Login

रंग प्रेमाचा!- ०३

Love Story
मागील भागात..

आदित्यच्या मॉमने त्या दोघांना ओवाळलं. निशाचा सेवन्थ फ्लोअरवर गृहप्रवेश झाला. आदित्यने तिची चार्ल्ससोबत ओळख करून दिली.

आता पुढे..

        आदित्य तिला झोपायला सिक्स्थ फ्लोअरवर घेऊन गेला होता. ह्याने किती फ्लोअर विकत घेतले आहेत असा विचार ती करत होती. मात्र आपल्याला काय करायचं आहे असा विचार करत तिने मिळालेल्या बेडवर मस्त ताणून दिली. आदित्य जास्त वेळ तिथे थांबला नव्हता. तिला झोप लागलेली पाहून तो परतला.

        आता सकाळी निशाला जाग आली. तिचं अंग दुखत होतं. आळस देत ती उठून बसली. तिने पाहिलं की तिच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. म्हणजे तिला इथे झोपायला सांगून तो परत निघून गेला होता याची तिला कल्पना आली. ती बेडवरून खाली उतरली. झोपली इथे असली तरी तिचं सगळं सामान सेवन्थ फ्लोअरवरच होतं. ती वरती आली आणि तिने आपल्या बॅग कुठे आहेत ते चार्ल्सला विचारलं.

"मॅम, तुमच्या बॅग मी सरांच्या रूममध्ये ठेवून आलो आहे."

त्याने कचरतच सांगितलं.

त्याला थोडं वाईटच वाटलेलं. बिचारी नवीन नवरी म्हणून आलेली आणि खाली गेस्ट रूममध्ये जाऊन झोपलेली. ती आदित्यच्या रूमकडे निघाली. आदित्य जिममध्ये गेलेला होता. त्यामुळे रूममध्ये कोणी नव्हतं. तिने ब्रश आणि आंघोळीचे कपडे काढून घेतले. आता कुठलं बाथरूम युज करू हे चार्ल्सला विचारणं योग्य नव्हतं. त्यामुळे तिने आदित्यच्या रूमला अटॅच असणारं बाथरूमच युज केलं. फार तर पंधरा मिनिटांत सगळं आवरून ती बाहेर आली. चार्ल्स किचनमध्ये काहीतरी करत होता.

"चार्ल्स, मी काही मदत करू?"

"नाही मॅम. तुम्ही कशाला? तुम्ही बसा तिथे. मी तुम्हांला काय आणू? चहा की कॉफी?"

त्याने असं विचारताच निशाला हसू आलं.

"चहा की कॉफी? ऑप्शन कसे काय ठेवले? हे काही हॉटेल थोडीच आहे. चहा केला आहेस की कॉफी केली आहेस? जे केलं असशील ते आण."

निशा म्हणाली.

तसा हसत तोही आत निघून गेला. बिचारी! तिला ही लाईफस्टाईल मानवायला वेळ जाणार हे त्याच्या लक्षात आलं होतं. ती अजूनही मिडल क्लास जगातच होती. चहा केला असला तर सकाळी सगळ्यांना चहाच असं वाटायचं तिला. अगदी आई करायची तसं! त्याने कॉफी आणून तिच्यासमोर ठेवली. तिनेही एकेक घोट घेत कॉफी संपवायला सुरु केली.

"तू रोज एवढं काम करतोस? तेही एकटा?"

तिने पुन्हा चार्ल्ससोबत बोलायला सुरुवात केली. तशी ती अगदीच बडबडी नव्हती. पण अगदीच शांतही नव्हती. तिला नेहमीच तिच्यासोबत बोलायला कोणीतरी हवं असायचं. घरी आई असायची. पण इथे सासू तर तीन फ्लोअर खाली राहत होती. त्यामुळे प्रश्नच नव्हता.

"हो. सवय आहे मला. दिवसभर फार काम नसतं. सकाळी सर उठले की त्यांच्या जिमला जायच्या वेळेआधी एनर्जी ड्रिंक तयार करतो. ते जिमला गेले की मग कॉफी, ब्रेड, सँडविचेस असं बनवायला घेतो. सर जिमवरून आले की आंघोळ करून, नाश्ता करून ऑफिसला निघून जातात आणि मग मी मुलांच्या नाश्त्याकडे वळतो. पुन्हा ते संध्याकाळी रिटर्न येतील तेव्हा सेम काम. मधे थोडी साफसफाई आणि छोटी मोठी कामं करतो."

चार्ल्सने सगळं सांगितल्यावर तिला आठवलं की मुलांबद्दल तर झोपेत विसरूनच गेली होती ती. चार्ल्सला कसं विचारावं हा विचार करत असतानाच तिला आतून आवाज ऐकू आला.

"अदा नाही हा. मी माझी प्रत्येक गोष्ट तुला नाही देणार आहे. स्टे अवे फ्रॉम इट!"

तो रागाने ओरडत होता.

ती मात्र त्याची ती खेळण्यातली कार घेऊन पळत बाहेर आली.

"नो वेज. मी एकदा त्याला टच केलं की ते माझं आहे. मी डॅडची प्रिन्सेस आहे. डॅड सेज मी एकदा एखादी गोष्ट चॉईस केली की ती माझी आहे."

तिने त्याला वेडावून दाखवत सांगितलं.

"अदा, गिव्ह इट!"

तो जोराने ओरडला.

मग त्याचं लक्ष त्यांच्यासमोर असणाऱ्या आणि त्यांच्याकडे एकटक पाहणाऱ्या तिच्याकडे गेलं. अदाने ती खेळण्याची कार तिथेच सोडली आणि ती पटकन आरवच्या मागे येऊन लपली. त्यानेही आपल्या एका हाताने तिचा हात धरला. हे पाहून निशाला आश्चर्यच वाटलं. क्षणभरापूर्वी भांडत असणारे दोघे कोणीतरी अनोळखी व्यक्ती पाहून कसे एक झाले होते. ती हळू उठून त्यांच्याजवळ गेली. तसे ते घाबरून मागे सरकले. एवढ्यात आतून चार्ल्स बाहेर आला. आरवने त्याला पाहिलं.

"चार्ल्स, ही यंग लेडी कोण आहे? ती आपल्या घरात काय करतेय?"

त्याचा प्रश्न ऐकून चार्ल्स हसला.

"आरव बेटा, ती तुमच्या डॅडची वाइफ आहे. युअर न्यू मॉम!"

हे बोलताना चार्ल्सला वाईट वाटत होतं. कारण काल आदित्यने न्यू वाइफ म्हटल्यावर निशाचा पडलेला चेहरा त्याने पाहिला होता. आता मात्र ती उदास दिसत नव्हती. कारण तिचं लक्ष त्या दोन छोट्या पिल्लांकडे होतं.

"न्यू मॉम? नेव्हर! मला फक्त एकच मॉम होती आणि तीच असणार आहे. डोन्ट यु डेअर टू से दॅट चार्ल्स!"

आरव रागानेच म्हणाला.

याउलट मॉमचं नाव घेताच छोटी अदा पटकन त्याच्या मागून डोकावून निशाकडे पाहून लागली. निशाला जसं लक्षात आलं की ती आपल्याकडे पाहत आहे तसं तिने एक गोड स्माईल दिली. काही क्षण तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण केल्यावर अदा आरवच्या मागून बाहेर आली.

"दादा, तू असं का बोलतो आहेस? तू मला सांगितलं होतंस ना की मॉम आल्यावर आपण तिला घट्ट पकडून ठेवू. तिला जाऊ नाही देणार परत. मग तू आता मॉमसोबत असं का वागतो आहे? ती डॅडची वाइफ आहे म्हणजे आपली मॉम आहे."

अदा हळूहळू पावलं टाकत निशाजवळ आली. ती अजूनही घाबरलेली दिसत होती.

