मागील भागात..
निशाने चार्ल्सला बिल्डिंगबद्दल विचारलं. ते दोघे मिळून सगळे फ्लोअर्स फिरले. पहिल्या आणि आठव्या फ्लोअरवर जायला परवानगी नसल्याचं चार्ल्सने सांगितलं. निशा अदाच्या रूममध्ये झोपी गेली.
आता पुढे..
रात्री सातच्या आसपास आदित्य घरी आला. तो आल्या आल्या थेट शॉवरमध्ये शिरला. दिवसभराचा स्ट्रेस कमी करण्यासाठी तोच बेस्ट ऑप्शन होता. मस्त शॉवर घेऊन तो बाहेर आला आणि लिव्हिंग रूममध्ये बसला. त्याची एक नजर सगळीकडे भिरभिरली. निशा कुठेच दिसत नव्हती.
"चार्ल्स!"
त्याने हाक मारली. किचनमधून त्याच्याकडे पाहत असलेल्या चार्ल्सला लक्षात आलं होतं की तो काय शोधतोय.
"येस सर?"
त्याने बाहेर येत विचारलं.
"निशा आणि मुलं कुठे दिसत नाहीत."
"मुलं आपला होमवर्क करत आहेत. मगाशी आरव सांगून गेला तुम्ही आल्यावर त्याला सांगायला. जेवले नाहीत ते अजून आणि निशाताई, त्या अदाच्या रूममध्ये झोपल्या आहेत."
आदित्यच्या भुवया उंचावल्या.
'खरंच कुठून उचलून आणलं आहे हिला! निदान चार्ल्ससमोर आपल्या नात्याचं चुकलेलं गणित असं नाही आणायला पाहिजे होतं. माझी बेडरूम असताना मुद्दाम अदाच्या रूममध्ये जाऊन झोपली आहे. बघतो आता हिला!'
तो तिथून उठला आणि अदाच्या रूमच्या दिशेने गेला. पण आत जाताच त्याला आवाज ऐकू आला. त्याने अर्धवट उघड्या असणाऱ्या त्या दारातून आत पाहिलं.
"मम्मा, मला हे ड्रॉईंग नाही येत आहे. दादा म्हणतोय हे फार वाईट आहे. तू ओरड त्याला!"
अदा कंप्लेंट करत होती. निशा हसत ते ऐकत होती.
"असं कसं चालेल बेबी? दादा आधीच माझ्यावर रागावला आहे ना? मी त्याला अजून ओरडले तर मग तो आपल्याशी बोलणार नाही."
"पण तू माझ्या टीममध्ये आहे की दादाच्या टीममध्ये आहे?"
अदाने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिलं.
"मी तुम्हां दोघांच्याही टीममध्ये आहे. आपली टीम वेगळी कुठे आहे? तू, दादा आणि निशा.. म्हणजे मम्मा! आपण एकच टीम आहोत."
ती हसून म्हणाली. पण निशा आणि मम्मा या दोन शब्दांतला तिचा गोंधळ पाहून त्याला आपल्या काळजात कळ जाणवली. त्याला एअरपोर्टवर आपल्या आईच्या कुशीत शिरून रडणारी ती आठवली. अचानक निशा ते मम्मा हा प्रवास तिच्यासाठी किती डेंजरस होता हे त्याला आता समजत होतं. तिच्यावर असलेला उरलासुरला रागही विरून गेला होता.
"पण आपण सगळे एकाच टीममध्ये असलो तर अपोजिट टीममध्ये कोणीच नाही राहणार मम्मा. मग मजा कशी येणार?"
अदाने पुढचा प्रश्न विचारला. अचानक निशाला तिच्या विचाराचं हसू आलं.
"आपण एक काम करूया. तू, मी आणि आरव एका टीममध्ये राहूया. तुझ्या डॅडला आणि चार्ल्स अंकलला दुसऱ्या टीममध्ये टाकून देऊया? चालेल का?"
निशाने भुवया उंचावत अदाकडे पाहिलं. कल्पनेनेच अदा हसायला लागली.
"ओके मम्मा. डॅड तर सगळे गेम्स हरतो. चार्ल्सला तर काहीच येत नाही. म्हणजे आपणच स्ट्रॉंग टीम असू. मी आणि दादा तर एक्सपर्ट आहोत. पण हे झालं गेमिंगचं. आपली टीम फक्त गेम खेळण्यापूरती नाही हा. तू आमच्या टीममध्ये आहे म्हणजे डॅड आम्हाला ओरडला ना की तू आमची साईड घ्यायची हा."
अदाला फार आनंद झालेला होता. निशा हसत होकार देत होती. दाराबाहेरून हे पाहणाऱ्या आदित्यने काहीतरी ठरवलं. ती त्याच्यासाठी सगळं सोडून आली होती. तिला स्वतःच्या आयुष्यात एडजस्ट करून घेणं ही आता आपली जबाबदारी आहे हे त्याने स्वीकारलं होतं. तो चटकन दार उघडत आत आला.
"व्हॉट इज धिस प्रिन्सेस? मम्मा काय आली आणि तू टीम चेंज केली का? नाहीतर आधी डॅड आणि प्रिन्सेसची एक टीम होती ना?"
त्याने अदाला उचलून घेत म्हटलं. अदा खळखळून हसत होती. तो अदाला घेऊन बेडवर बसला. तशी निशा चटकन बेडवरून खाली उतरली. आधीच त्याच्या अशा अचानक येण्याने ती बावरली होती. ती गमतीत टीमबद्दल बोलत होती. मात्र आपण त्याच्या मुलांना त्याच्या विरुद्ध करतोय असं त्याला वाटलं तर? ह्या विचाराने ती घाबरली होती. तो मात्र फार मॅच्युअर होता. त्याला समजलं की तिच्या डोक्यात काय सुरु असेल.
