रात भर का है मेहमान अंधेरा
किसके रोके रुका है सवेरा
रात जितनी भी संगीन होगी
सुबह उतनी ही रंगीन होगी
गमकर गर है बादल घनेरा
कोरोना विषाणू ने मागच्या एक दीड वर्षात जो काही उच्छाद मांडला आहे आणि त्यामुळे संपूर्ण जगात जो काही हाहाकार माजला आहे, त्यामुळे जगात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत आणि त्यामुळेच कोरोना ची लढाई फक्त एका विषाणू सोबत ची लढाई नसून प्रथम स्वतः सोबत चीज एक लढाई आहे असं समजून वागता आलं पाहिजे.
मानवाच्या दैनंदिन जीवनात ज्या काही घटना घडतात त्यांचा थेट परिणाम हा त्याच्या शरीरा प्रमाणेच मनावरही होत असतो. कोरोनाच्या या वैश्विक महामारी मध्ये आज फक्त आजारच नाही तर वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक आर्थिक अशा अनेक कारणांमुळे मनुष्याच्या थेट मानसिक आरोग्या वरच परिणाम करत आहेत.
या विषाणूपासून जपण्यासाठी प्रत्येक जण विविध मार्गांनी प्रयत्न करत आहे पण इतके प्रयत्न करूनही जर एखाद्या चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर ती व्यक्ती आणि संपूर्ण कुटुंबच हादरून जाते याशिवाय काही संशोधनात तर असंही सांगितलं आहे की जगातील 99 टक्के व्यक्तींना हा आजार होणार आहे. त्यामुळे अशा बिकट काळात आपल्याला खालील पैकी काही सकारात्मक उपाय करता येऊ शकतात.
१. ..... सकारात्मक विचार
कोरोना ही महामारी संपूर्ण जगभरच थैमान घालते आहे त्यामुळे मी या संकटाने खचून जाणार नाही. तर मी या काळात समर्थ सक्षम आणि खंबीरपणे सगळ्या संकटांचा सामना करेन अशी स्वयम सकारात्मक सूचना आपण स्वतःला देऊ शकतो.
२......... ध्यान
शांत बसून स्वतःच्या आत डोकावणे म्हणजे ध्यान. माणसाच्या गरजा किती कमी आहेत आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्म प्रचिती म्हणजे ध्यान.
३. .......... कल्पनाविश्वात रमणे
तीव्र यशाची , आर्थिक लाभाची किंवा व्यावसायिक इच्छा पूर्ण झाली आहे अशी मनातून कल्पना करणं आणि ती पुर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं यांनीही आपले विचार प्रत्यक्षात रूपांतरित होण्यास मदत मिळते. कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाच यशस्वी व्यक्ती मध्ये रुपांतर होते.
४......... व्यायाम
असं म्हणतात "साउंड माईंड इन साउंड बॉडी"
शरीरातून आळसाला पळवून लावण्यासाठी शरीरातील ऊर्जा वाहती ठेवण्यासाठी मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो तो व्यायाम.
५........…वाचन
पुस्तक वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.
वॉरन बफे, बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग, हे सगळे आठवड्याला दोन पुस्तकं वाचतात.
६...…लिहिणे
लिहिण्याने स्वतःची स्वतःशी नव्याने भेट होते, मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते , मनात नव्या ऊर्जेचा संचार होतो. आपले संत ही सांगून गेले आहेत की , "दिसामाजी काहीतरी ते लिहावे"
७............. वर्तमान काळात जगणे
या विषाणूने अनेकांचे आयुष्य बदलवून टाकले आहे त्यामुळे मनात नकारात्मक विचार येणे स्वाभाविक आहे पण त्यात भविष्याचा वेडावाकडा विचार करू नये "हे दिवस हि जातील" हे कायम लक्षात ठेवावे. भूतकाळातील चुका आणि भविष्याची चिंता याने काहीच पदरी पडत नाही. त्यामुळे मी आता, या क्षणी, आज काय करणार आहे त्याचा आधी विचार करावा.
८........... अध्यात्मिक जोड
अध्यात्मिक जोड ही नेहमीच आपल्याला ऊर्जा देत असते. आपल्याला जमेल तसे जमेल तेव्हा आपल्या आवडत्या देवाचे संतांचे किंवा आध्यात्मिक गुरूंचे स्मरण करा त्यांना अनन्यभावाने शरण जा.
९…......... संकटांना मधली संधी शोधा
अनेकांना सवय असते किंवा मनाची तयारी नसल्यामुळे छोट्या-छोट्या संकटांना किंवा जीवनात येणाऱ्या आव्हानांना ते घाबरून जातात पण अशाच संकटातून आव्हान आंतून आपलं व्यक्तिमत्व आणि जीवन घडत असतं संकट यालाच संधी मानून त्यातून नवी प्रेरणा घेऊन नवीन तयारीनिशी नवी वाटचाल सुरू करता येते. कोणाच्या काळात अनेक गृहिणींचे गृह उद्योग बंद पडले त्यावेळी त्यांनी मास्क शिवण्याचे, जे स्वयंसेवक किंवा स्वयंसेवी संस्था कोरोना बाधितांना जेवणाचे डबे पूर्ववत होते, तेथे जाऊनही काम शोधले त्यामुळे ,ज्याला काम करायचे आहे त्याला संकटात ही संधी सापडतेच.
शेवटी काय मित्रांनो हे जे आयुष्य आहे हे जरी क्षणभंगुर असलं तरीही त्या क्षणभंगुर तेला एक सार्थक नाव देऊन एक समाधानी जीवन जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, झाशीची राणी, या आणि अशा इतर अनेक महान व्यक्तींनी आपल्या समोर संघर्षाचा एक स्तुतिपाठक निर्माण केला आहे त्यामुळे या कठीण काळात न डगमगता न घाबरता येणाऱ्या प्रत्येक संकटातील संधीचा वापर करून तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.
"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे"संत ज्ञानेश्वरांची ही म्हण खरे करून दाखवण्याची हीच संधी आहे मित्रांनो.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा