Login

बंधन: आभार

Social, Love

नमस्कार सर्व रसिकवाचकहो,

कसे आहात सगळे? नक्कीच कोणत्या तरी कथेच्या विश्वात रमलेले असाल. पुन्हा लॉकडाऊन आहेच त्यामुळे आता कथांशिवाय काही पर्यायही नाही म्हणा! चला प्रस्तावना पुरे आभाराचं मनोगत आहे. पहिलं त्याकडे वळू, तुम्हा सर्वांचे आभार. जवळपास वर्षभर नव्हे सबंध वर्षभरच तुम्ही वाचत होता, कथा फॉलॉ करत होता, पार्ट्सची वाट पाहत होता. खरतर शेवटच्या भागाखाली जर्नली आभार मानलेले असतात सगळ्यांनी आणि इकडे मात्र ' समाप्त ' च्या पुढे सगळी रिकामी जागा......अर्थात ते शेवटच्या भागाचा तुमच्या मनावरचा प्रभाव वगैरे यासाठी होतं....एखादी कादंबरी, पुस्तक वाचता तुम्ही तेव्हा त्याचं शेवटच पान वाचल्यानंतरचा तो क्षण, पात्रांना टाटा करतानाचा क्षण आणि बरंच काही असतं जे व्यक्त करता येत नाही तो क्षण फक्त जगायचा असतो म्हणून समाप्त नंतर पुन्हा मी काही बोलणं नको वाटत होतं.....त्यानंतरही पात्रं अवतीभवती घुटमळत असतात ते वेगळचं त्यामुळे शांत राहणं, कुठेतरी मनाला गुंतवणं हाच उपाय त्यावर. बाकी कथेबद्दल काही असेल म्हणून उत्सुकतेनं तुम्ही वाचत असाल तर काही नाही.......आता ' समाप्त ' नंतर पुन्हा विषय, पात्र यांची चर्चा करण्यात अर्थ नाही.....बाकी कथा कशी सुचली, किंवा इतर सगळे ' का आणि काय ' याबद्दलही लिहिलेल आहे याआधी. बाकी छान होता वर्षभराचा प्रवास. दमछाक व्हायची ती लिहताना.....लिहायच यापेक्षाही दोन तीन दिवसात ते लिहिणं आणि पोस्ट करणं याचं प्रेशर जास्त असायचं....अर्थात या अश्या कथामालिका, अस वेबसाइट्सवरती भराभरा लिहायची सवय नाही.....एखाद वृत्तपत्र किंवा मासिकासाठी लिहताना दोन तीन परिच्छेदांच्या लिखाणालाही आठवडा आठवडा वेळ मिळतो....खूप शांत नी संयत असत तिकडे लिहिणं त्यामुळे तिकडेच बरं वाटतं. मुळात टाईमटेबल नसतं....आय रिमेंबर, कंटिन्युयसली लिहायचे मी अगदी दिवस दिवस सुद्धा तेव्हा कुठे गुरुवारनंतर रविवार संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत पार्ट यायचा. अर्थात तुम्ही म्हणाल, ' काय राव! पार्ट तर छोटुसा ' हो......तरी कथा म्हणजे फक्त नायक नायिका आणि त्यांचे स्क्रिप्ट लिहल्यासारखे संवाद नव्हे ना, 

उदा. 

कोमल उठते, " तू कसा इथे! " 
असच तुझी आठवण आली! श्रवण '


आहे न गंम्मत ( पुढल्या कथेतलं नाही हे काही...फक्त उदाहरणार्थ ) तर अस सगळं.....काही बाबी प्रकर्षाने जाणवल्या त्या ह्याच, नायक खूप प्रेमळ, काळजी करणारा, देखणा आणि नायिका समजूतदार, हसती खेळती आनंदाचा झरा ही एकच शेड प्रत्येक नायक नायिकेत थोड्याफार फरकानं असते.....कथानकं प्रत्येक लेखकाची वेगवेगळी असतात नक्कीच पण तीही तुम्ही टि.व्ही वरती पाहिलेली, कुठेतरी वाचलेली स्टोरीलाईन त्यात डोकावतेच. नायक नायिका मित्र मैत्रीणी, किंवा ओळख, मैत्री, प्रेम, लग्न....लग्नानंतर नायिका मोठ्याश्या संकटात सापडते मग नायक तिला त्यातन बाहेर काढतो....नी साईड बाय साईड हिरो हिरोईनचा भाऊ/ बहीण यांची प्रेमकथा किंवा मग नायकाच्या मागे लागलेली एखादी त्याची मैत्रीण, अॉफीस कलिग वगैरे वगैरे.......पण वाचकांना आवडत हे सगळं.... मग वाटत की, वर्ष दिडवर्षाचा वेळ एका कथेत आपण तरी का घालावा. हातातली सगळी कामं बाजूला टाकून चार चार पाच पाच तास त्यात का घालावे फक्त समाधान, आनंदासाठी तर दिवसभरातला रोजचा इतका वेळ नाही न देऊ शकत! लिहायच तर काही फार वेळ लागत नाही! पण मघाशी म्हटल तस पात्रांची रचना, त्यांची सुरुवात, प्रोपर शेवट, कथानकाची सुरुवात, मध्यंतरीचा चढाव आणि नंतरचा उतार क्लायमेक्सकडे जाणारा, पुन्हा संवाद, शुद्धलेखन सगळच आलं.......आणि सगळ्याच पातळीवरती जेव्हा 99% दिल जातं तरीही साईटला दररोज येणार्‍या लाखो वाचकांपैकी केवळ दहा ते बारा हजार वाचकांकडूनच ते वाचलं जातं....बाकी सगळा अॉडियन्स प्रेमकथा, रोमँन्टिक कथांमध्ये रमलेला असतो....अर्थात वाचक त्यांना आवडत तेच वाचणार हे बरोबरच आहे.....पण असा विचार केला तर ईराचा साधारणतः नव्वद टक्के अॉडियन्स हा रोमँन्टिक किंवा प्रेमकथांचा चाहतावर्ग आहे हे सिद्ध होतं त्यामुळे या सगळ्यात वाचक किंवा टीमचा दोष नाहीच....मग आम्हा लिहणार्‍यांनाच कळायला हवं ( म्हणजे नवीन प्रयोग करणारे किंवा रहस्य, सामाजिक किंवा इतर काही लिहणारे असे)  की आपण आपला किती वेळ यात घालावा वा घालू नये! कारण एखादं गोड जांभळं देणारं झाड आहे. अगदी गोड गोड जांभळं लगडलेली असतात त्याला नी तिथच कोपर्‍यात एखादं आब्यांचं रोपटं आहे अगदी त्या झाडाला लागून नी आपण म्हटल आता हा आंबा मोठा होणार नी जांभळांसोबत आपल्याला गोड आंबेसुद्धा खायला मिळतील नी उन्हाळा मजेत जाईल तर नाही न ते शक्य! त्या जांभळाच्या डेरेदार सावलीत आंबा कितपत मोठा होणार तसच हेसुद्धा इतक्या सार्‍या प्रेमकथा किंवा रोमँन्टिक कथांमध्ये प्रत्येकवेळी बंधनसारखी कथा आणण, ती टिकवणं, वाचकांच्या तो विषय गळी उतरवणं नाही न शक्य! आज अनघा विक्रम होते म्हणूनही काही वाचक यायचे पण प्रत्येकवेळेला कथेतले नायक नायिका असे वेगळे किंवा डॉमिंन्ट असतील अस नाही! निरागस प्रेमाची गोष्ट, नायक वा नायिका फार काही त्यात उठून दिसणारे नव्हते पण कथेचा मुळ मुद्दा होता, आईवडिलांनी मुलांना न विचारता त्यांच्या लग्नाचा निर्णय परस्पर घ्यावा का? नी घेतला तर मितभाषी, बंडखोरी न करणारी मुलं असतील तर त्यांची मनःस्थिती काय असु शकते. पण हिरो हिरोईन फार उठून दिसणारे नव्हते त्यामुळे अगदी तुरळक वाचकांच्या लक्षात आहे ती कथा. असच सगळं...... हेच कथा संपल्यापासून डोक्यात होतं त्यामुळे लगेचच मनोगत वगैरे लिहायला घेतलं नाही. बाकी वाचत राहा, वाचकांसाठी स्पर्धा सुरु होणार आहेत त्याचा आनंद घ्या. घरी राहा, सुरक्षीत रहा. 
लवकर भेट होईल अशा करु.

सगळ्यांना थँक्यु , टेक केअर

🎭 Series Post

View all