टीम: श्रावणी
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
समजुतीची वाट साथसोबतीने
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
समजुतीची वाट साथसोबतीने
भाग २
" या या वसंत भाऊ या विणाताई!" रविवारची प्रसन्न सकाळ. सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये बोलणी चांगली होतात म्हणून माधवराव आणि गीता ताईंनी वसंतराव आणि विणाताईंना गौरव सहित नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते.
इडली, सांबर, चटणी आणि जिलेबी असा सुटसुटीत बेत होता. सोबत छानशी कॉफी.
पहिल्यांदाच व्याह्यांच्या घरी जाणार त्यामुळे वसंतराव आणि विणाताईंनी सोबत मिठाई आणि फळे आणलीच होती. ते त्यांनी गीता ताईंच्या हातात दिले.
पहिल्यांदाच व्याह्यांच्या घरी जाणार त्यामुळे वसंतराव आणि विणाताईंनी सोबत मिठाई आणि फळे आणलीच होती. ते त्यांनी गीता ताईंच्या हातात दिले.
" याची काही गरज नव्हती" असे म्हणत त्यांनी त्यांच्या आग्रहाखातर ती स्वीकारली.
रीमा आणि राहुल आता एकमेकांना छानच ओळखत होते. रीमा पहिल्यांदाच त्यांच्या घरी आलेली होती. राहुलने तिला आपले छोटेसे थ्री बीएचके चे घर दाखवले. सगळीकडे प्रसन्नता भरून असणारे ते घर बघून रीमा भारावून गेली. या घरातली लक्ष्मी म्हणून तिला इथे प्रवेश करायचा होता.
नाश्ता करून झाल्यावर दोन्ही कुटुंबीयांनी चर्चा करायला सुरुवात केली. माधवराव म्हणाले.
नाश्ता करून झाल्यावर दोन्ही कुटुंबीयांनी चर्चा करायला सुरुवात केली. माधवराव म्हणाले.
" आमचा एकुलता एक मुलगा आहे. आम्ही सर्व हौसमौज या लग्नामध्ये करून घेणार आहोत. आमचे जवळपास तीनशे साडेतीनशे नातेवाईक असतील पण तुम्ही काळजी करू नका..आपण लग्नाचा सर्व खर्च वाटून घेऊया म्हणजे तुमच्यावरही ओझं येणार नाही."
यावर वसंतराव म्हणाले..
"आमची ही एकुलती एक मुलगी आहे. गौरवचे लग्न काय होईल तेव्हा होईल त्याचे त्यावेळी बघता येईल.
आपण चांगले धुमधडाक्यात लग्न करूया.
त्यांचे बोलणे ऐकणारे रीमा आणि राहुल यांच्यात नेत्रपल्लवी झाली..
"आमची ही एकुलती एक मुलगी आहे. गौरवचे लग्न काय होईल तेव्हा होईल त्याचे त्यावेळी बघता येईल.
आपण चांगले धुमधडाक्यात लग्न करूया.
त्यांचे बोलणे ऐकणारे रीमा आणि राहुल यांच्यात नेत्रपल्लवी झाली..
राहुल ने बोलायला सुरुवात केली,
"आई बाबा मी आणि रीमाने लग्न कसे करावे? याविषयी थोडीशी चर्चा केलेली आहे. आमचे मत थोडे मांडू का?"
"आई बाबा मी आणि रीमाने लग्न कसे करावे? याविषयी थोडीशी चर्चा केलेली आहे. आमचे मत थोडे मांडू का?"
"अरे! विचारता काय! तुमच्या दोघांच लग्न आहे. तुमच्या मताला तर आम्ही महत्व देणारच ना.
बोला !बोला !काय काय हौस करायची आहे तुम्हाला?" वसंतराव रीमाचे बाबा म्हणाले.
रीमाने बोलायला सुरुवात केली.
"सांगते ऐका! बाबा मला माहिती आहे की, तुम्ही माझ्या लग्नासाठी जवळपास 15 लाख रुपये जमवून ठेवलेले आहेत."
"सांगते ऐका! बाबा मला माहिती आहे की, तुम्ही माझ्या लग्नासाठी जवळपास 15 लाख रुपये जमवून ठेवलेले आहेत."
"हो हो मग मला आणि तुझ्या आईला तुझं लग्न चांगलं थाटामाटातच करायचं होतं. म्हणून तुझ्या जन्मापासूनच तर मी हळूहळू सेविंग सुरू केले होते आणि आता ते म्युचल फंड आणि इन्वेस्टमेंट चांगल्याच वाढलेल्या आहेत. त्यामुळे आपण छान लग्न साजरे करू शकतो."वसंतराव म्हणाले.
माधवरावांनीही बोलायला सुरुवात केली.
"राहुल.. मीही बऱ्याच वर्षापासून तुझ्या लग्नासाठी सेविंग करून ठेवलेले आहे. पंधरा लाख रुपये तर आम्हीही सहज खर्च करु शकतो."
"बाबा याविषयीच आम्हाला बोलायचे आहे. एवढे 30 लाख रुपये आपण लग्नासाठी खर्च करणार आणि त्यातून पुढे काहीच निष्पन्न होणार नाही. हे पैसे तर खर्च होऊन जातील. फक्त तुम्ही जे दागिने द्याल, ते शिल्लक राहतील नी फोटोच्या रूपामध्ये तो थाटमाट अस्तित्वात राहील." राहुल म्हणाला.
"अरे सगळी लग्न अशीच तर होतात. आपण नाही का कितीतरी लग्नांना जातो असा खर्च सगळे मुला मुलींचे पालक करतच असतात."माधवराव म्हणाले.
यावर राहुलने पुन्हा बोलायला सुरुवात केली.
"हो म्हणूनच तर मी आणि रीमाने थोडा वेगळा विचार केलेला आहे. बघा तुम्हाला पटतं का?"
" सांगा तुम्ही दोघेजण मोकळेपणाने . आम्ही नक्कीच तुमच्या मताचा आदर करणार आहोत."वसंतराव म्हणाले.
मग रीमा बोलायला लागली
" बाबा माझे आणि राहुलचे असे म्हणणे आहेत की हे तीस लाख रुपये लग्नासाठी खर्च करण्यापेक्षा आपण फक्त पाच लाख रुपये बजेटमध्ये खर्च करून माझे मोजके दागिने आणि थोडेसे कपडे लागतात ते घेऊया. अगदी आपल्या दोन्हीकडचे मिळून वीस पंचवीस वीस पंचवीस नातेवाईक असा साधा खर्च करून लग्न करूया
आणि हे जे उरलेले पैसे आहे त्यातून आपल्या नाशिक सारख्या शहरांमध्ये आत्ता हे राहुल चे घर आहे याच्या जवळपास एखादे वीस लाख रुपये पर्यंत दुकान विकत घेऊया . पाच लाख रुपयांचे सामान भरून, एक स्टेशनरीचे दुकान चालू करूया. तुमच्यासोबत दुकानांमध्ये मदत करताना मला बरेच बारकावे कळलेले आहेत. माझा स्वतंत्र व्यवसाय उभा राहील आणि पुढे माझी आणि राहुलची आयुष्यभराची सोय होईल. बघा पटते का तुम्हाला ?
काय असेल तर राहुल-रीमा च्या घरच्यांचचे मत.
बघूया पुढच्या भागात.

भाग्यश्री मुधोळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा