Login

रंग प्रेमाचा! - ०२

It's A Love Story!
मागील भागात..

आदित्य आणि निशा यांचं लग्न झालं आहे आणि ते अमेरिकेला निघाले आहेत.

आता पुढे..

       निशाला जाणवलं की आपल्याला कोणीतरी हलवत आहे. तसे तिने किलकीले करत डोळे उघडले. तिने पाहिलं की शेजारी बसलेला आदित्य तिला उठवत होता.

'झोपू तरी दे ना शांतपणे. काय माणूस आहे हा!'

नाईलाजाने तिने डोळे उघडले आणि त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

"असं काय पाहत आहेस? अर्ध्या तासात फ्लाईट लँड करणार आहे. आपल्याला खाली उतरायचं आहे. सो जागी रहा."

तिने हळूच मान डोलावली. तिला दिसलं नाही. मात्र त्याच्या ओठांच्या कोपऱ्यावर हलकं हसू उमटलं होतं. खूप निरागस आहे ती, फार सांभाळावं लागणार हे मनात त्याने स्वतःला पक्कं बजावलं होतं. पण तिच्याशी बोलावं असं वाटत नव्हतं. काय बोलणार? बिजनेसच्या गप्पा तर मारता येणार नव्हत्या आणि फॅमिलीबद्दल तर.. छे! ते तर मोठं दिव्यच होतं. त्याने पाहिलं की ती अजूनही डोळे चोळत होती. तिची झोप पूर्ण झालेली नव्हती. अर्ध्या तासाने फ्लाईट लँड झाली. इथलं एअरपोर्ट न्याहाळत ती त्याच्या मागून चालत होती. आपल्या मुंबईमध्ये एअरपोर्ट पाहून तिला वाटायचं की हे जगातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट असेल. आता अमेरिकेतलं हे एअरपोर्ट पाहून ती धास्तावली होती.

      बाहेर थंडीही जास्त वाटत होती. पण त्याला सांगावं का हा विचार ती करत होती.

'आई गं, असं वाटतंय की सगळं रक्त गोठून जाईल. सांगावं का डेव्हील प्रिन्सला? पण त्याला वाटेल की काही लहान राहिली का ही जी लहान मुलांसारखं थंडी वाजतेय म्हणून सांगतेय.'

मात्र थंडी तिला सहन होईना. आदित्यला जाणवलं की आपल्यामागे चालत येणाऱ्या निशाची पावलं मंदावली आहेत. तसा तो मागे वळला. त्याने पाहिलं की ती हातावर हात चोळत होती. तिला थंडी लागतेय हे लक्षात आलं तसं त्यालाच वाईट वाटलं. त्याने एवढी साधी गोष्टही डोक्यात घेतली नव्हती. त्याला थांबलेलं पाहून ती आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत उभी राहिली. त्याने आपलं जॅकेट काढलं आणि तिला दिलं.

"वेअर इट. खरंतर इथे खूप थंडी आहे. सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं की तुझ्यासाठीही एक जॅकेट घ्यायला हवं होतं. सध्या यावर मॅनेज कर. घरी पोहोचल्यावर तुला लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची शॉपिंग करू आपण."

तिने ते जॅकेट घातलं आणि फक्त मान डोलावली. तिने तोंडातून एक शब्दही काढलेला नव्हता. तिने पाहिलं की आता आदित्य कॉलवर बोलत होता. ती फक्त मागून चालण्याचं काम करत होती. ते एअरपोर्टच्या बाहेर आले. बाहेर एक आलिशान कार उभी होती. एका काळ्या वेशातील माणसाने पुढे येत पटकन दार उघडला.

"निशा, बस."

आदित्यने म्हटलं.

तशी ही कार आपल्याला न्यायला आली आहे हे तिला समजलं. तो बस म्हणाला म्हणून ती आत जाऊन बसली. तोही दुसऱ्या बाजूने आत बसला. कारचा दार बंद करून त्याच्या बॉडीगार्ड फ्रंट सीटवर जाऊन बसला होता. ड्रायव्हरने कार स्टार्ट केली. निशाला आता बोअर होत होतं. आदित्य सतत कॉलवर बोलत होता. जवळजवळ आठवडाभर नसल्यामुळे त्याच्यावर कामाचा फार प्रेशर होता म्हणू शकतो.

      थोड्याच वेळात ती कार एका बिल्डिंगसमोर थांबली. ती आठमजली उंच बिल्डिंग पाहत निशा खाली उतरली. तिने पाहिलं की पार्किंगमध्ये किमान पंधरा- वीस वेगवेगळ्या गाड्या उभ्या होत्या. आदित्यने बॉडीगार्डला इशारा केला की सामान घेऊन आत ये. इथे आल्यावर त्याने हातात सतत खेळत असणारा मोबाईल खिशात टाकला होता. त्याची नजर आता तिच्यावर गेली. त्याच्या जॅकेटमध्ये ती अगदी गोंडस आणि छोटीशी दिसत होती. त्याला हसू आलं. किती गोड दिसावं! असं वाटून गेलं. ती फक्त टपोऱ्या डोळ्यांनी समोरची बिल्डिंग न्याहाळत होती. अचानक तिला तिच्या कमरेभोवती त्याचा हात जाणवला. तसं तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं.

"वेलकम होम!"

तो किंचित हसून म्हणाला. तिला सगळं शरीर त्याच्या एका स्पर्शाने गोठून गेलं आहे असं वाटत होतं. बॉडीगार्ड सामान घेऊन वर गेले होते.

"लेट्स गो टू अवर होम."

त्याने असं म्हणताच तिला त्याच्यासोबत चालायला लागलं.

'अरे यार, काय चाललंय याचं! मला चालता येतं आणि मला रस्ताही दिसतो. ह्याचा माझ्या कमरेवरचा हात कधी काढणार हा? उगाच माझे हार्टबिट्स वाढवून ठेवलेत.'

ती स्वतःशीच विचार करत चालत होती. ते लिफ्टमध्ये शिरले आणि त्याने फोर्थ फ्लोअरचं बटण प्रेस केलं.

"वरती मॉम आणि डॅड असतील. तुला काही जास्त प्रश्न विचारणार नाहीत ते. पण ते गृहप्रवेश का काय असतं ते करायचं आहे. त्यांनी काही विचारलं तर अशीच गप्प बसून राहू नकोस."

आदित्य तिला सांगत होता. तिने पुन्हा होकारार्थी मान वर खाली डोलावली.

"तुला नक्की बोलता येतं ना?"

त्याने अचानक विचारलं. तसा तिला रागच आला.

"हो."

ती किंचित रागानेच म्हणाली. अशा रीतीने एक अक्षरी शब्दाने त्यांच्या संवादाची सुरुवात झाली होती. ते फोर्थ फ्लोअरला आलेले होते. तिने पाहिलं की फोर्थ फ्लोअरला फार लायटिंग करण्यात आलेलं होतं. तिला समोरून एक सिम्पल लेगिन्ज-कुर्ता घातलेली स्त्री येताना दिसली. तिच्या चेहऱ्यावरूनच वाटत नव्हतं की ती आदित्यची मॉम आहे.

"वेलकम निशा! वेलकम होम!"

ती हसून पुढे आली. तिने पूजेचं तबक आणलं होतं. तिने त्या दोघांना ओवाळलं.

"आदी, गृहप्रवेश तर तिकडेच करायचा आहे ना?"

"हो."

तो शांतपणे बोलत होता. त्याच्या हात अजूनही तिच्या कमरेवरच होता. इथे येताना त्याने आपल्याला जास्तच जवळ ओढून घेतलं आहे असं तिला वाटलेलं.

"चला मग."

त्याची मॉम म्हणाली.

"डॅड नाही येणार आहेत?"

त्याच्या नजरेत उत्सुकता दिसत होती.

"ते घरी नाही आहेत. ते बाहेर गेलेत रे. असुदे. नंतर भेटतीलच ते तुम्हांला."

त्याचा चेहरा किंचित उतरला आहे असं निशाला वाटलं. पण उगाच कशाला आपण अंदाज लावायचे म्हणून ती गप्पच बसली. मॉम त्यांच्यासोबत लिफ्टमध्ये शिरली. आता आदित्यचा निशाच्या कमरेवर असणारा हात खांद्यावर आला होता.

'हा का मला एवढं जवळ ओढून घेतोय? मम्मा तर म्हणालेली की ह्याला माझ्यात तितका इंटरेस्ट नाही आहे. दिसतच होतं ते तोंडावरून. पण मग आता का चिपकू बनतोय? ओह.. त्याच्या मॉमला दाखवायला बहुतेक.'

ते सेव्हन्थ फ्लोअरवर आले. सेवन्थ फ्लोअर बघून तर ती चाटच पडली. लिफ्टमधून बाहेर यावं आणि स्वर्गात पाऊल टाकावं वाटत होतं. तिथे फ्लोअर, फर्निचर इतकं पॉश दिसत होतं की विचारूच नये. त्यात लायटिंग केलेलं होतं. लिफ्टच्या आत एक छोटी चौकट होती. मॉमने आत जाऊन त्यावर माप आणून ठेवलं. इथे असा गृहप्रवेश होईल हे निशाला माहित नव्हतं.

"कमॉन!"

आदित्यचा आवाज आला तसं ती भानावर आली. तिने माप ओलांडलं आणि आत प्रवेश केला. तिला एक समजेना, ओवाळलं फोर्थ फ्लोअरवर आणि गृहप्रवेश सेवन्थ फ्लोअरवर हा काय प्रकार होता? मात्र विचारावं कसं या भीतीने ती गप्पच बसली होती.

"आदी, तुझी वाट पाहत दोघेही झोपी गेले आहेत. आता त्यांना उठवू नका."

त्याने होकार दिला.

"डोन्ट वरी मॉम. तुही आता रेस्ट घे. डॅडलाही नंतर भेटेनच मी."

त्यांना एक स्माईल देऊन त्याची मॉम पुन्हा लिफ्टमध्ये शिरली. लिफ्ट खाली गेली तसं त्याने लिफ्टला आतून असणारं ग्रीलसारखं दार ओढून घेतलं.

"व्हॉट आर यु वेटिंग फॉर? कम, इट्स अवर होम."

आता त्याने तिच्या खांद्यावरचा हात काढला होता. तो आत गेला. तशी मागोमाग तीही आत गेली. त्याने सगळ्या लाईट्स लावल्या होत्या.

"सीट हिअर."

त्याने सोफ्याकडे बोट दाखवलं. सोफा तरी किती महाग असेल असा विचार करतच ती हळूच त्यावर बसली.

"चार्ल्स.. चार्ल्स.."

त्याचा आवाज ऐकून किचनमधून एक माणूस पटकन बाहेर आली.

"हाक मारलीत सर?"

"येस. तुझी भेट घालून द्यायची होती. मीट माय न्यू वाइफ, निशा!"

त्याचं ते न्यू वाइफ म्हणणं निशाला फार वाईट वाटलं होतं. पण सत्य आहे ते स्वीकारायला पाहिजे होतं.

"हॅलो मॅम!"

चार्ल्स हसून म्हणाला.

"हॅलो अंकल."

"डोन्ट कॉल मी अंकल. मी एवढाही म्हातारा नाही. सरांपेक्षा दहा वर्षांनी वगैरे मोठा असेन. तुम्ही माझ्या मालकीण आहात. प्लिज कॉल मी एज चार्ल्स!"

तो नम्रपणे म्हणाला. तिने फक्त मान डोलावली.

"निशा, मी फ्रेश होतोय. त्यानंतर तुही फ्रेश हो आणि झोपून टाक. प्रवास जास्त झाला आहे आणि तुझ्यासाठी फार नवीन आहे. झोप काढली नाहीस तर त्रास होईल."

तिने पुन्हा मान डोलावली. तो आत निघून गेला. तिने चार्ल्सकडे पाहिलं.

"चार्ल्स, मला एक ग्लास पाणी मिळेल का?"

"लगेच आणतो मॅम."

तिचं बोलणं म्हणजे एखाद्या राणीचा हुकूम असल्याप्रमाणे चार्ल्स लगेचच आत पळाला.

**************
क्रमशः
0

🎭 Series Post

View all