मागील भागात..
आदित्यला समजलं की निशा पुन्हा अदाच्या रूममध्ये झोपली आहे. तो तिच्याशी बोलायला अदाच्या रूममध्ये गेला. तिला आपल्या आयुष्यात एडजस्ट करून घेणं ही आता आपली जबाबदारी आहे हे त्याने स्वीकारलं होतं. तिने अंतर मेंटेन करायचं ठरवलं होतं आणि तो नात्याला चान्स द्यायचा विचार करत होता.
आता पुढे..
डॉक्टरकडून जाऊन आल्यावर ती जशी घरात शिरली तसे त्याचे शब्द तिच्या कानावर पडले.
"निशा, आपली रूम तिकडे आहे. डोन्ट स्लीप इन किड्स रूम!"
त्याचं असं स्पष्ट बोलणं पाहून तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलंही नाही. ती त्याच्या रूमच्या दिशेने निघून गेली. त्याने चार्ल्सतर्फे पुन्हा सूप मागवून घेतलं आणि तो तिच्या मागोमाग रूममध्ये आला.
"हॅव धिज. तुला बरं वाटेल."
"थँक्स!"
तिने बाउल हातात घेत निदान एक शब्द उच्चारला. नाहीतर ती त्याच्याशी फार मोजकंच बोलायची. तो मात्र आज बरंच काही बोलायचं ठरवून आला होता.
"इथलं वातावरण तुला नवीन आहे. कदाचित त्यामुळे तुझी तब्येत बिघडते आहे. टेक केअर ऑफ युअरसेल्फ!"
ती निशब्दच! फक्त उत्तरादाखल होकारार्थी मान हलवली तिने. त्याने आपल्या हातांच्या मुठी वळल्या होत्या. एवढे पेशन्स टेस्ट तर अदा आणि आरवनेही केले नव्हते.
"तुला माझ्याशी बोलायला आवडत नाही का?"
त्याने शेवटी विचारलंच.
"असं काही नाही. असं का बोलता आहात?"
"बोलता आहात? कमॉन, फर्स्ट कॉल मी आदित्य ऑर आदी."
पुन्हा ती निशब्द! तो वैतागला होता. पण स्वतःला तिच्यावर ओरडू देत नव्हता.
"कॉल मी आदित्य ऑर आदी. अहो-जाहो करायची गरज नाही आहे. चार्ल्सला कशी अगदी सहज हाक मारतेस. तसंच वागायचं माझ्याशी. ऑलराईट?"
"हं, आदित्य."
ती कशीबशी म्हणाली. कारण त्याचा रागीट चेहरा पाहता हा कधीही आपल्याला खिडकीतून बाहेर फेकून देईल असं वाटत होतं तिला.
"तू काय करतेस दिवसभर?"
"काहीच नाही."
"निशा, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. काहीच न करता माणूस कसा राहू शकतो? काहीतरी तर करत असशीलच ना? बरं तू तुझ्या घरी काय करायचीस? जेवण? फिरणं? एनी अदर हॉबीज?"
त्याचा तिला बोलतं करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु होता. आपल्या घराचा विषय निघताच मात्र तिच्या डोळ्यांसमोरून तिचं आधीचं आयुष्य तरळून गेलं.
"काही खास नाही करायचे मी घरात. किचनमध्ये आई जास्त येऊ द्यायची नाही. उगाच काहीतरी फुकट घालवेन अशी भीती होती तिला! ते मी थोडी धडपडी आहे ना, त्यामुळे. कॉलेज संपलेलं होतं. त्यामुळे बाहेर फिरण्याचाही प्रश्न नाही. तसं मला प्रवास आवडत नाही. आय एम होमसिक परसन. हॉबीज तर पेंटिंग करायला आवडतं, पण त्याला मूड असावा लागतो आणि कधी कधी असंच गात राहायला आवडतं. पण माझं गाणं बाथरूम सिंगिंगपर्यंतच मर्यादित आहे."
आदित्यने सुटकेचा निश्वास सोडला.
'फायनली! फायनली ही मुलगी माझ्याशी वाक्यांमध्ये बोलली आहे. नाहीतर नुसती एका शब्दांत उत्तरं सुरु असतात.'
तो स्वतःशीच म्हणाला.
"तुम्ही काय करता दिवसभर?"
तिचा आपसूक प्रश्न आला. तो हसला. हिला घरच्यांनी काहीच माहिती दिली नसेल का माझ्याबद्दल असा विचारही त्याच्या मनात येऊन गेला.
"मी एका कंपनीचा सी. ई. ओ. आहे. राठोड ग्रुप! तीस देशांत ब्रॅंचेस आहेत आपल्या. शक्यतो मी सकाळी सात-साडेसातला बाहेर पडतो आणि रात्री सात वाजता परत येतो. तोवर दिवसभर ऑफिसची कामं असतात. आल्यावर मग डिनर, मुलांसोबत गप्पा आणि मग झोपतो."
त्याने क्लिअर सांगितलं. तशी ती हसली.
"काय झालं हसायला? काही चुकलं माझं?"
"नाही. मला एक विचारायचं होतं, म्हणजे एवढा सगळा वेळ ऑफिसमध्ये जातो तर फॅमिलीसाठी, मुलांसाठी किती टाइम देता तुम्ही?"
तिच्या प्रश्नाबरोबर त्याच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या. तिलाही त्या स्पष्ट दिसल्या.
'देवा, डेव्हील प्रिन्स चिडला का काय? वाचव मला प्लिज.'
"मला फॅमिलीला टाइम नाही देता येत. मॉम- डॅड वेगळेच राहतात. त्यांना त्यांचा टाइम स्पेंड करायचा आहे आणि माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही म्हणून. अदा आणि आरवसोबत रात्री डायनिंग टेबलवर बोलणं होतंच. त्यांनी काय अभ्यास केला, काय केलं दिवसभर अँड ऑल. बाकी बघायला चार्ल्स असतोच."
तिने हताश उसासा सोडला.
'हा माणूस तर दगड दिसतोय. कसं समजवणार याला की मुलांची फक्त चौकशी करणं म्हणजे त्यांच्यासोबत वेळ घालवणं नाही.'
"एनीवेज, तू आजपासून इथेच झोपत जा. बाहेर मुलांच्या रूममध्ये झोपायची गरज नाही आहे. चार्ल्सला दरवेळी असं दिसणं बरोबर नाही आहे एवढं तरी तुला समजायला पाहिजे. मी तुला काही डिस्टर्ब नाही करणार. गॉट इट?"
ती पुन्हा हसली. तिच्या हसण्यात गहिरी वेदना आहे असं क्षणभर वाटलं त्याला.
"मला हौस नाही आहे आपल्या नात्याची चुकलेली समीकरणं जगाला दाखवायची! पण तुम्हांला राग येईल म्हणून नाही आले तुमच्या रूममध्ये. सोनं लागलं असेल ना ह्या रूमला!"
ती चिडूनच म्हणाली. तिची अशी प्रतिक्रिया त्याला अपेक्षित नव्हती.
"काय झालंय?"
"मलाच विचारा काय झालंय ते! इथे आल्याच्या पहिल्या दिवशी मला गेस्ट रूममध्ये झोपायला लावलं ना? दुसऱ्या दिवशी चार्ल्स सगळ्या फ्लोअरची माहिती देत होता. तेव्हा त्याच्याकडूनच कळलं की गेस्ट रूम आहेत त्या. त्याला सांगताना शरम वाटत होती आणि मला ऐकताना. तसं म्हणावं तर त्याला सगळं माहितच आहे की आपलं लग्न एक डील आहे. सो काही नाही वाटणार त्याला जर मी अदाच्या रूममध्ये झोपत असेन."
आदित्यला आता राग आला होता. मात्र तो फार कंट्रोल करत होता. पण एक्सप्लेन करणं तर गरजेचं होतं. कारण त्याच्या कृतीला ती चुकीच्या अर्थाने घेत होती.
"निशा, लिसन! तू यायच्या आधी मी इथे एकटाच राहत होतो. आय मिन टू से दोन मुलं असूनही बॅचलरसारखी असायची माझी रूम. तुला आता मी एवढं चांगला वाटत नसलो तर मॅनर्स आहेत माझ्यात. माझी वाइफ आहेस तू म्हणून माझी रूम तुला आवरायला लावणार नाही मी. चार्ल्सला सांगून गेलेलो की रूम क्लीन करून ठेव. तुला या रूममध्ये यायला द्यायचं नसतं तर ह्या सामानालाही यायला दिलं नसतं."
तो तिच्या बॅग्जकडे इशारा करत म्हणाला.
'म्हणजे चार्ल्स म्हणाला ते खरं होतं तर! निशा, मेलीस तू आता. डेव्हील प्रिन्स आता फेकून देणार तुला बाहेर.'
"अजून काही एक्सप्लेनेशन हवं आहे तुला?"
त्याने भुवया उंचावल्या. तिने नकारार्थी मान डोलावली.
"गुड!"
तो अचानक तिच्या अगदी समोर येऊन उभा राहिला.
"हे बघ निशा, मला माहित आहे की तू लहान आहेस. हे सगळं फार नवीन आहे तुझ्यासाठी. सोबत अदा आणि आरवची जबाबदारी. आय एम सो सॉरी फॉर इट! पण तू इथे पाहुणी असल्यासारखी वागू नकोस. यु आर माय वाइफ, सो बिहेव लाईक दॅट. आपल्याला वेळ जाईल हे सगळं एक्ससेप्ट करायला आणि एकमेकांना समजून घ्यायला. बट ट्राय तर केला पाहिजे ना?"
तो समजूतदारपणे बोलत होता. वयाच्या मानाने त्याच्यात तिच्यापेक्षा कैक पटीने जास्त मॅच्युरिटी होती. तिने फक्त होकारार्थी मान डोलावली.
"फाईन. तुझं हे सामान किती दिवस असंच बॅगमध्ये ठेवणार आहेस? ते अनपॅक कर आणि क्लोजेटमध्ये लावून घे. झालं की बाहेर ये लंचला. मी वर स्टडीमध्ये आहे."
तिने पुन्हा मान डोलावली. तीही हळूहळू बोलायला लागेल असं स्वतःलाच समजावत तो बाहेर निघून गेला. निदान आपण तिची जबाबदारी झटकत नाही आहोत याचं त्याच्या मनाला समाधान होतं. ती मात्र गोंधळलेली होती. तो स्वतःहून येऊन आपल्याशी बोलला आणि आपण काय त..त.. प.. प करत होतो याची तिलाच लाज वाटली.
"आदित्य!"
तिच्या तोंडून अस्फूट उच्चार बाहेर पडला आणि ती स्वतःशीच हसली.
'डेव्हील प्रिन्स ही सही पर है तो प्रिन्स ना?'
स्वतःशीच विचार करत तिने बॅग्ज अनपॅक करायला सुरुवात केली.
**************
क्रमशः
(फ्रेंड्स,
तुमच्या कमेंट्स रेग्युलर वाचते. फार छान वाटतं. मी फेसबुकला नाही. मात्र घरातल्यांच्या अकाउंटवरून त्याही कमेंट्स पाहिल्या. दर दिवशी भाग टाका अशा काही कमेंट्स दिसल्या. प्रयत्न करेन नक्की. दर दिवशी नाही जमलं तरी एक दिवसाआड तरी नक्की.
असेच सपोर्ट करत रहा.)
तुमच्या कमेंट्स रेग्युलर वाचते. फार छान वाटतं. मी फेसबुकला नाही. मात्र घरातल्यांच्या अकाउंटवरून त्याही कमेंट्स पाहिल्या. दर दिवशी भाग टाका अशा काही कमेंट्स दिसल्या. प्रयत्न करेन नक्की. दर दिवशी नाही जमलं तरी एक दिवसाआड तरी नक्की.
असेच सपोर्ट करत रहा.)
- निशिगंधा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा