Login

समजुतीची वाट साथसोबतीने भाग ५ अंतिम

समजुतीची वाट सहजीवनातील
टीम: श्रावणी
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
समजुतीची वाट साथसोबतीने


भाग ५
अंतिम भाग

लग्नाचा वाढदिवस करून आनंदात ऑफिसला गेलेला राहुल उदासवाणा होऊन दुपारीच घरी परत आलेला.त्याला बघून गीता ताई आणि रीमाला दडपण आले.


"काय झाले राहुल ?तुला बरे वाटत नाही का? असा अचानक का बर परत आलास? सकाळी तर ओके होतास."रीमाने विचारले.


" राहुल काय झालं सांग बरं!" गीता ताई पण आपुलकीने म्हणाल्या.


"आई आमची कंपनी अचानक बंद पडली आहे. आमच्या मालकांना काही दिवसांपूर्वी एका खूप मोठ्या प्रोजेक्टमध्ये खूप तोटा झाला आणि आता त्यांना त्यातून बाहेर पडता येत नाहीये. कंपनी बंद करून विकणे एवढेच त्यांच्या हातात आहे. आजच.. आता त्यांनी आम्हाला नोटीस दिली नी सांगितले की या महिन्याचा पगार ते कसेबसे देतील. पण पुढच्या महिन्यापासून सगळ्यांनी आपापला मार्ग शोधावा. आता पुन्हा मला नोकरी शोधावी लागणार. कसं होणार माझं?" राहुल खूपच चिंतेत होता.


"अरे राहुल एवढेच झाले ना! किती टेन्शन घेतोस तू." रीमाने त्याला धीर देत म्हटले.


"उलट ही नोकरी गेली याकडे तू एक संधी म्हणून बघ."


"अगं माझी नोकरी गेली आणि तुला यात संधी कसली दिसते? रीमा अख्ख आयुष्य पडलंय आपल्यापुढे. सध्या कारखान्यांच्या क्षेत्रात किती मंदी चालू आहे माहित आहे ना तुला. मला दुसरी नोकरी मिळणं पण सोपं नाहीये."राहुल म्हणाला.


"अरे राहुल नोकरी गेली ना फक्त. आपल्याकडे आपला बिझनेस आहे ना. माझा स्टेशनरीच्या दुकानात किती चांगला जम बसलाय ते बघतोच आहेस ना तू. त्या ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा आपल्याच बिझनेस मध्ये मला मदत कर ना. आपण शाळा, बँका त्यांना स्टेशनरी पुरवण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो. मला एकटीला एवढं सगळं झेपणार नाही. म्हणून मी पुढे जात नव्हते. पण आता तू जर माझ्या मदतीला आलास तर आपण या स्टेशनरी क्षेत्रातच खूप पुढे जाऊ शकतो. कळतंय का तुला. तू आता सहा महिने माझ्यासोबत काम तर करून बघ. तसंही तुझ्याकडे काम नसले तरी एक दीड वर्ष आपलं सर्व व्यवस्थित भागू शकेल एवढं सेविंग आहेच ना. मग एवढी काळजी कशाला करतोस?"रीमा व्यवस्थित समजावत होती.


रीमा चे बोलणे ऐकून राहुललाही मनातून उभारी मिळाली. नोकरी गेली म्हणजे सारे काही संपले असे नाही, तर आपण वर्षभरापूर्वी जो निर्णय घेतला होता त्याच्यामुळे आज आपण निर्धास्तपणे नवी सुरुवात करू शकतो. याचे त्याला समाधान वाटले.
त्याने रीमा सोबत सहा महिने काम करायचे ठरवले. सहा महिने नाही जमले तर पुन्हा नोकरी करण्याचा मार्ग त्याच्यापुढे खुला होताच.
राहुलने मनापासून मेहनतीला सुरुवात केली. सहा महिन्यांमध्ये आठ नऊ बँका आणि तीन-चार शाळांचे चांगले स्टेशनरी पुरवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि आता तर त्यांना गोडाऊन साठी अजून जागा घेण्याची गरज पडली. वसंतराव माधवराव यांनी पुन्हा एकदा दोन्ही मुलांना मदत केली आणि दोघांचे आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने मार्गी लागले.
समजुतीची वाट ते साथसोबतीने चालत होते.
लग्नासारख्या गोष्टीवर केवळ दिखावा करण्यासाठी खर्च न करता आपले आयुष्य उभे करणारे रीमा राहुल खूप जणांपुढे पुढे आदर्श ठरतील यात शंकाच नाही.


भाग्यश्री मुधोळकर
0

🎭 Series Post

View all