बंधन आणि वाचकांच्या नजरेतला शेवट
नमस्कार, सर्व रसिकवाचकांना गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा.
शिर्षक वाचून म्हणाल, बाप्पा आले आणि ' शेवटा ' च्या गोष्टी कुठे करता! तर तुम्हा बर्याचणांच्या शंका आहेत त्यांचं निरसन करावं म्हणून हे आजचं मनोगत आहे. कथेचे पुढचे भाग येतीलच पण पुढे जाण्यापूर्वी तुमचे जे नेहमीचे प्रश्न असतात, की विक्रम सर्वच बाबतीत सरस असतानाही अनघाला त्याने हो म्हटलं तेव्हा तिने अस का याचा विचार का केला नाही? विक्रमने कॉलेजमध्ये गैरव्यवहार का केले? राजेश इतकं क्रूर का वागतो? नताशा कोणालाही ओळखत नसताना उगीच या प्रकारात का आली? अनघाला कस कळलं नाही की विक्रमच खरा गुन्हेगार या सगळ्याची उत्तरं आधीच्या सर्व भागात पात्रांच्या संवादांतून आणि त्यांच्या मनात त्या त्या वेळी चाललेल्या विचारांमधून आलेली आहेत. त्या त्या प्रसंगी याचं सविस्तर स्पष्टीकरण दिल गेलयं.
दुसरा तुमचा प्रश्न असतो, कथेत इतका ज्वलंत विषय आहे पण वास्तवातले बरेचसे मुद्दे आलेच नाहीत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणतही साहित्य कथा, कादंबरी, कथामालिका हि वास्तववादी कधीच नसते. समाजशास्त्राची पुस्तकं आणि साहित्य यात हाच तर फरक असतो. कोणतही साहित्य हे आपल्या आजूबाजुच्या समाजाचं निव्वळ प्रतिबिंब असतं. आता इथेही विक्रम जरी अत्याचार करणारा माणूस असला तरीही वास्तवाच्या पलिकडे बर्याचश्या गोष्टी ते पात्र दाखवतं त्यामुळे तो ' नायक ' बनतो. साहित्य हे वास्तववादाच्या पलिकडे दहा पावलं असतं आणि ते कल्पनेच्या चष्म्यातूनच पहायच असतं. समाजात अश्या घटना घडतात तेव्हा शिक्षा, बंड हे येतचं आणि ते जस ज्या तसचं साहित्यात येत असेल तर त्यात नवनिर्मिती काय! कोणतीही कादंबरी, कथा पुर्णपणे वास्तववादाच्या चौकटीत बसूच शकत नाही कारण त्याला कल्पनेची नी भावनांची जोड असते. वास्तववाद हा साहित्याचा एक पैलू असतो. जे समाजात घडतं ते शंभर टक्के जसच्या तसच साहित्यात कधीच नसतं. अस अस झालं तर किती सुंदर होईल आयुष्य! अस झालं असत प्रत्यक्षात तर किती वाईट झाल असतं! या जर - तर च्या निकषावरतीच साहित्य असतं. इथेही विक्रमसारखं सगळे वागले तर किती फरक पडेल! भाऊसाहेबांसारखा प्रत्येक वडिलधारा माणूस असेल तर किती छान होईल! या जर तर तत्वावरतीच ही कथाही आहे. साहित्य हे माणसांनी कस असावं आणि कस असु नये हे सांगत असतं. त्यामुळे कथेतले सर्व प्रसंग तुमच्या वास्तववादाच्या फुटपट्टीवरती मोजू नका.
तिसरी गोष्ट शेवटी मग काय होईल? आता हे वाचून काहीजण म्हणतील, मग तुम्ही काय त्याला एवढा गुन्हा करुन सोडून देणार ! काही बुद्धीवाद्याना समाजाची काळजी खूप असते त्यामुळे बर्याच गोष्टी काढून माझ्यावरती काही स्त्रीवाचक टिका करत असतात. तर विक्रमला शिक्षा होईल....काही कोमल मनाचे वाचक आहेत ज्यांना वाटत इतक सगळ घडलय शेवट गोड व्हावा आणि काहीजणांना वाटतय, शिक्षा व्हायला हवी....मी आधीही म्हटलं होतं ही कथा पूर्णतः वास्तववादी नसून काल्पनिक आहे. मी असही म्हटलं होतं ही हळवी प्रेमकथा आहे ज्याचा चुकीचा अर्थ घेऊन काहींनी प्रेमच नाही, रोमांन्सच नाही म्हटलय तर हळवी प्रेमकथा आणि फुल रोमँन्टिक कथा यात अंधुकशी रेषा असते जी समजून न घेता त्या कमेंन्ट्स होत्या. आता विक्रमला शिक्षा होईल आणि त्यासाठी साहित्यात ' Poetic Justice ' नावाची संकल्पना असते त्याचा वापर होईल. त्यासाठी पुढे त्या प्रमाणे भागांची रचना असेल. हे सगळ सांगण्याच कारण एकच, मी उगीच काहीतरी बेसलेस लिहणार नाही. मीही लिटरेचर ची स्टुडंन्ट आहे त्यामुळे साहित्याचे नियम मला कळतात.....बाकी पुढच्या महिन्यापासुन मी दुसर काम सुरु करतेय. या त्याच त्याच टिकेला उत्तरं द्यायला आता अजिबात वेळ नसेल. मन लावून वाचणारे बरेचसे वाचक आहेत त्यांच्या शंकांचं निरसनही करायचं होतं. कथेला पुष्कळ पुरुषवाचक आहेत. वयोवृद्ध मंडळी आहेत आणि कथा वाचल्यानंतर आपल्या पार्टनरचा विचार करणारे नवरा बायकोसुद्धा आहेत त्यामुळे कथेचा हेतू सफल झालेला आहे. बाकी इतर पात्रांविषयी गरज असेल तेव्हा ती डेवलप होतीलच. प्रत्येक पात्र आणि उपकथानक साहित्यात कधीच पुर्णपणे फुलवल जात नाही. अनघाचे माहेरचे, नताशा, समिहा यांची कथेत गरज असेल तेव्हा ती पात्र येतीलच.
धन्यवाद.....
Thank you soo much
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा