Login

समजुतीची वाट साथसोबतीने

समजुतीची वाट सहजीवनातील
टीम: श्रावणी
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
समजुतीची वाट साथसोबतीने

भाग १

"काय म्हणतोस राहुल? पाहिलेस ना तू रीमाला आशिषच्या लग्नात! गप्पा ही मारत होते तुम्ही दोघेजण. आवडली का ती तुला? तिच्या बाबांनी आपल्याकडे काकांमार्फत तुझ्याविषयी विचारणा केली आहे."
गीता ताई आपल्या मुलाला विचारत होत्या.


राहुल 26 वर्षाचा झाल्यापासून त्या त्याच्यासाठी वधू संशोधन करत होत्या. दोन-तीन मुली बघून झाल्या होत्या. वधू वर सूचक मंडळातून आलेल्या स्थळांमधून
पण कुठे काही जमले नव्हते.

गीताताई आणि माधवराव यांचा एकुलता एक मुलगा राहुल. मध्यमवर्गिय सुखी कुटुंब. माधवराव बॅकेंत नोकरीला होते. राहुल एका खाजगी कंपनीत सुपरवायझर होता. गीताताई घरीच आर्ट क्राफ्टचे क्लासेस घेत.
नुकतेच त्यांच्या पुतण्याचे लग्न झाले होते. त्याच लग्नात पुतण्याच्या बायकोच्या मावस बहिणीशी राहुलची ओळख पुन्हा नव्याने झाली होती. खरे तर रीमाला राहुल आधीच ओळखत होता. कारण ती त्याच्याच कॉलेजमध्ये शिकत होती. ती त्याच्यापेक्षा ज्युननियर होती. पण काॅलेजच्या विविध कार्यक्रमात ते एकमेकांना भेटत असत. त्यामुळे दोघांची तोंडओळख होती.

आशिषच्या लग्नात ते पुन्हा एकदा भेटले. एकमेकांच्या घरच्यांनीही त्या दोघांना पाहिले आणि ते दोघं एकमेकांना अनुरूप आहेत असे वाटल्यामुळे गोष्टी पुढे चालू झाल्या होत्या.


"आई !आम्हाला माहिती आहे दोघांच्याही घरच्यांना आम्ही एकमेकांना अनुरूप वाटतोय परंतु पुढे जाण्याआधी मी आणि रिमा यांनी पुन्हा एकदा भेटायचं ठरवलेलं आहे." राहुलने आईला उत्तर दिले.


"ठीक आहे. भेटा पुन्हा एकदा आणि तुमचा निर्णय लवकर सांगा म्हणजे आम्ही तुमच्या दोघांच्या माथ्यावर अक्षता टाकायला मोकळे." गीता ताईंच्या अंगात एकदम उत्साह संचारला होता.


ठरल्याप्रमाणे राहुल आणि रिमा एकमेकांना भेटले.भविष्याविषयी, एकमेकांच्या विचारांविषयी, कल्पनांबद्दल, ते मोकळेपणाने बोलले. आपले एकमेकांशी जमु शकेल असे वाटल्याने आपल्या नात्याला नाव देण्याचे ठरवले आणि घरच्यांना होकार कळवला.


आता दोन्ही घरांमधून ,सनई चौघड्यांचे सूर लवकरच ऐकू येणार म्हणून उत्साहाचे वातावरण संचारले.
राहुलचे बाबा माधवरावांनी लग्नाची पुढील बोलणे करण्यासाठी रीमाचे आईबाबा वसंतरावांना आणि वीणाताईंना आपल्या घरी बोलावले. मुलांचा जरी होकार झाला असेल तरी पुढच्या सगळ्या गोष्टी तर त्या दोघांनाच ठरवायच्या होत्या.

रीमाच्या बाबांचे स्टेशनरीचे दुकान होते. वीणाताई शाळेत शिक्षिका होत्या. रीमाने बीकाॅम केले होते आणि ती बाबांना दुकानात मदत करत होती. तिचा भाऊ गौरव बारावीत शिकत होता.

सगळेच कुटुंब एकमेकांना भेटायला खूपच उत्सुक होते.

क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर
0

🎭 Series Post

View all