही फॅमिली मेम्बरला सोबत आणलं नाही. कारण त्यांना एवढा प्रवास आणि दगदग झेपणारच नाही. त्यात हिला असं रडताना पाहिलं तर माझी मॉम इतकी स्वीट आहे की बोलेल हिला इथेच ठेवून जावं. काय बोलू मी ह्या मुलीला?'

दुसरीकडे निशाचे हुंदके तर थांबतच नव्हते.

'का? का लावून दिलं माझं लग्न? आय ऍग्री की माझे काही खास ड्रीम्स नव्हते माझ्या शिक्षणाला घेऊन. पण मला माझ्याच देशात एखादा साधासा मुलगा मिळाला नसता का? हा राजकुमार तर बघून दिला आहे. पण कधी कधी मला ह्याच्याकडून डेव्हिल प्रिन्सवाली वाईब येते. किती पटकन रागावतो. मला नाही आवडत. हे अरेंज मॅरेज असं का असतं? अगदीच अनोळखी कोणासोबत तरी आपल्याला पाठवून द्यायला आपली फॅमिली का तयार होते? नो निशा. आताही बघ कसा मारक्या बैलासारखा बघतोय. मम्मा मला नाही जायचं गं!'

ती आईला अजूनच बिलगली.

"मिस्टर प्रधान, मला अमेरिकेत जाऊन पुढे मीटिंग्ज आहेत शेड्युलमध्ये. तिचं झालं असेल तर प्लिज आम्हाला निघायला परवानगी द्या."

आदित्य तिच्या पप्पांना म्हणाला. त्यांना त्याच्या स्वरातलं गांभीर्य आणि उशीर झाल्यामुळे डोकावणारा राग जाणवला.

"निशा बेटा, डोळे पूस बरं आता. एवढं रडून सुकून जाशील बेटा. चेहरा बघ कसा झाला आहे. आदित्यरावांना पुढे मीटिंग्ज आहेत. त्यांचा असा टाइम वेस्ट करून नाही चालायचं. शिवाय तुला घराकडेही लक्ष द्यावं लागेल ना? चल आता. ते पुन्हा भारतात येतील तेव्हा तुलाही घेऊन येतील हं. नाहीतरी व्हिडीओ कॉल आहेच.”

तिचे पप्पा तिला समजावून त्याच्या बाजूला घेऊन आले. ती एवढी रडली होती की आता थरथर कापू लागली होती. त्याला ते जाणवलं. त्याने आपला हात पुढे केला. तिने मात्र भीतीमुळे त्याचा हात धरलाच नाही.

'हे काय वागणं आहे? मान्य आहे की हे लव्ह मॅरेज नाही. पण मी ऑफिशियल नवरा आहे तिचा. आयुष्यभर काय बेबीसारखं सांभाळायचं नाही ना हिला?'

त्याने स्वतःहूनच पुढे होत तिचा हात पकडला. त्याच्या त्या कृतीने ती अजूनच दचकली.

'बघितलं! डेव्हिल प्रिन्स आहे हा! मी हात पकडला नाही तर स्वतःहून पकडून घेतला. माझं काय होणार आहे देव जाणे! त्यात अजून मोठी मोहीमच फत्ते करायची आहे मला!'

"आदित्यराव, तुम्ही भारतात याल तेव्हा निशूलाही घेऊन या हं. तेवढीच आमची भेट घडेल."

निशाची आई पाणावल्या डोळ्यांनी म्हणाली.

"हो मिसेस प्रधान. निशा, चल निघूया आता."

त्याला अधिक बोलत बसण्यात इंटरेस्ट नव्हता. फक्त आईच्या भावना धुडकारून लावू नये म्हणून त्याने निशाच्या आईला नीट उत्तर दिलं होतं. निशा त्याच्यामागोमाग चालू लागली होती. शेवटपर्यंत ती मागे मागे वळून आपल्या सगळ्या फॅमिलीकडे पाहत होती. निशांत तर रडून रडून लालेलाल झालेला दिसत होता. निशांत म्हणजे तिच्याहून लहान असलेला तिचा भाऊ. दीदीला कोण राक्षस घेऊन जातो आहे अशी त्याची रिएक्शन होती.

       हळूहळू तिचा देश मागे पडत चालला होता. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो मेल्स चेक करत होता. लग्नासाठी त्याने पाच दिवस सुट्टी टाकलेली आणि आजचा सहावा दिवस. जवळजवळ एक आठवडा ह्या लग्नाच्या गडबडीत गेल्यामुळे आपल्याला किती ओव्हरवर्क करावं लागणार आहे ह्याच कॅलक्यूलेशन करत होता तो! तो आपल्याकडे लक्ष देत नाही म्हटल्यावर तिने मस्त हिंदी मूव्ही लावला आणि ती पाहत बसली. त्याचं लक्ष होतं तिच्याकडे. पण स्वतःहून काय बोलावं समजत नव्हतं. ती मूव्ही बघण्यात रमली आहे म्हटल्यावर त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि डोळे मिटले. अजून बराच लांबचा प्रवास होता. तोवर तो छान झोप काढून घेणार होता. ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती.

'किती हॅन्डसम आहे हा! प्रिन्स आहे पण डेव्हिल प्रिन्स आहे. खडूस आत्मा! मला तर ह्याच्या घरी जाण्याची भीती वाटतेय. असं सगळं असताना माझी पूर्ण फॅमिली माझ्याविरुद्ध कशी गेली? काय एवढी गरज होती की त्यांनी ह्याच्याशी माझं लग्न लावलं. मला कोणी मुलगा मिळणार नव्हता का? देवा! मलाच माहित नाही आता माझं काय होईल?'

मूव्ही बघता बघता थोड्या वेळाने तिलाही झोप लागली होती.

**************
क्रमश:
0

🎭 Series Post

View all