मागील भागात..
ते सर्वजण एका मोठ्या मॉलमध्ये आले होते. ते नेहमीच इथे यायचे. निशाच पहिल्यांदा येत होती. आदित्यने तिथल्या सेल्सगर्लला हातानेच बोलवलं आणि निशाला शॉपिंगमध्ये मदत करायला सांगितली. ती मुलगी निशाला फार बोलली होती. निशाने मूकपणे ऐकून घेतलं. निशा तिथून बाहेरच पडली. आदित्यही वेगाने मॉलमधून बाहेर पडला. निशाला कुठे शोधणार हा मोठा प्रश्नच होता. कारण अजूनही दोघांकडेही एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबरही नव्हते.
ते सर्वजण एका मोठ्या मॉलमध्ये आले होते. ते नेहमीच इथे यायचे. निशाच पहिल्यांदा येत होती. आदित्यने तिथल्या सेल्सगर्लला हातानेच बोलवलं आणि निशाला शॉपिंगमध्ये मदत करायला सांगितली. ती मुलगी निशाला फार बोलली होती. निशाने मूकपणे ऐकून घेतलं. निशा तिथून बाहेरच पडली. आदित्यही वेगाने मॉलमधून बाहेर पडला. निशाला कुठे शोधणार हा मोठा प्रश्नच होता. कारण अजूनही दोघांकडेही एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबरही नव्हते.
आता पुढे..
आदित्यने शेवटी आपल्या मॉमला कॉल लावून निशाचा नंबर घेतला. हीच त्यांच्या नात्याची कमाल होती. तो तिच्याशी लग्न करण्यासाठी भारतात गेला होता. मात्र त्याने तिचा नंबर घेतला नव्हता. तो तिच्याशी एकदाही व्हाट्सअँप किंवा मेसेजवर बोलला नव्हता. आताही त्याने त्या नंबरला कॉल केला तर मोबाईल स्विच ऑफ येत होता. तो खूप घाबरलेला होता. त्याने शेवटी आपल्या सगळ्या बॉडीगार्ड्सना तो नंबर सेंड केला. ट्रेस करून का असेना ते तिथपर्यंत पोहोचणार होते. जवळपास अर्ध्या तासाने त्याला कॉल आला. त्याने लगेच रिसिव्ह केला.
"हॅलो!"
"बॉस, हा नंबर लोकेशन दाखवत होता तिथे आम्ही आलो आहोत. मॅम इथेच आहेत. सध्या आम्ही त्यांना कारमध्ये बसवलं आहे. घरी येऊ का त्यांना घेऊन? की तुम्ही इथे येणार आहात?"
"नको. मॉलसमोर या. मीही तिथेच जातोय."
"ठीक आहे बॉस."
त्यांनी कॉल कट केला.
आदित्यने सुटकेचा निश्वास सोडला होता. निशा सापडली ह्या वाक्यानंतर त्याच्या मनातली भीती कमी झाली होती. तो मॉलच्या दिशेने निघाला. काही वेळातच बॉडीगार्ड्स निशाला घेऊन तिथे पोहोचले होते. निशा कारमधून खाली उतरली. तिचा चेहरा ओढलेला दिसत होता. ती फार रडली आहे एवढंच आदित्यला समजलं. त्याला वाईट वाटलं. राहून राहून त्याच्या मनात येत होतं की ती त्याची जबाबदारी आहे. तो तिच्याजवळ आला.
"निशा, कुठे गेली होतीस? हे काय वागणं आहे गं? आधीच तुला इथली काही माहिती नाही. अशी कशी काय निघून जाऊ शकतेस? मी किती घाबरलो याची कल्पना आहे का तुला?"
निशाने रागानेच त्याच्याकडे पाहिलं.
"तुम्हांला काय करायचं आहे? तुम्हांला थोडीच फरक पडतो? तुम्ही तिघे तुमच्या आयुष्यात खुश आहात. तुम्हांला माझी गरज नाही आहे. मला समजतच नाही आहे की तुम्ही माझ्याशी लग्न का केलं. मी माझ्या आयुष्यात खुश होते. तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश होतात. मग उगाच मला असं इथे आणायची गरजच नव्हती. मला नाही सहन होत आहे हे!"
तिच्या डोळ्यांत साचलेले अश्रू गालावर ओघळू लागले होते. रडतच तिने त्याला मिठी मारली. तो अलगद तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला समजवू पाहत होता. त्याचा स्पर्श पहिल्यांदाच होत असल्याने तिच्या मनात काहूर माजलं होतं. पण त्याचं असं जवळ घेऊन समजावणं हवंहवंसं वाटत होतं. त्यालाही तिचं असं त्याच्या मिठीत येणं आवडलं होतं. मात्र त्याच्या मनात तिच्यासारखा भावनांचा गोंधळ नव्हता. निशाच्या बोलण्यावरून ती सेल्सगर्ल नक्कीच निशाला काहीतरी बोलली आहे एवढं त्याला समजलं.
"लूक निशा, आय नीड यु इन माय लाईफ! हे लग्न मी फक्त अदा आणि आरवसाठी नाही केलंय. मलाही कोणाची तरी गरज होती. एक असा जोडीदार जो मला समजून घेऊ शकेल. माझं दुःख जाणू शकेल. तुला कोण म्हणालं की आम्हांला तुझी गरज नाही? आम्ही म्हणालो का?"
आदित्य शांतपणे तिच्याकडून ते सगळं काढून घ्यायचा प्रयत्न करत होता. त्यालाही आपली गरज आहे हे ऐकून तिला जरा बरं वाटलं. त्याच्या मानाने ती लहान होती. काय लपवून ठेवावं, काय बोलावं याचा तिला अनुभव नव्हता.
"तुम्ही नाही पण ती मुलगी म्हणाली ना! मला माहित आहे मी तुमच्या आधीच्या बायकोसारखी सुंदर नाही आहे. ती एक्ट्रेस होती. तेवढी सुंदर मी कशी असणार? आणि तिने मला हेही सांगितलं की तुम्ही माझ्याशिवाय खुश दिसता. मी शोभत नाही तुम्हांला असं एकंदर सांगणं होतं तिचं. मला माहित आहे मी तुम्हांला शोभत नाही. पण मी आले होते का तुमच्याकडे माझ्याशी लग्न करा असं सांगायला? शोभतच नाही तर लग्न कशाला केलंत मग?"
निशा पाणावल्या डोळ्यांनी त्याला जाब विचारत होती. त्याचा चेहरा मात्र थंड होता. त्याने अलगद तिच्या गालांवर ओघळलेले अश्रू पुसले.
"हे मी नाही म्हणालो ना राणी? हे ती सेल्सगर्ल म्हणाली आहे ना? रेमेंबर, वी नीड यु, वी रिअली डू. राहता राहिला प्रश्न सेल्सगर्लचा तर तिचं काय ते पाहतो मी. तू आता घरी जा हं. मी अदा आणि आरवला आधीच पाठवून दिलं आहे. त्यांनी रडून रडून चार्ल्सचं डोकं उठवलं असणार. त्यांना प्लिज सांभाळ."
त्याने निशाला कारमध्ये बसवलं.
"त्या मुलीचं काय करताय तुम्ही?"
निशा आताशी भानावर आली होती.
"तुझा नवरा डेव्हील प्रिन्स आहे ना? तसं वागायला नको मग?"
तिचं नाक हलकंसं पिंच करत तो हसत मागे झाला आणि त्याने बॉडीगार्ड्सना नजरेनेच इशारा केला. तशा कार तिथून वेगाने निघाल्या.
'देवा! मी डेव्हील प्रिन्स म्हणते हे कसं समजलं? मेले मी आता. खरंच पाठवून देतील का परत माझ्या घरी? पण मी तर समोर कधी बोलले नाही. मग कसं समजलं?'
ती विचार करत होती. त्याने नाकाला केलेलं पिंच आठवून तिला हसू येत होतं. तो म्हणाला होता की त्यांना त्यांच्या आयुष्यात तिची गरज आहे. तिला थोडं बरं वाटलं होतं. तूर्तास त्या मुलीचं काय होईल हा विचार मागे पडला होता. ह्याचसाठी तर त्याने तसं केलं होतं. तिचं मन दुसऱ्या विचारात गुंतावं ही त्याची अपेक्षा होती.
दुसरीकडे तो मॉलमध्ये शिरला. त्याने मॅनेजरसकट त्या मुलीला बोलवून घेतलं. निशा सापडली की नाही हे अजूनही त्या दोघांना माहित नव्हतं.
"यु क्रेझी गर्ल, माझ्या वाइफला काय बोललीस तू?"
आदित्यने तिच्याकडे रोखून पाहत म्हटलं.
"म.. मी काही नाही बोलले सर."
ती आता फार घाबरली होती. ते तिच्या चेहऱ्यावरूनच समजत होतं.
"तू काहीच न बोलता तर ती निघून जाणार नाही ना? माझं डोकं उगाच फिरवू नकोस. सांग, काय बोलली होतीस तिला?"
त्याचा आवाज चढला होता. तसं मॅनेजरने तिला काय असेल ते सांगायचा इशारा केला. ती मात्र गप्पच राहिली. निशा सापडली नसली तर आपण काय बोललो ते ह्याला माहित नसणार असा विचार तिने केला. तिच्या गप्प राहण्याने आदित्य जास्त भडकला.
"मूर्ख मुली! तुझी हिंमत कशी झाली तिला हर्ट करायची? फर्स्ट टाइम मी तिला शॉपिंगला घेऊन आलो होतो. इट वॉज स्पेशल! पण तू तर तिचा मूड स्पॉईल करून टाकलास. तिच्यासमोर एव्हाचं नाव का घेतलंस?"
त्याची रागीट नजर जराही तिच्यावरून दुसरीकडे हटली नव्हती. आता ती थरथर कापू लागली होती. तिचा जॉब धोक्यात होता हे तिला आता समजलं होतं.
"सॉरी सर! मी मुद्दाम नाही केलं. चुकून तोंडातून निघून गेलं. मॅमना हर्ट करायचा उद्देश नव्हता माझा. मला माहित आहे की त्या बॉसची वाइफ आहेत. असं असताना मी मुद्दाम का करेन? आय मिन.. चुकून माझ्या तोंडातून.."
"तुझ्या तोंडातून चुकून एवढं सगळं निघून गेलं? एव्हा कशी चांगली होती हे सांगितलंस. निशा कशी वाईट आहे हे तिला सांगितलंस. वर आम्ही तिघे तिच्याशिवाय कसे खुश आहोत हे एवढं सगळं काही चुकून निघालं असेल ना?"
आदित्य रागाने अक्षरश: लालेलाल झाला होता. त्याच्या कानाच्या पाळीवर लालसर रंग चढलेला पाहून मॅनेजर दचकला. त्याला समजलं की आता काही खरं नाही. त्यामुळे त्याने मधे पडायचं ठरवलं.
"बॉस, मी तिच्यावतीने माफी मागतो! वी आर सॉरी! मॅमना इथे येऊन असं सगळं पाहावं लागलं त्याबद्दल मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही.."
त्याची शार्प नजर मॅनेजरकडे वळली तसे मॅनेजरचे पुढचे शब्द घशातच अडकले.
"सस्पेन्ट हर! माझ्या ग्रुपमधल्या कुठल्याही कंपनीत, माझ्याशी डील करणाऱ्या कुठल्याही कंपनीत ती मला दिसत कामा नये. ज्या एव्हाचे गुणगान गात होतीस तिच्याकडे तुला जॉब मिळतोय का पहा फक्त."
तो उठून जायला निघाला.
"सर प्लिज. असं करू नका प्लिज. सर हा जॉब माझ्यासाठी महत्वाचा आहे. इट्स माय मिस्टेक. आय एक्ससेप्ट इट. मी मॅमची पण माफी मागायला तयार आहे. प्लिज सर."
ती विनंती करत होती. पण ऐकायला तो थांबलाच नव्हता. तो वाऱ्यासारखा सणसणत निघून गेला होता. त्या सेल्सगर्लने मॅनेजरकडे पाहिलं. त्याला समजलं की तिला काय विचारायचं आहे.
"माझ्याकडे काही पर्याय नाही. बॉसचा राग तुला माहित नव्हता का? त्यात एव्हा मॅमचं नाव त्यांच्या नवीन वाइफसमोर कसं काय काढू शकतेस तू! झोपेत बरळत होतीस का?"
तो वैतागला होता.
"सर जे झालं ते माझ्याकडून त्यांच्या नवीन वाइफचा अवतार बघून झालं. म्हणजे त्या बॉसच्या स्टेटसला शोभत नाहीत. त्यामुळे मला वाटलं की बॉस आणि त्यांच्यामधले रिलेशन तसेही चांगले नसतील. मला काय माहित की बॉस आणि त्यांचं रिलेशन एवढं चांगलं आहे आणि त्या बॉसना सगळं सांगतील वगैरे. हा जॉब माझ्यासाठी महत्वाचा आहे सर. प्लिज काहीतरी करा."
मॅनेजरने हताशपणे नकारार्थी मान डोलावली.
"मी काही नाही करू शकत. नुसतं बोलायला गेलो तर त्यांची नजर पाहिलीस ना? माझा पण जॉब जाईल अशाने. तुला एक पर्याय देऊ शकतो पण. बॉस कुठे राहतात तुला माहित आहे ना? तिथे जाऊन मोठ्या मॅडमना किंवा स्वतः निशा मॅडमना भेट. त्या दोघींपैकीच कोणीतरी थांबवू शकेल हे. नाहीतर शक्य नाही."
मॅनेजर तिथून निघून गेला. ती विचार करत तिथेच उभी होती. निशासमोर गेलं तर निशा माफच करणार नाही आणि मोठ्या मॅडम, म्हणजे आदित्यच्या आईचं आदित्य कितपत ऐकेल याबद्दल तिला शंकाच होती. पण उद्याच त्यांच्याकडे जायचं ठरवूनच ती बाहेर पडली.
दुसरीकडे आदित्य कारमध्ये बसून घरी निघाला होता. त्याने कंपनीत कॉल लावला होता. त्याने त्या मॉलच्या मॅनेजरचं नाव सांगून त्याची हाफ सॅलरी कट करण्याची ऑर्डर दिली. तिकडून लगेच ते नोट केलं गेलं. मॅनेजरला कदाचित याची कल्पना होती. आदित्य एवढा भडकलेला त्याने बऱ्याच वर्षांनी पाहिला होता. त्यामुळे सॅलरी हाफ कट होऊनही तो शांत राहिला.
**************
क्रमशः
क्रमशः
-निशिगंधा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा