मागील भागात..
आदित्य आणि निशा फायनली एका बेडरूममध्ये झोपायला तयार झाले. त्यांज शॉपिंग करायला जायचं ठरवलं आहे. हॅप्पी फॅमिलीचं त्याचं अधुरं स्वप्न पूर्ण होण्याची आशा नव्याने दिसत होती त्याच्या नजरेत. या पुढे कायम फ्रंट सीटवर निशाच बसणार आहे हे आदित्यने दोन्ही मुलांना स्पष्टच सांगितलं.
आदित्य आणि निशा फायनली एका बेडरूममध्ये झोपायला तयार झाले. त्यांज शॉपिंग करायला जायचं ठरवलं आहे. हॅप्पी फॅमिलीचं त्याचं अधुरं स्वप्न पूर्ण होण्याची आशा नव्याने दिसत होती त्याच्या नजरेत. या पुढे कायम फ्रंट सीटवर निशाच बसणार आहे हे आदित्यने दोन्ही मुलांना स्पष्टच सांगितलं.
आता पुढे..
ते सर्वजण एका मोठ्या मॉलमध्ये आले होते. अदा आणि आरव एवढे पुढे धावत होते की त्यावरूनच समजत होतं त्यांना ही जागा माहित आहे. ते नेहमीच इथे यायचे. निशाच पहिल्यांदा येत होती. ती आदित्यच्या बाजूने हळूहळू चालत होती.
'डेव्हील प्रिन्स! चाल की भरभर. कशाला स्टाईल दाखवत चालायचं आहे. मोठा हिरोच ना! मी तर कधीच पुढे निघून गेले असते. पण इथलं काही माहितच नाही आहे. कुठे हरवले तर कॉन्टॅक्ट नंबर पण नाही आहे माझ्याकडे.'
त्यानेही पाहिलं होतं की ती त्याच्यापासून जवळच हळूहळू चालत होती.
"आधी क्लोथ्सचं पाहूया. इथे आलो आहोत म्हणजे मुलांनाही नवीन हवे असतील."
आदित्यने सांगितलं. तिने नेहमीसारखी मान डोलावली.
ती बोलायचं एवढं का टाळते ते त्याला अजूनही समजलं नव्हतं. तिच्याशी पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा मुलगी बोलकी आहे, सर्वांना आपलंसं करून घेते असं काहीतरी ऐकलं होतं त्याने. कितपत खरं होतं यावर त्याला संशय येऊ लागला होता. ते क्लोथ्स सेक्शनमध्ये शिरले. तिथे एवढे वेगवेगळे कपडे पाहून निशा निरखत होती. छोट्याश्या दुकानात जाऊन फक्त सणावाराला नवीन कपडे घ्यायचे असं ती करत आली होती. इथे काय घ्यायचं आणि किती घ्यायचं हा मोठा प्रश्न होता तिच्यासमोर. अदा आणि आरव तर कधीच किड्स सेक्शनमध्ये पोहोचले होते. वेगवेगळे ड्रेस काढून ट्राय करून एकमेकांना दाखवण्याचं त्यांचं काम सुरु होतं. आदित्यने निशाकडे पाहिलं.
'ही का अशी मधेच पुतळ्यासारखी उभी आहे? आता हिला शॉपिंगही करायला येत नसेल का?'
"निशा!"
शेवटी त्यानेच हाक मारली.
"अं? काय अहो?"
"तुला मी इथे शॉपिंगसाठी आणलं आहे. नुसतं पाहायला नाही. तुला हवं ते घे ना."
तो एका बाजूला उभा होता. ती हळू त्याच्याजवळ आली.
"तुमचं बजेट काय आहे ते सांगा. मुलांना सांगितलं का? नाहीतर अशाने सगळं दुकान खरेदी करायची तयारी दिसतेय त्यांची."
निशाची नजर अधुनमधून आरव आणि अदाकडे जात होती. आवडला की ड्रेस टाकला ट्रॉलीमध्ये असं सुरु होतं त्यांचं.
'बजेट? सिरिअसली? का ही असं डोकं फिरवते सतत?'
आदित्यने तिचा हात पकडला आणि तिथल्या सेल्सगर्लला हातानेच बोलवलं. ती लगेचच त्यांच्यासमोर आली.
"येस सर?"
त्याने तिच्या हाताला धरून तिला पुढे केलं.
"मीट माय वाइफ, निशा. हिला सूट होतील असे ड्रेसेस शोधा. भरभर काम करा. आय नीड इच स्टाईल ऑफ क्लोथ्स इन हर क्लोजेट!"
"ओह.. ओके सर. मॅम, प्लिज कम हिअर."
त्या मुलीने इशारा केला. तशी निशा तिच्या मागोमाग गेली.
"ए बाई, कमी गं. पन्नास तरी ड्रेस सिलेक्ट केलेस तू मगाचपासून. मला काही तुझं दुकान खरेदी करून नाही न्यायचं आहे."
निशा त्या मुलीकडे पाहून म्हणाली.
ती मुलगी कडवट हसलेली तिला जाणवलं.
"सरांनी सांगितलं आहे म्हणून करत आहे. किती फरक आहे ना सरांच्या चॉईसमध्ये, कुठे एव्हा मॅम आणि कुठे तुम्ही! सर एव्ह मॅमना इथे घेऊन यायचे तेव्हा आम्ही सगळ्याजणी अक्षरश: जळायचो त्यांच्यावर. काय परफेक्ट कपल दिसायचे दोघे! आणि इथे तुम्ही आहात. सर मोठ्या कंपनीचे मालक आहे. इव्हन तुम्हांला माहित नसेल तर हा मॉलही त्यांचाच आहे. त्यांच्या स्टॅंडर्डला तुम्ही शोभलं पाहिजे ना म्हणून इतके कपडे घेत आहेत तुम्हांला. त्यांच्या किड्सकडे पाहिलं का तुम्ही? त्यांना व्यवस्थित माहित आहे की आपले डॅड अब्जाधीश आहेत. ते तिघे कसे मस्त आपलं लाईफ एन्जॉय करत आहेत. जाणवतही नाही आहे की त्यांना तुमची गरज आहे त्यांच्या लाईफमध्ये."
ती मुलगी फार बोलली होती. निशाने मूकपणे ऐकून घेतलं.
एव्हा! ज्या एव्हाबद्दल ती मुलगी बोलत होती, त्या एव्हाची निशा एकेकाळी फार मोठी फॅन होती. एव्हा अमेरिकन एक्ट्रेस होती आणि आदित्यची पहिली बायको. अदा आणि आरव ही तिचीच मुलं होती. पण ती त्याला का सोडून गेली, अदा आणि आरवचं काय याबद्दल निशाला काहीच माहित नव्हतं. तिच्या घरच्यांनी लग्न ठरवलं आणि ती निमूटपणे तयार झाली. त्याच्या आणि आपल्या वयातला सहा वर्षांचा फरक, त्याला असणारी दोन मुलं.. हे सगळं तिला सांगण्यात आलं होतं. मात्र अस्वीकार करण्याचा, हे स्थळ स्पष्टपणे नाकारण्याचा काहीच अधिकार तिला दिलेला नव्हता. फक्त फॉर्मेलिटी म्हणून तिला फक्त सांगितलं होतं. अर्थात हे आदित्यला माहित नव्हतं की तिला याबद्दल काहीच माहिती देण्यात आलेली नाही.
त्या मुलीच्या बोलण्यामुळे तिचे डोळे भरून आले आणि वारंवार मनाला समजावूनही तिच्या डोळ्यांतून अश्रू ती मुलगी दाखवत असलेल्या त्या नवीन ड्रेसवर पडले. तशी ती मुलगी चमकून उठून उभी राहिली.
"अगं ए, रडू नकोस. मी एवढं काही नाही बोलले तुला. खरं आहे तेच सांगितलं. रडायला काय झालं?"
ती जरी रागात बोलून दाखवत असली तरी मनोमन फार घाबरली होती. आपल्यासमोर असणारी व्यक्ती आदित्य राठोडची वाइफ आहे हे क्षणभर ती विसरली होती.
"हा ड्रेस नको आहे मला. पॅक केले आहेत तेवढेच बस झाले. पेमेंट घ्या त्यांच्याकडून करून."
निशा तिथून उठून बाहेर आली. कसलं पेमेंट? मॉलच त्याचा होता हे ती विसरलीच. तिने किड्स सेक्शनकडे पाहिलं. आदित्य तिथे गेलेला होता. अदानेच त्याला बोलवून घेतलं होतं. ती एक ड्रेस ट्राय करून त्याला दाखवत होती. आरव ते पाहून हसत होता. निशाने पाणावल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. तिला त्या मुलीचे शब्द आठवले.
'ते कसे मस्त आपलं लाईफ एन्जॉय करत आहेत. जाणवतही नाही आहे की त्यांना तुमची गरज आहे त्यांच्या लाईफमध्ये.'
आदित्यचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. तिने एक नजर त्या तिघांकडे पाहिलं.
'त्यांना खरंच गरज नाही आहे माझी. अदा आणि आरव दोघेही गोड आहेत. तसंही आरवला मम्मा नको आहे. मला तरी मम्मा बनायचा शौक नव्हता रे. नाईलाज होता माझा. माझं मत कोणी विचारलंच नाही आणि डेव्हील प्रिन्स! हं.. माझं आयुष्य बदलून टाकलं तुम्ही डेव्हील प्रिन्स! भलेही एवढे कपडे घ्यायला पैसे नव्हते माझ्याकडे कधी. पण मी माझ्या घरात सुखी होते. का मला आणलं इथे जर माझी कधी गरजच नव्हती?'
ती तिथून बाहेरच पडली. तिला जाताना त्या मुलीने पाहिलं. तिला तर धडकीच भरली. आदित्य राठोडची वाइफ.. त्याच्याच मॉलमधून अशी रडत बाहेर गेली आहे. तिच्या डोक्यात आता ट्यूब पेटली होती. आदित्यने तर तिला कधीच माफ केलं नसतं. त्याचा राग.. नो वेज. त्याला कोण सामोरं जाणार? आपण स्वतःहूनच काहीतरी नाटक करायचं तिने ठरवलं. पण त्याआधीच आदित्य तिथे आला. तशी ती घाबरली. त्याची नजर सगळीकडे फिरली. तो निशाला शोधत होता.
"निशा कुठे आहे?"
त्याने त्या मुलीला विचारलं. ती तर थरथर कापायला लागली होती. तिला असं पाहून तर आदित्यच्या मनात शंकेची पाल चुकचूकली.
"मी काय विचारतोय, निशा कुठे आहे?"
त्याचा आवाज चढला होता.
"स.. सर.. ते मॅम बाहेर निघून गेल्या. कुठे गेल्या माहित नाही. पॅक केलेल्या ड्रेसेसचं पेमेंट तुमच्याकडून घ्यायला सांगितलं आणि निघून गेल्या."
आदित्यच्या तर काळजात कळ गेली.
'निघून गेली? तिला तर काहीच माहित नाही आहे इथलं. पण ती अशीच कशी निघून जाईल.'
त्याने पटकन मॅनेजरला कॉल केला. तो धावतच तिथे आला.
"येस सर?"
"अदा आणि आरवला तुझ्यासोबत ठेव. दोघांना कुठेही जायला द्यायचं नाही. मी सीसीटीव्ही रूममध्ये जातोय."
मॅनेजरने होकार दिला. अदा आणि आरव त्याला ओळखत होते. त्यामुळे आदित्यला त्याबाबतीत काही टेन्शन नव्हतं. तो बाहेर धावला. सीसीटीव्हीतून त्याला दिसलं की निशा तर मॉलच्या बाहेर निघून गेली होती. पण कुठे? तो खूप घाबरला होता. ती त्याची जबाबदारी होती. तिला अमेरिकेतलं काहीच माहित नाही हे तिनेच स्पष्ट सांगितलं होतं. त्याने भरभर आपल्या माणसांना, बॉडीगार्ड्सना कॉल केले. त्याने ड्रायव्हरला कॉल करून अदा आणि आरवला घरी घेऊन जायला सांगितलं. तोही वेगाने मॉलमधून बाहेर पडला. तिला कुठे शोधणार हा मोठा प्रश्नच होता. कारण अजूनही दोघांकडेही एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबरही नव्हते.
**************
क्रमशः
क्रमशः
-निशिगंधा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा