कोरोना - एक नविन व्यवसाय संकल्पना! भाग ०२

कोणी महान व्यक्तीने म्हटले आहे की प्रत्येक “का” ला उत्तर असतेच असे नाही; परंतु covid-19 आणि या संदर्??

भाग ०२ ............

नमस्कार !!

आपण  कोरोना एक व्यवसाय चा पहिला  भाग वाचला असेल,   आणि जर तो आपण वाचला नसेल आपण नवीन  वाचक असाल तर पुढील लिंक वर क्लिक करून पहिला भाग असू  शकता :

https://irablogging.com/blog/corona---a-new-business-concept 

आपल्या प्रतिक्रिया, मते आणि सूचना यांचे स्वागत……

पहिल्या भागामध्ये आपण पाहिले कोरोनाचा संदर्भ आपल्याला कोणकोणत्या ठिकाणहुन मिळतो ;  तसेच काही प्रश्न आपल्यासमोर उपस्थित केले ज्यांची उत्तरे जगाला मिळणे गरजेचे आहे. ह्या भागामध्ये आपण चीन किंवा जगातील इतर कोणत्याही देशाची उणीदुणी न काढता आपल्या स्वतःच्या भारत देशात या संकटसमयी सुद्धा कसा आपला फायदा साधून घेतला जात आहेत आणि यातून देशाला काय साध्य होणार आहे हे पाहू आणि जी प्रश्न ह्या भागात आपल्या समोर उपस्थित होतील त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण करू:

सर्वप्रथम जे सगळे कर्मचारी covid-19 या परिस्तीमध्ये सुद्धा आपआपले कर्तव्य तेवढ्याच तत्परतेने पार पाडत आहेत जेवढ्या तत्परतेने ते आधी पार पडत  होते.  सध्या आपले पोलीस प्रशासन, शासकीय - निमशासकीय आणि खासगी दवाखाने;  त्याचप्रमाणे जिल्हा व राज्य  प्रशासन  व राज्य सरकार केंद्र सरकार आणि त्यांच्याशी संलग्नित सर्व अधिकारी आणि  कर्मचाऱ्यांचे जेवढे  आभार मानावे तेवढे कमीच आहे,  कारण  त्यांना सुद्धा कुटुंब आहे ते सुद्धा मनुष्य आहे तरीसुद्धा ते  असल्या गंभीर परिस्थिती  त्यांचे कर्तव्य बजावत आहेत.  त्या सर्वांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे मनापासून  आभार.  covid-19 बिकट परिस्थितीमध्ये सर्व आरोग्य आणि औषध निर्माण कंपनी त्यांचे पैसे  कमविणे किंवा व्यवसाय करणे हे आपण समजू शकतो  परंतु कधी कधी वाटते  त्यांनीसुद्धा माणुसकी विकली आहे; याचे कारणही तसेच आहे आधी ज्या साध्या mask ला कवडीमात्र किंमत नव्हती  तेसुद्धा पन्नास पन्नास रुपयाला विकली गेली. आपण   या  यामुद्यावर नंतर येऊ; सर्वप्रथम कहर तर आपल्या घराच्या बाजूच्या किराणा दुकानातून झाला. मालाची किंमत होती त्यापेक्षा चार चार पट किमती  मध्ये विकले  गेले परंतु असे करताना हेच विसरले चुकीच्या मार्गाने आणि लवकर आलेला पैसा चुकीच्या मार्गाने आणि लवकरच आपल्या हातातून निघून जातो, असो.....

या भागात मला या सगळ्या गोष्टी मांडायच्या नाहीत. माझी काही वैयक्तिक प्रश्न आहेत ते मला आपल्या सर्वांच्या समोर मांडायचे आहेत तरी आपण सर्वांनीच  त्यांची समाधानकारक उत्तरे आपापल्या परीने काढून एका निष्कर्षापर्यंत पोहोचायचे आहे आणि आपण काढलेले निष्कर्ष  हा लेख तुम्ही जिथे वाचत असाल त्याच्याखाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या  प्रतिक्रियातून  मांडावे…

माझे काही प्रश्न  जे मी व्हाट्सअप द्वारे सुद्धा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला  हे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अन्य सोशल मीडियाचा सुद्धा वापर केला आणि आज या लेखांमधून आपल्या समोर   सुद्धा मांडत आहे,  आणि ते प्रश्न खालील प्रमाणे:

  1. जर कोरोना  संक्रमणातून किंवा संसर्गातून पसरत असेल तर हा रोग फक्त माणसांना का होत आहे इतर प्राणी यापासून कसे  वाचले??
  2. या रोगातून  सरकारी कर्मचारी, नेतेमंडळी, सिनेमात काम करणारे अभिनेते आणि इतर नामांकित व्यक्ती वाचतात आणि फक्त गरीब अडाणी आणि  ज्यांच्या पुढेमागे कोणी नाही असेच का  मरतात??
  3. कुणीही रस्त्यावर आणि घरात तडफडून मरत नाही तर ते दवाखान्यात जाऊनच आपला जीव सोडतात??
  4. हा कोणता रोग आहे  ज्याच्या टेस्टमध्ये, माणूस आज पॉझिटिव आहे  तो दोन दिवसात कोणतेही उपचार न घेता निगेटिव होतो??
  5.  कोरोना  जर संसर्गातून पसरत असेल तर रॅली, प्रोटेस्ट, आंदोलने, मोठमोठे राजकीय कार्यक्रम यातून एकही कोरोना संशयित  किंवा  कोरोना रुग्ण सापडत  नाही,  परंतु एक साधा गरीब जेव्हा आपला सर्दी ताप खोकला त्याचा इलाज करण्यासाठी दवाखान्यात जातो  परंतु तो घरी परततच नाही?  त्याला कोरोना सुद्धा होतो आणि त्याला जीव सुद्धा  गमवावा लागतो??
  6. आपण सर्वजण  जाणता  की या रोगाला महामारी सुद्धा घोषित करण्यात आलेले आहे, आणि याचे औषध नाही; ही गोष्ट संपूर्ण जगाला ज्ञात आहे तरीसुद्धा मृत्युदर फक्त दहा  टक्केच कसा?? जर ही महामारी आहे तर शंभर मधून नव्वद बरे कसे होतात??  100 मधून 90 बरे होणे ही चांगलीच गोष्ट आहे पण जेव्हा लोक बरे होत आहेत तर मग कि महामारी कशी??
  7. जेव्हापासून हा रोग अस्तित्वात आला तेव्हापासून सगळे इतर रोग गेले कुठे?  हृदयविकार, मधुमेह , यकृत किंवा इतर प्रकारचे विकार आणि रोग याच्याने कोणाचा मृत्यू का होत  नाही??  का कोणत्याही प्रकारच्या मृत्युला आपण कोरोनाचे नाव तर  देत नाही ना?? 
  8. कोणत्याही प्रकारच्या टेस्ट रिपोर्ट नातेवाईक किंवा स्वतः पेशंटला का देण्यात येत नाहीत? त्या सर्वांपासून लपवून फक्त तोंडी का सांगण्यात येते की आपण  कोरोना बाधित आहात? असे का?
  9. कोणत्याही रोगाचे निदान करायला गेल्यावर सर्वप्रथम सर्दी ताप खोकला का तपासला जातो?  आणि सामान्य सर्दीच्या रूग्णाला सुद्धा   covid-19 सेंटर  मध्ये का पाठवले जाते??
  10. एखादा कोरोना संशयित जेव्हा या जगाला सोडून जातो,  तेव्हा त्याचा मृतदेह कोणालाच का दाखवला जात नाही?  आणि पिशवी सदृश वस्तूमध्ये गुंडाळून त्याचा अंतिम संस्कार दवाखाने वाले परस्पर कसा करतात व का करतात?  याच्यामागे दवाखान्याचा कोणते षडयंत्र तर नाही ना?
  11.  सर्दी तपासायला गेलेल्या व्यक्तीवर कोरोना टेस्ट का  लादली जाते?  त्या टेस्ट भरमसाठ पैसे घेण्यासाठी? का रिपोर्ट लपून कुणालाही कोरोना बाधित घोषित करण्यासाठी?  का त्याच्या मागे अजून काही वेगळे कारण  आहे??
  12.  केंद्र सरकार या  महामारीच्या काळात काय करत आहे?  कोणत्याही सरकारला तुम्ही आम्ही कोणीच दोषी ठरवत नाही परंतु जेव्हा जानेवारीच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत covid-19 महामारी असल्याचा मुद्दा मांडला होता तर त्यांनी त्याच्यासाठी उपयुक्त असे पाऊल का उचलले नाही?
  13.  प्रत्येक गोष्टीत राज्य शासनाला दोषी ठरवून केंद्र सरकार लोकांना भ्रमित तर करत नाही ना?
  14.  कोरोंना जर महामारी आहे आणि असे असताना सुद्धा वेगवेगळ्या राज्यात भयंकर राजकीय हालचाली चालू आहेत, जुनी  सरकारे पाडून नवीन बनविली जाते. कोरोना  किंवा लोकांच्या जिवापेक्षा ह्या राजकीय हालचाली आणि राजकीय भूकंप महत्त्वाच्या आहेत का?   किंवा असे करत असताना त्या त्या  प्रदेशात किंवा त्याच्या राज्यात  कोरोना चा संसर्ग थांबला आहे  की कोरोंना पूर्णपणे संपला आहे?
  15.  राजभवनात अर्ध्या लोकांना कोरोना होतो आणि  अर्ध्या ना कोरोना बघत सुद्धा नाही?  हे कसे शक्य आहे की एकाच घरात एकाला कोरोना आला नाही दुसऱ्याला नाही?
  16. एखादा अभिनेता किंवा एखादा मोठा व्यक्ती  कोरोनामधून पूर्णपणे मुक्त होतो परंतु  एखादा गरीब किंवा दिवस-रात्र झटणारे आमचे पोलीस  बंधू या रोगामुळे का दगावतात?
  17.  एखाद्या सेलिब्रिटीची  कोरोना रिपोर्ट  लगेच येते आणि एका सामान्य माणसाची रिपोर्ट देण्यासाठी 24 ते 48 तास का  लावले जातात? 
  18.  जर  कोरूना संसर्गाने पसरत असेल  कडकडीत बंद आपण का पाळत नाही किंवा तो आपल्यावर  लादण्यात देण्यात का येत नाही?  आपली अर्थव्यवस्था वधारणे किंवा पैसे कमावणे हे लोकांच्या जिवापेक्षा जास्त आहे  का? असे असेल तर आपल्याला आपले अंतर्मन एकदा तपासायला हवे आणि आपल्यात माणुसकी उरली आहे का याची एकदा चाचपणी केली पाहिजे !
  19. जर  कोरोना संक्रमणातून पसरत असेल तर आयसोलेशन विभागात  कोरोना बाधित आणि   कोरोना संशयित यांना एकत्रच ठेवले जाते, असे ठेवल्याने कोरोना पसरत नाही का?
  20.  याच प्रकारचे अनेक प्रश्न अनेकांना  पडले असावेत,  परंतु ही व्यथा किंवा हे प्रश्न कोणासमोर मांडावे हाच सगळ्यात मोठा प्रश्न  कदाचित आपल्यासमोर असावा?  सामान्य माणसाने अनेक प्रश्न विचारावे तर कोणाला?  प्रश्न विचारले जरी, तर त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. जेव्हा शासन-प्रशासन आणि खाजगी दवाखाने यांच्याकडे कोणत्या प्रश्नाचे उत्तर नसतं तेव्हा ते प्रश्न विचारणार्‍या संबंधित व्यक्तीला किंवा त्यांच्या नातेवाईकांना  कोरोना पॉझिटिव  घोषित करत असावेत, कारण त्यांच्यावर प्रश्न विचारणारा कोणीच नाही; त्यांच्यावर कोणाचे निर्बंध सुद्धा नाही!  यातून अजून प्रश्न समोर येतो की हे सगळे  उपद्व्याप फक्त पैसे कमावण्यासाठी की प्रश्न   विचारणाऱ्याला शांत करण्यासाठी?  की अजून काही वेगळे षड्यंत्र आहे?

असे अनेक प्रश्न सर्वांसमोर आहेत आणि त्यांची उत्तरे मिळणे सुद्धा गरजेची आहेत अन्यथा सामान्य माणसाच्या डोक्यात एक ना अनेक वाईट विचार  येण्यास आणि खाजगी दवाखाने यांची प्रतिमा मलिन होऊन त्यांच्यावरील विश्वास संपण्यास एक क्षणही लागणार नाही. डॉक्टरांची "देव" म्हणून असलेली प्रतिमा क्षणभंगुर होऊन एका क्षणात नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.  कोणी महान व्यक्तीने म्हटले आहे की प्रत्येक “का” ला उत्तर असतेच असे नाही; परंतु covid-19 आणि या संदर्भात असणाऱ्या प्रत्येक  “का” ला उत्तर  मिळणे गरजेचे आहे अन्यथा कोरोना ही महामारी नसून दवाखाने आणि शासन प्रशासनास एक व्यवसायाची संधी आहे हे संबोधित करणे वावगे ठरणार नाही!

वरील लेखाप्रमाणे आपले सुद्धा जे कोणते प्रश्न असतील ते आपण कमेंट बॉक्समध्ये मांडावेत, वेगवेगळ्या सोशल मीडियावर हा लेख शेअर करून त्याच्यासोबत मांडावेत,  आणि व्यवसायाची संधी भाग एक आणि दोन या दोन्हीवर आपल्या प्रतिक्रिया आपण फेसबुक  पेज च्या कमेंटमध्ये,   इरा ब्लोगिंग  च्या कमेंटमध्ये किंवा आमच्या ईमेल आयडी वर आम्हाला  कळवू  शकता.  आमचा इमेल [email protected], आपण आपला अमूल्य वेळ लेख वाचण्यासाठी दिला यासाठी आपले आभारी आहोत

धन्यवाद!

🎭 Series Post

View all