"तू माझी मॉम आहे ना? तू मला ओरडणार नाही ना? आणि खूप सारे टॉईज घेऊन देशील ना?"

तिच्या भाबड्या डोळ्यांत भरपूर प्रश्न होते. निशाने पटकन तिला जवळ घेतलं. असं करावंसं आपल्याला का वाटलं हे तिचं तिला समजलं नाही. पण तिने अदाला घट्ट मिठी मारली होती.

"येस बेबी. मी तुझी मम्मा आहे. मी तुला अजिबात ओरडणार नाही."

"नो. यु आर नॉट हर मॉम. लिव्ह हर यु मॉन्स्टर!"

आरव जोरात ओरडला.

"आरव, माईंड युअर लँग्वेज! चार्ल्सने तुला सांगितलं नाही का? शि इज माय न्यू वाइफ. त्याचाच अर्थ आहे ती तुमची नवीन मॉम आहे. आता तू एक्ससेप्ट कर नाहीतर करू नकोस. अदा एक्ससेप्ट करत असेल तर उगाच तिला डिस्टर्ब नाही करायचं. यु गॉट इट?"

मागून आलेला आदित्य आरवला ओरडला होता.

आरव पाणावल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होता.

"मी काय विचारलं आरव?"

त्याचा आवाज परत चढला होता.

"आय विल नॉट! तू अजून दहा लग्न करशील. दॅट डजन्ट मिन आय हॅव टू एक्ससेप्ट दॅट. ती माझी मॉम नाही आहे. नेव्हर!"

तो धावतच आपल्या रूममध्ये निघून गेला. आदित्यने दीर्घ श्वास घेतला. त्याला आरववर ओरडायचं नव्हतं. पण त्याला कसं आणि काय समजावून सांगावं हेही समजत नव्हतं. तो निशाकडे वळला.

"तुझं डोकं वगैरे दुखत नाही ना? प्रवासाचा काही त्रास?"

"काही नाही. मी ठीक आहे."

निशाने उत्तर दिलं.

"फाईन. आज रविवार आहे. मुलांच्या शाळा नाहीत. त्यामुळे फार गडबड नाही आहे. तसं तर ऑफिसही नसतं. पण बरंच पेंडिंग वर्क पूर्ण करायचं आहे. त्यामुळे मला जावं लागेल. तुला काहीही हवं असेल किंवा काही विचारायचं असेल तर चार्ल्सला विचारू शकतेस. चार्ल्स टेक केअर ऑफ हर! आरवकडेही लक्ष दे. डोन्ट लेट हिम डिसरिसेप्ट हर!"

चार्ल्सने मान हलवून होकार दिला. तो आत निघून गेला. तसं अदाने निशाकडे पाहिलं.

"मम्मा, दादा तुझ्यावर रागावला आहे का? की त्याची मॉम आणि माझी मॉम वेगळी आहे?"

अदाच्या एवढ्याश्या डोक्यात एवढे सगळे प्रश्न पाहून निशा गोंधळली. मुळातच हे सगळं स्वीकारणं तिच्यासाठी खुप कठीण होतं. एक महाविद्यालयीन युवती ते थेट दोन लहान मुलांची आई हा प्रवास तिला स्वतःला मानवला नव्हता.

"आपण जाऊन पाहूया आरव काय म्हणतोय."

ती एवढंच म्हणाली.

"मॅम, तुम्ही नका जाऊ. आरव चिडला की अगदी सरांसारखा आहे. त्याचा राग फार आहे. तुम्हांला सवय नाही. मी पाहतो. तोवर अदा बेटा, तुझ्यासाठी सँडविच तयार आहे. तू मम्मासोबत बसून सँडविच एन्जॉय कर."

तिने मान डोलावत होकार दिला. निशा तिला डायनिंग टेबलजवळ घेऊन गेली आणि चार्ल्स आरवच्या रूमच्या दिशेने निघून गेला.

**************
क्रमशः
0

🎭 Series Post

View all