"बस ना. तू का उभी आहेस तिकडे?"
त्याने तिच्याकडे पाहत म्हटलं.
"हा मम्मा. बस ना तू. डोन्ट वरी. मी असताना डॅड नाही ओरडणार तुला."
अदा प्राऊडमध्ये म्हणाली. निशाने त्याचं ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं आणि ती अदाला म्हणाली,
"अदा, मी बाहेर चार्ल्सला मदत करते हा. तुम्ही गप्पा मारा. एन्जॉय!"
तिच्या रिप्लायची वाट न पाहताच निशा धावतच बाहेर निघून गेली. आदित्यला तिचं वागणं समजत होतं. मात्र तिच्या कलाने सगळं न्यायला लागणार एवढं तर त्याला माहित होतं. अजूनही कुठेतरी मनात तो शुअर नव्हता. त्याला खरंच हे करायचं आहे का? तो खरंच तिला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का? लग्नात दिलेली सगळी वचनं त्याला निभावता येतील का?
"डॅड, हे बघ. मी ड्रॉ केलं."
अदा आपलं ड्रॉईंग त्याला दाखवत होती.
"व्हेरी नाईस अदा. रोज प्रॅक्टिस करत जा. नक्की इम्प्रूव्ह होईल."
तो तिला शाबासकी देत म्हणाला. डॅडला आवडलं म्हटल्यावर तिच्या दृष्टीने आता ते जगातलं बेस्ट ड्रॉईंग होतं.
**************
दुसऱ्या दिवशी आदित्य उठला. त्याला आठवलं की रात्री कामाच्या व्यापात तो स्टडी रूममध्येच झोपला होता. तो खाली आला. तोवर उशीर झालेला होता. मुलं तयार होऊन शाळेला निघून गेली होती. चार्ल्स काहीतरी सफाई करत होता. निशा मात्र कुठेच दिसत नव्हती. आदित्यला नेहमी चार्ल्सला येऊन विचारायला ऑड वाटत होतं. पण पर्यायही नव्हता त्याच्याकडे.
"चार्ल्स, निशा कुठे आहे?"
"निशाताई, त्या सकाळी मुलांना सोडायला बाहेर आलेल्या. परत जाऊन झोपल्या बहुतेक."
चार्ल्सने सांगितलं.
'परत जाऊन झोपली? तिला मानवत नाही आहे का हे वातावरण? तशी फार नाजूक आहे ती! कमॉन आदित्य, ती तुझी जबाबदारी आहे. यु कान्ट जस्ट इग्नोअर.'
"फाईन. एक काम कर, जरा व्हेज सूप आणि लाईट काहीतरी बनवून ठेव. लगेच बनव, हे नंतर कर."
"ठीक आहे."
चार्ल्स लगेच किचनमध्ये गेला. आदित्य अदाच्या रूमकडे वळला. त्याला शंका आलीच होती. आजही तिथेच झोपली होती ती. तिला ब्लॅंकेटमध्ये असं गुरफटून झोपलेलं पाहून त्याला हसू आलं.
'दोन मुलांना तू सांभाळायचं की तुझ्यासकट तिघांना मी सांभाळायचं हेच समजत नाही आहे मला! क्युट आहेस पण तू!'
त्याने तिच्या शेजारी बसत तिच्या केसांतून हात फिरवला. तसे तिने डोळे उघडले. आपल्यासमोर त्याला पाहून ती हसली.
"डेव्हील प्रिन्स, डोन्ट यु डेअर! माझ्या स्वप्नात तुला एंट्री नाही आहे. आयुष्यात एंट्री दिली ना मी, तेच मॅनेज नाही होत आहे मला."
ती अर्धवट झोपेतच पुटपुटत होती. तिचं अंग जरासं गरम लागत होतं. त्याने आपल्या खिशातून मोबाईल काढत डॉक्टरला कॉल केला आणि अपॉइंटमेंट घेतली.
"निशा, वेक अप! तयार हो. आपण डॉक्टरकडे जातोय."
त्याचा चढलेला आवाज पाहून ती उठली होती.
"डॉक्टरकडे? का?"
"कारण तुला ताप आला आहे. तुझ्या शरीराला इथलं वातावरण लगेच सूट होणार नाही. दोन आठवडे तरी जाऊ द्यावे लागतील. तसंही इथे ताप अंगावर काढत जाऊ नकोस. काही दुखत असेल तर लगेच सांगायचं. मी काही अंतर्ज्ञानी नाही आहे की मला आपोआप कळेल तुला काय होतंय ते!"
'डेव्हील प्रिन्स कुठला! मलाच ताप आला आहे आणि मलाच ओरडतोय. आजारी माणसाशी व्यवस्थित बोलावं एवढं समजत नाही का ह्याला?'
"तुला ऐकू येतं की नाही? परवा बोलता येत नव्हतं. आज ऐकता येत नाही आहे का?"
त्याने तिला आपल्याकडे असं एकटक पाहत असताना पाहून विचारलं.
"मी होते तयार."
त्याच्याशी वाद घालायचा म्हणजे स्वतःचा अपमान करून घ्यायचा हे तिला समजलंच होतं. मुकाट्याने होकार दिला तिने. तिला सांगून तो बाहेर निघून गेला. ती उठून त्याच्या बेडरूमकडे चालू लागली. सामान तर सगळं तिकडेच असायचं. बाकी ती इतर कशासाठीही त्याच्या रूममध्ये जायची नाही. तिने अंतर मेंटेन करायचं ठरवलं होतं आणि तो नात्याला चान्स द्यायचा विचार करत होता.
**************
क्रमशः
क्रमशः
- निशिगंधा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा