Login

बंधन: वाचकांचे आभार, सुखान्त की दुःखान्त

Social Love

बंधन: वाचकांचे आभार, सुखान्त की दुःखान्त

नमस्कार सर्व रसिकांना,

 हल्ली तुमच्या सोबत काही बोलले नव्हते बऱ्याच दिवसांत. आणि पार्टच्या शेवटी मनोगत लिहणंही आता बंद आहे. शंभर नंतर कथेतील वळणं, पात्रांचं वागणं या सगळ्या संबंधी शेवटच्या मनोगतात असेल. आता वर्षपुर्ती होतेय. डिसेंबर मध्येही आपण सोबत असणार आहोत रादर 31 डिसेंबरला अनघा - विक्रम तुमच्या सोबत असतील. तर आता तुम्ही म्हणाल म्हणजे भाग बरेच होतील. खरं तर भाग कमी आहेत पण लिहायला वेळ लागतो.बाकी कथेची सुरुवात, मध्य नी शेवट सगळं फेब्रुवारीतच ठरलेलं होतं त्या ट्रॅकप्रमाणेच कथा सुरु आहे. अध्येमध्ये काही बदल होणार नाही. सध्या 106 सुरू आहे. म्हटलं वेगळं काहीतरी लिहू म्हणून आजचं मनोगत. आभारासाठी सुद्धा आणि कथेत पुढे काय असणार याबद्दल सुद्धा तुमची उत्सुकता अगदी ताणली गेलीय तर तुमचं मन थोडं शांत करण्याचा प्रयत्न.

      सर्वप्रथम आतापर्यंत वाचलंत त्याबद्दल आभार. खरं तर आपली भेट चार-पाच दिवसातून एकदा होते. बरेच जण कथालेखन स्पर्धांमध्ये लिहितायत. काहींच्या समांतरपणे दोन ते तीन कथा सुरु आहेत. पण मी वर्षभर एकच कथा लिहितेय त्यामुळे आता ही नव्या स्पर्धांमध्ये मी लिहिणार नाही. मध्यंतरी नवीन कथा तुमच्यासाठी सुरू केली होती पण ती पब्लिश होऊ शकली नाही कारण स्टोरी लाईन अंधुक होती आणि माईंड स्विच ऑफ स्वीच ऑन करून एका कथेतून सहज दुसऱ्या कथेत शिरणं मला जमत नाही. त्यामुळे ती कथा कागदावरती येऊ शकली नाही. जी पात्रं असतील त्या सोबत लिहिणाऱ्याने एकरूप व्हावं त्यातून मिळणारा आनंद स्वर्गीय असतो. त्यामुळे दिवसभर माझ्या आजूबाजूला अनघा विक्रम असतात. मी दिवसभर मनाने सांगलीतच असते. घराबाहेर पडल्यावर कळतं आपण कोकणात आहोत तर हा गमतीचा भाग. पण हल्ली फेसबुक पेजला पार्ट लेट येतात. इतर लेखकांचे सुद्धा ब्लॉग क्रमाने यायला हवेत त्यामुळे मी पोस्ट केल्या केल्या लगेच त्याच दिवशी पार्ट येत नाही. त्यामुळे तुम्ही खूप वाट बघत असता. तर काही हुशार वाचक आहे त्यांना माहितीये इतर कथांची लिंक गरजेची असते. बंधन ला लिंक शेअर करण्याची गरज नाही. तुम्हाला सारखं फेसबुक बघत बसायला नको. वेबसाईट ओपन करून कुठे गेला भाग बरं असं म्हणत शोधत फिरायला नको. तुम्हाला गुगल वरून सहज वाचता येईल. Just type my name on Google आणि या जादू साठी म्हणून तुमचे आभार. मी म्हणते नेहमी की, वाचकवर्ग जितका मिळायला हवा होता तितका नाही मिळाला. पण प्रचंड लोकप्रियता मिळाली जी कोणत्याच लेखकाला किंवा कथेला नाही मिळाली. एखादा गायक असो अभिनेता असो की अजून कोणी कलावंत असो. आपण जे काही काम करतो त्या कामामुळे आपल्याला आयडेंटिटी मिळणे ही प्रत्येकाची इच्छा असते आणि या कथेची तितकी जादू आहे. त्यामूळे छान वाटतं लोकं जर आपल्याला गुगलला सर्च करत असतील. आपल्या नावाचे कीवर्ड्‍सचा सर्च इंजिनमध्ये येत असतील तर! सांगण्याचा हेतु हा, इकडे तिकडे पार्टची शोधाशोध करुन डोक्याला त्रास देऊ नका. 

 आता पुढे काय होणार?  गहन प्रश्न. मी आधीही म्हटलं होतं, हा कौटुंबिक वाद नव्हे की पती-पत्नीमधला वाद चला गैरसमज मिटले एकत्र आले. शेवटी हा गुन्हा आहे. आणि कायद्याची शिक्षा त्याला मिळणार नव्हती कारण शेवटी ही प्रेम कथा सुद्धा आहे. त्याची शिक्षा हीचं की त्याचं कौटुंबिक, सामाजिक आणि मानसिक पातळीवरती अधःपतन. त्यामुळे त्याला होणारी शिक्षा पोएटिक जस्टीजनुसार होईलच. कौटुंबिक पातळीवरती त्याला होणारा त्रास, घरच्यांनी त्याच्याशी संबंध तोडणे हे सगळं होतय. 
सामाजिक पातळीवर मानहानी राजकारणाच्या रूपाने तुम्ही पाहिली. आणि आता हळूहळू मानसिक पातळीवरील तो उद्ध्वस्त होणं.  कारण अनघाचीही अवस्था तशीच झाली होती. मग तुम्ही म्हणाल, त्याच्या प्रेमाचं काय ? एक लक्षात घ्या. प्रेम हे प्रेम असतं आणि त्याचं प्रेम खरय मग तो जिंकणारच ही साधी गोष्ट.

 आता प्रश्न उरतो, कथेला सामाजिक का म्हणायचं ? तिचं हरणं म्हणजे त्याचे जिंकण असेल. तिचं माघार घेणे म्हणजे त्याचे जिंकणं असेल तर तिच्यावरच्या अन्यायाचं काय ?माझ्या लघुकथांमधल्या नायिकाका सुद्धा इंडिपेंडंट, डिसिजन मेकर, स्ट्रॉंग असतात तशीच अनघाही आहे. त्यामुळे नताशा किंवा इतर कोणी समजावून ती कुठलाच निर्णय घेणार नाही. ही तिच्या अस्तित्वाची लढाई आहे. तिच्या आत्मसन्मानाचा झगडा आहे आणि ती ही लढाई जिंकणारच!
 आता तुम्हाला वाटेल कसं शक्य होणार हे? तर होणार. कुठल्याही परिस्थितीत ती माघार घेणार नाही. ती स्वतःसाठी लढणार. स्वतःच्या हक्कासाठी लढणारं. आणि त्याचं प्रेम अजिबात हरणार नाही कारण त्याच्या नावातच जिंकणं आहे न !  त्यामुळे पुढचा विचार तुम्ही करा. साधारणतः 111- 12  नंतर सगळं बदललं असेल.

Stay tuned, Happy Reading & Thanks a lot.

0

🎭 Series Post

View all