मागील भागात..
निशा किचनमध्ये आली होती. तसंही आता आपला संसार आपल्यालाच पाहायचा आहे हा विचार करूनच ती बाहेर आली होती. तिने चॉकलेट कुकीज बनवायचे ठरवले. अदाला फार आवडले. आरवचा नंतर खाण्यापासून नकार. आरवने तिला आंटी म्हणून स्वीकारण्यासाठी संमती दिली.
निशा किचनमध्ये आली होती. तसंही आता आपला संसार आपल्यालाच पाहायचा आहे हा विचार करूनच ती बाहेर आली होती. तिने चॉकलेट कुकीज बनवायचे ठरवले. अदाला फार आवडले. आरवचा नंतर खाण्यापासून नकार. आरवने तिला आंटी म्हणून स्वीकारण्यासाठी संमती दिली.
आता पुढे..
निशा त्यांच्या बेडरूममध्ये आली. आदित्य बाल्कनीत कॉलवर बोलत उभा होता. आपण कुठे झोपायचं असा विचार करत तीही उभी होती. त्याला तिची चाहूल जाणवली तसा तो मागे वळला. पलीकडून बोलणाऱ्या माणसाला लगेच काहीतरी सांगत त्याने कॉल कट केला.
"उशीर झाला आहे खूप. झोपूया ना?"
त्यानेच विचारलं.
"हं. मी कुठे झोपू? म्हणजे इथे तर सोफा पण नाही आहे."
तिने स्पष्टच विचारलं. तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
"तू काही सीरिअल्स वगैरे जास्त बघतेस का गं? एवढा मोठा बेड आहे ना? डोन्ट वरी. अगदी आपल्यासोबत अदा आणि आरवही झोपू शकतील एवढी जागा आहे. सो दोन माणसांना तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बी कम्फर्टेबल! आय एम नॉट डिस्टर्बिंग यु एट ऑल!"
तो बेडच्या एका बाजूला बसत म्हणाला. तिचंही त्याच्या बोलण्याने समाधान झालेलं दिसत होतं. ती बेडच्या दुसऱ्या बाजूला बसली. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिला थंडी लागत आहे हे जाणवलं तसं त्याने स्वतःहूनच विचारलं.
"तुझ्याकडे जॅकेट्स नाहीत का?"
"आहे ना. तुमचंच आहे आणि एक दोन स्वेटर असतील."
"कमॉन निशा. दॅट्स नॉट इनफ. इथलं वातावरण आणि भारतातलं वातावरण पूर्णतः वेगळं आहे. तुला सहन नाही होणार हे असं. उद्या मी ऑफिसला जाणार नाही आहे. अदा आणि आरवलाही सुट्टी आहे. तुझी तयारी असेल तर कुठेतरी शॉपिंगला जाऊया."
तिने काही क्षण विचार करायला घेतले आणि मग होकार दिला.
"कुठे जायचं मग?"
त्याने तिच्याकडे पाहत विचारलं.
"मला काय माहित. मला फक्त ही अमेरिका आहे एवढं सोडल्यास काहीही माहित नाही. तुम्ही न्याल तिथे येईन मी."
ती शांतपणे म्हणाली.
'नक्की कशी आहेस गं तू! असं काहीतरी बोलून जातेस आणि मी अजुनच काळजीत पडतो. तुझी जबाबदारी घेण्याचा माझा निर्णय मला महागात पडणार नाही ना असं वाटतं. हे सगळं झेपेल का याचं टेन्शन येतं. डोन्ट बी लाईक धिज निशा!'
तो काहीच बोलतं नाही म्हटल्यावर ती ब्लॅंकेट ओढून झोपी गेली होती. तसंही इथे वातावरणात जास्त थंडी असल्यामुळे तिला सतत झोप यायची. कधीही सहज डोळा लागावा असं वातावरण होतं. तिच्याकडे एक नजर पाहून तोही झोपला.
**************
दुसऱ्या दिवशी सकाळी चार्ल्सने दिलेला ब्रेकफास्ट करून ते चौघेही निघाले होते. त्याची कार फारच आलिशान होती. अदा आणि आरवला चार्ल्सने तयार केलं होतं. त्यांना असं जॅकेट्स, बिनीमध्ये वगैरे पाहून निशाला ते फार गोड वाटत होते. तिची अवस्था फार वेगळी होती. तिने आणलेले स्वेटर इथे काही उपयोगाचे नसल्यामुळे त्याने आपलेच काही जॅकेट्स तिला दिले होते. त्याचे जॅकेट्स घातल्यामुळे ती आहे त्यापेक्षा छोटी दिसत होती. मगाशी आरशात बघून स्वतःलाच बुजगावणं अशी टिप्पणीही तिने देऊन झाली होती. त्याला मात्र ते तिघेही गोड वाटत होते. हॅप्पी फॅमिलीचं त्याचं अधुरं स्वप्न पूर्ण होण्याची आशा नव्याने दिसत होती त्याच्या नजरेत. ते पार्किंगमध्ये आले.
"दादा, लास्ट टाइम तू फ्रंट सीटवर बसला होतास. आता माझी टर्न आहे."
अदाने त्याला धमकावलं.
"नो वेज. त्या लास्ट टाइमला बराच टाइम झाला आहे आता. तू लहान आहे तसंही. त्यामुळे तुला अलाऊड नाही आहे. गप्प मागे बस."
आरवनेही तिला स्पष्टच सांगितलं. निशा त्यांची भांडणं पाहत होती. तिला नकळत निशांतची आठवण आली.
'निशांत खूप मिस करत असेल मला. शेवटचा गुलाबजाम कोण खाणार यावरून त्याच्यासोबत खूप भांडायला कोणीच नसणार आता तिथे.'
तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. त्याने ते नोटीस केलंच. पण तो रिएक्ट नाही झाला. प्रत्येक गोष्टीवर रिएक्ट व्हायची व्हायची नव्हती त्याला. त्यात तिने अगदीच लहान मुलीसारखं वागू नाही असं त्याला वाटायचं. पण दुसऱ्याच क्षणी त्याला वाटलं की आपण तिच्याकडे असं दुर्लक्ष नाही केलं पाहिजे.
"अदा, आरव.. तुम्ही दोघेही मागे बसणार आत. निशा पुढे बसेल. मला काहीही अर्ग्युमेंट्स नको आहेत यावर. इट्स फॉर फॉरेव्हर! मला रिपीट करायला लावायचं नाही."
अदा आणि आरव दोघांनीही तोंड वाकडं केलं. पण ते गपचूप मागे जाऊन बसले. डॅड नो अर्ग्युमेंट्स म्हणाला म्हणजे पूढे काही बोलण्यात अर्थ नाही एवढं त्यांना समजत होतं. ती मात्र फॉरेव्हर या शब्दानंतर काहीसं चमकून त्याच्याकडे पाहत होती. आश्चर्य तर त्याला स्वतःला वाटलं होतं. जेव्हा खरोखर लग्न झालं तेव्हा तिच्याकडे बघावंसंही वाटत नव्हतं त्याला. मात्र इथे आल्यावर ती आपली जबाबदारी आहे हे जाणवल्यामुळे त्याच्याही नकळत त्याच्या वागण्यात बदल होत होता. त्याने तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडला. तशी ती आत बसली. तो दरवाजा लावून मग तो ड्रायव्हिंग सीटकडे वळला.
"सो प्रिन्सेस, काय करायचं आजचं प्लॅनिंग?"
त्याने अदाला विचारलं. तशी अदा खूश झाली. डॅड आपलं मत विचारत आहे ह्यातही वेगळाच आनंद होता तिला.
"मूव्ही, शॉपिंग, मग कुठलं तर रेस्टॉरंट असं सगळं फिरायचं. मला खूप मस्ती करायची आहे. बाहेर कोल्ड नसती तर मी आईस्क्रीम पण खाल्लं असतं."
तिने दात दाखवत सांगितलं.
"नाईस. एनीथिंग एल्ज आरव?"
त्याने आरवकडे आरशातून कटाक्ष टाकत विचारलं.
"नथिंग मोअर दॅन धिस. काही आठवलं तर सांगेन मी."
तो अगदी मोठ्या माणसासारखा बोलत असलेला पाहून निशा कशीबशी हसू आवरत होती.
"तुला कुठे फिरायचं आहे निशा?"
त्याने आता आपली नजर तिच्याकडे वळवली होती.
"कुठेच नाही. मला फिरायचा कंटाळा येतो. त्यापेक्षा ते दोघे म्हणत आहेत तिथेच जाऊ. फिरणंही होईल आणि खरेदीही होऊन जाईल."
त्याने वैतागून तिच्याकडे पाहिलं.
'अशी काय आहे ही! मुलखाची आळशी आहे. काहीच नको आहे हिला. जेवणातही आवड नाही. फिरण्यातही नाही. जॉबही कुठे करायचा नाही. सगळं आयुष्य काय झोपून काढणार का ही?'
त्याने आली नजर रस्त्यावर वळवली होती. तिने मात्र त्याचा तो लूक पाहिला होता.
'घ्या, डेव्हील प्रिन्स मला शिव्या घालत आहे बहुतेक. घालू दे. माझ्याशी लग्न करायची मस्ती कोणाला होती? असंच पाहिजे. काहीतरी नखरे करणारी बायको हवी होती तर खरंच एखादी प्रिन्सेस शोधायची होती. माझ्यासारखी मिडल क्लास मुलगी शोभणारच नाही ह्या प्रिन्स बिहेवीअरला!'
विचार करून तिने आपली नजर बाहेर वळवली. हलकासा स्नोफॉल होत होता. ती रस्ता न्याहाळण्यात व्यस्त होती. आयुष्याचा हा प्रवास आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे हाच विचार करत असावी.
**************
क्रमशः
क्रमशः
निशिगंधा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा