Login

ग्राहक राजा जागा रहा

ग्राहकांच्या होणार्‍या फसवणुकी

15 मार्च जागतिक ग्राहक दिन .
आता सोशल मीडिया आणि माध्यमांनी एवढी जागृती केलेली आहे की साधारण दुकानात खरेदी करताना, ग्राहक फसणे, कमी झाले आहे.
एक्सपायरी डेट बघून वस्तू खरेदी करणे, एमआरपी बघून वस्तू खरेदी करणे, घेतलेले वस्तूचे किंवा सेवांचे बिल घेणे, यासाठी ग्राहक आग्रही राहतात आणि त्यामुळे फारशी फसवणूक होत नाही.
पण प्रत्येक काळाप्रमाणे फसवणुकीचे प्रकार बदलतात. तसेच आत्ताच्या काळातही फसवणुकीचे प्रकार बदललेले आहेत.
राकेश एक नुकताच नोकरीला लागलेला तरुण.
25 हजार रुपये पगार.
मेहनतीने काम करायचे आणि 25 हजार रुपये घ्यायचे. घर खर्चाची किंवा घरातली फारशी जबाबदारी नाही. त्यामुळे दहा हजार रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवून, उरलेले 15000 रुपये तो बचत करू शकतो. त्याला एका ठिकाणी 24% परताव्याचं अमिष मिळालले.
त्याने तिथे पैसे गुंतवायला सुरुवात केले.
पहिले वर्षभर दरमहा जे पंधरा हजार गुंतवले, त्यावरती तो गुंतवत होता त्या प्रमाणात व्याज व्यवस्थित मिळाले. त्यानंतर शेअर मार्केट पडलेला आहे, सध्या काही फायदा होत नाही, असे म्हणून त्या पैसे गुंतवणाऱ्या ब्रोकर ने, हात वर केले. मुद्दलही गेली आणि व्याजही नाही.
अशी फसवणूक होऊ नये, म्हणून साधारणतः सेबीने मान्यता दिलेले जे ब्रोकर असतात ,त्यांच्या मदतीने म्युचल फंड, पोस्ट किंवा बँकेत एफडी या पद्धतीने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते, किमान आपली मुद्दल सुरक्षित राहते.
व्याज कमी मिळाले तरी मिळत राहते.

सारिकाला ऑनलाईन खरेदी करायला फार आवडायचे. कुठे स्कीम आहे म्हणून, एकावर एक फ्री, अशा पद्धतीने ती खरेदी करत राहायची. मग आपल्याला त्या वस्तूची खरच गरज आहे का? आपण ती वापरणार आहोत का? याचा विचारच नाही.
फक्त एकावर एक फ्री मिळतंय किंवा स्वस्तात मिळते, म्हणून केलेली खरेदी. मग बऱ्याचदा घेतलेली वस्तू, कपडे, दागिने न वापरता पडून राहते.
पण आपण स्वस्तात खरेदी केल्याचे, समाधान.
खरंच आज ग्राहक राजाला, याची गरज आहे का?
पैसे आहेत म्हणुन खर्च केलेच पाहिजे का?
एकदा सारिका ने हजार रुपयांमध्ये चार वस्तू मिळणार होत्या, ज्याची एमआरपी प्रत्येकी एक एक हजार रुपये होती ,ती खरेदी केली.
त्यासाठी ऑनलाईन जाऊन आधीच पेमेंटही केले, ती साईट विश्वासू आहे का? ॲमेझॉन flipkart सारखी आहे का? याची काहीही खातरजमा केली नव्हती.
फक्त 4000 रुपयाची खरेदी आपल्याला 1000 रुपयात होणार आहे, याच्या समाधानासाठी तिने 1000 रुपये भरले .
पण प्रत्यक्षात ते हजार रुपये गेले. ना ती कंपनी अस्तित्वात होती, ना तिथे असलेला फोन नंबर ,.
ज हजारो मुलं मुली अशा प्रकारचे, वेबसाईट तयार करून ग्राहकांना लुटून कमाई करत आहेत,(खरे तर त्यांना सलाम)
आपण त्याला बळी पडत आहोत. आपल्याला गरज असणारी वस्तूच घेणे, शक्यतोवर दुकानातून घेणे आणि ऑनलाईन घेतली तरी, ती विश्वासू साइटवर न घेणे सध्या गरजेचे आहे.
आज जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने एवढेच म्हणेन, की आज ग्राहकाकडे क्रयशक्ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे .त्यामुळे बऱ्याच न लागणाऱ्या वस्तूंची ही खरेदी होत आहे. नको त्या ठिकाणी गुंतवणूक होत आहे.
येणाऱ्या फोनवर ओटीपी मागणारे, काहीतरी आर्थिक आमिष दाखवणारे किंवा भीतीदायक परिस्थिती निर्माण करून, आपल्याला बळी पाडणारे स्कॅमर, फसवणूक करणारे ,अस्तित्वात येत आहेत.
अशावेळी आपण आपली सारासार विवेक बुध्दी, आर्थिक व्यवहार , या साऱ्यांबाबत जागरूक राहून, ओटीपी देताना सावधानता बाळगणे, आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड, त्याचे पिन या सर्वांबाबतही सावध राहायला हवे.
काळाचा वेग प्रचंड आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकी ग्राहक राजाच्या वाटायला येतच राहणार. शक्य तितकं जागरूक राहून आणि आपल्यावर अन्याय झालाच, तर त्यासाठी तक्रार करून त्याचा पाठपुरावा करणे, यासाठी आपण एक ग्राहक म्हणून जागरूक राहायलाच हवे.