Login

समजुतीची वाट साथसोबतीने भाग३

समजुतीची वाट सहजीवनातील
ञ्टीम: श्रावणी
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
समजुतीची वाट साथसोबतीने


भाग ३


"अरे राहुल..रीमा..असे कसे बोलताय तुम्ही? आपण असे घरच्याघरी पन्नास साठ जणांमध्ये लग्न केले तर समाजातले लोक काय म्हणतील? आमची हौसही आहे तुमचे लग्न म्हणजे." गीता ताई राहुलची आई म्हणाली.


"हो ना..रीमा, मी ही तुझ्या लग्नासाठी काय काय विचार करून ठेवला होता. आता एवढा साध्या पध्दतीने लग्न केलं तर कसं बरं होणार?"वीणाताई म्हणाल्या.


"हो ना आपले सगळे नातेवाईक आणि मित्रमंडळी काय म्हणतील?थोडक्यात आटोपलं मुलाचं लग्न." माधवराव म्हणाले.


यांचे बोलणे ऐकणारे वसंतराव आता शांतपणे बोलायला लागले.


"विणा..माधवराव..आणि गीताताई आपण शांतपणे रीमा आणि राहुल म्हणताहेत त्या गोष्टीवर विचार करूया. मला तर त्यांचे विचार थोडे थोडे पटत आहेत. खरोखरच तीस लाख रुपये खर्च करून आपण काय साध्य करणार आहोत?
त्यापेक्षा या मुलांचे विचार ऐकले तर रीमाचे आणि राहुलच आयुष्य उभे राहील. लोक काय म्हणतील? याचा कशाला विचार करायचा? हे लोक चार-पाच दिवस बोलतील चर्चा करतील आणि विसरूनही जातील. आपल्याला आपल्या मुलांचा आनंद जास्त महत्त्वाचा असला पाहिजे. काही जणांना जर आपलं वागणं पटलं..तर ते त्यांच्या मुलांसाठीही हे आचरणात आणतील. लग्न साधेपणाने करून उरलेल्या पैशांमध्ये मुलांचे आयुष्य उभे करतील.
अगदी काही कोर्ट मॅरेज वगैरे करायचे असं तर मुलं म्हणतच नाही. आपण एखाद्या देवळामध्ये आवश्यक विधी करून व्यवस्थित लग्न करूया. आपले अगदी जवळचे बहिण भाऊ अशा आपण दोन्ही कुटुंबीयांनी बोलवले तर 50 जणांमध्ये छानसे लग्न पार पडेल. त्यानंतर एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊया.आणि फोटो वगैरे तर आपल्याकडेही चांगले हायफाय कॅमेरे आहेत. त्याने मोबाईल मध्ये फोटो काढूया. त्या आठवणी तर राहतीलच. चार दिवसांचे चार सोहळ्यांचे कपडे घेत बसण्यापेक्षा दोन मोजके छानसे कपडे घेऊयात. लग्न आनंदाने पार पाडूया. मला तर मुलांचं म्हणणं पटतंय. हवं तर आपण चार-पाच दिवस विचार करूया. पुढच्या रविवारी तुम्ही आमच्याकडे या आणि मग पुन्हा एकदा आपण काय ते नक्की ठरवूया. "
वसंत रावांनी मुलांना अशा प्रकारे पाठिंबा दर्शविला. आणि इतर तिघांनाही विचार करायला त्यांनी भाग पाडले. त्यांनी पुढच्या रविवारी काय ते ठरवू, असे म्हणून निरोप घेतला.
काय असेल निर्णय?
बघूया पुढच्या भागात

भाग्यश्री मुधोळकर
0

🎭 Series Post

View all