कोरोना व ती (एक वर्दीतल प्रेम)

Corona and she this is a story about Police and his past.which is meet him On the way

कोरोना व ती 

चोवीस तासाची ड्युटी करून आज खुप थकलो होतो.
अंगही कणकण करत होते. 

पण सांगणार कुणाला या कोरोनाची भीती व जीवावर उदार होऊन काम करणारे आम्ही पोलिस लोक. 
त्यामुळे काही आठ आठ दिवस घरच्यांना भेटत  नव्हते,
तर कुणी घरीच जात नव्हते कारण कोरोना च्या धाकाने बायको मुलं गावी नेऊन सोडली होती. 
देशसेवेने पछाडलेल्या वर्दीला आज फक्त कर्तव्य दिसत होते.
हात लागेल तिथे फक्त मृत्यू होता तरीही आम्ही उभे होतो नेहमी प्रमाणे तुमच्या रक्षणासाठी. 
कारण ही वर्दी अंगावर चढवताना च शपथ घेतली होती की काहीही झालं तरी अगोदर कर्तव्य मग भावना. 

प्रत्येक दिवस आशेने उजाडत होता व निराशेने मावळत होता.
रोज फक्त आपल्या कोणत्या सहकाऱ्याला कोरोना झाला हेच कानावर येत होतं. 
मन कासावीस होत होतं, 
पण फक्त आपले कर्तव्य चोख पार पाडणे हेच ध्येय होत डोळ्यासमोर,
नेहमीप्रमाणे आवरून स्वतः च्याच वाहनाने ड्युटी वर निघणार होतो.
निघण्यापूर्वी सहज मोबाईल बघावा सवयीप्रमाणे म्हणून हातात घेतला 
तर इनबॉक्स मध्ये 
Hi 
असा मेसेज होता.
डोक्यात अचानक मुंग्या आल्या,
पण ड्युटी वर जायला उशीर होत होता.
ईच्छा नसूनही तसाच मोबाईल खिशात ठेवत ड्युटी वर निघालो
मनात भावनांचा गोधळ झाला होता.
काही सुचत नव्हते 
हृदयाने डोक्याला हजार प्रश्न विचारून झाले होते. 
मन पुन्हां भूतकाळाचा वेध घेत होते. 
आज वाऱ्याचा वेगही मला कमी वाटत होता.
 कधी एकदा इच्छित ठिकाणी पोहोचतो व मोबाईल बघतो असे झाले होते.
मनाला आठवणींचे, 
हृदयला मनाचे, 
व मेंदू ला प्रश्नाने वेध लागले होते.
कोणाचाच कुणाला ताळमेळ नव्हता.
का केला असेल मेसेज,
तो  ही इतक्या दिवसांनी,
कशीकाय आठवण आली असेल माझी,
काही काम असेल का ?
काही अडचण तर नसेल तिच्या आयुष्यात, 
एक ना हजार प्रश्न. 
मन जणू T20 खेळत होत मेंदूशी 
पण दोघेही अपयशी हृदयापुढे. 
मनाची मेंदूशी कुठली ही सांगड न जमल्याने शेवटी घुडगे टेकले त्यांनी परिस्थिती पुढे.
व बघू रिप्लाय देऊन काय होते हा निष्कर्ष निघाला, 
मनाला कसे तरी सावरत मी ड्युटी वर पोहोचलो.

अजूनही मन त्या hi भोवतीच घिरट्या घालत होते.

पोहोचल्या बरोबर आपोआप हात मोबाईल कडे गेला.
आलेला मेसेज पुन्हा पुन्हा चेक केला तिचाच आहे का?
डोळ्यांनी बघून झाले होते पण मनाची खात्री होत नव्हती.
मन, डोळे, मेंदू, हृदय सगळे शुद्धीवर आल्यावर तिचाच मेसेज आहे.
रिप्लाय देऊन प्रतिसाद देऊ असे ठरले.
पण ती ऑनलाईन दिसत नव्हती व मला आता कुठलीच रिस्क नको होती म्हणून
 मग ती ऑनलाईन येण्याची वाट बघू लागलो.
पुन्हां पुन्हां मोबाईल बघत होतो 
द्यायचा रिप्लाय कित्येक वेळा टाईप करून सेंड न करता डिलिट झाला होता. 
तेवढ्यात मन भूतकाळात रमले 
हो तीच होती
 ती ,
माझं पाहिलं प्रेम ,
कधी कुठल्या मुलीसोबत साधी मैत्री ही न केलेला मी तिच्या प्रेमात पडलो. 

का कुणाचं ठाऊक पण बघताच खुप आवडली होती ती. 
तशी ती होतीच  छान कुणीही बघावं व प्रेमात पडाव 
पण मला ती तशी नव्हती आवडत 
फक्त आकर्षक म्हणून, 

मनातून आवडली होती ती 
तीच असणं, 
तीच नसणं ,
तीच हसणं 
तीच लाजण,
सगळंच माझ्यावर परिणाम करत होत.
तिचे केस मला खुप आवडायचे, 
ते धुतल्यावर एखादा तरी केस माझ्या भेटीला यायचाच नकळत का होत नाही. 
सतत तिची ओढ असायची 
तिच्या ड्रेस च्या रंगापासून 
तर तिच्या वाढदिवसापर्यंत सगळ्यात गुंतलो होतो मी.

मित्र जेव्हा तिला वहिनी म्हणून चिडवायचे, 
ती दिसली की माझे नाव जोरात 
घ्यायचे हे सगळं मला खुप भारी वाटायचं.


दिवसामाघून  दिवस जात होते 
व मी मात्र गुंतत होतो एका अस्तित्वात नसलेल्या नात्यात. 

वर्ष संपत आले 
एकदा मनातील सर्व तिला सांगावं बाकी तिचा निर्णय जो असेल तो मला मान्य असेल. 
असे ठरले पण हिम्मत होत नव्हती. 

कसे विचारणार ना ?
एकाद्या मुलीला 
तुला मी आवडतो का ?
म्हणून 

खुप विचार केला व शेवटी मित्राचा आधार घेत होडी किनाऱ्यावर आणायचे ठरलं.
मित्रा व मी आम्ही दोघे जाणार होतो. 
पण बोलणार कोण ?
ते अजून ठरवायचं होत,
शेवटी मित्र बोलणार व मी फक्त सोबत जाणार हे फायनल झाले.

दिवस ठरला वेळ ठरली आणि काय बोलायचं तेही.

ती घरी जाण्यासाठी निघाली तसे मी व माझा मित्र तिच्या माघे गेलो 
अर्धे अंतर तिने पार केले होते व अर्धे बाकी होते.
तेवढ्यात आम्ही तेथे पोहोचलो 
मित्राने पुढचा माघचा विचार न करता. 
ये ........
तू माझ्या मित्राला खुप आवडतेस .

असे बोलून मोकळा झाला.

मला थोडे वेगळं
वाटलं 
पण धीर धरून बसलो.

समोरून उत्तर आले
माझे खुप मोठे स्वप्न आहेत 
व ती नाही म्हणून निघून गेली ती कायमचीच.

मनात खुप राग आला 
चीड आली 
स्वतः ला काय समजते काय माहीत. 
स्वप्न आहेत म्हणे ?
काय कलेक्टर होणार आहे का ?
मी काय ईला दुसऱ्या मुलासारखा वाटलो का ?
मी काय पळून घेऊन जाणार नव्हतो लगेच हो म्हणाली असती तर .
स्वतः ला काय समजते 
काय माहीत 
इथे हजार पोरी आहेत 
माझ्या मागे व मी तुला विचारात बसलो.
पण लक्षात ठेव यापुढे मी देखील कधी नाव घेणार नाही तुझे 
व तो शब्द मी आजपर्यंत पाळला 
कधीच तिला आयुष्यात पुन्हां भेटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न केला नाही.


असाच विचार करण्यात व ऑनलाईन येण्याची वाट बघण्यात दिवस गेला 
ड्युटी संपून घरी आलो नेहमी प्रमाणे.

फ्रेश होऊन बसलो पुन्हां मोबाईल घेऊन .
आता मी व माझा मोबाईल हेच विश्व निर्माण झालं होतं 
कोरोना मुळे बायको व मुलं गावी गेले होते.
तेवढ्यात ती ऑनलाईन दिसली 
मनाला विलक्षण आनंद झाला
मी पटकन hi 
असा मेसेज केला. 
क्षणाचाही विलंब न लावता रिप्लाय आला. 

ओळखलं का? 

आता तिला कोण सांगणार होत
जिला कधी विसरलोच नाही 
तिला ओळखणार नाही असे होईल का ?

पण मीही जास्त उत्साह न दाखवता 
हो dp बघितला मग कळाले

असा रिप्लाय दिला 

हळू हळू बोलणे चालू झाले 
कधी कधी सकाळी gm चा मेसेज यायचा.
मी आपला त्याला रिप्लाय करून दिवसभर मेसेज ची वाट बघायचो. 
खुप चीड यायची, 
पुन्हां झाले हिचे चालू 
जर बोलायचे नव्हतं 
तर कशाला मेसेज करून आठवणी जागवल्या.
मला पुन्हां मूर्खात काढले की काय तिने असे वाटायचं.
पण अजून एवढी ओळख नव्हती की मनातलं काही बोलावं.
मी तर केव्हाच तिला जवळच मानून बसलो होतो पण ती अजूनही अबोलच होती
अगदी  पहिल्यासारखी.
थोडं थोडं बोलणं होत होत कधी gm तर कधी gn वर भागवल जात होतं.

माझ्या मनातील प्रश्न आजही तसेच होते निरुतरीत 

असे करत करत थोडे दिवस गेले 
खुपदा विचारावं वाटलं तिला की तू कसा काय मेसेज केलास एवढ्या दिवसांनी पण हिम्मत नाही झाली.
कारण ती आजही तशीच होती 
हट्टी, जिद्दी व हेकेखोर 
कुणाचाच न ऐकणारी 
म्हणलं बोलतीये 
पुन्हां काही बिनसलं तर बोलणं बंद करायची 
कारण होतीच 
ती तशी 
हाप म्याड 

एक दिवस असेच बोलत असताना तिने च विचारलं 
तुला प्रश्न नाही पडला कारे 
मी कसा काय मेसेज केला ? 

तुला काय वाटले माझा मेसेज बघून ?

आता दोनी प्रश्न माझ्या जवळचे होते 
पहिला माझ्या मनात घर करून होता तर दुसरा त्या घरावर राज्य करत होता. 

आता तिला काय सांगू 
तुझा मेसेज बघून काय वाटलं 
जिला बघायला तरसलो होतो 
जवळजवळ आशाच सोडून दिली होती 
आज तिच्याशी बोलत होतो 
हा विलक्षण अनुभव मी शब्दात कसा सांगू शकत होतो 
मी कशीतरी वेळ मारून नेली व तू का मेसेज केलास हे विचारलं 

तेव्हा कळलं 
ती कोविड योद्धा म्हणून काम करतेय. 
कुठल्याही वेतना शिवाय 
या अभियानात ती लोकांमध्ये कोरोना बद्दल जनजागृती करते 
व त्याचाच एक भाग म्हणून तिने मला मेसेज केला होता.

ऐकून मनाला खुप छान वाटलं 

आता बऱ्यापैकी ओळखीचे झालो होतो आम्ही 
रोज बोलणे होत होत.
तिचे काळजी घे 
हे शब्द 
स्वतःवर हजार पटीने प्रेम करायला लावायचे 
पोलिसांची वाढती कोरोनाची संख्या रोज तिला माझी आठवण करून द्यायची.

जर खरच झालाच मला या कोरोनात काही तर 
मनाला एक समाधान तरी राहील की शेवटी का होत नाही पण झालीच माझी. 


असेच एक दिवस ती म्हणे 

मी आज तुला व्हिडिओ कॉल करते 

पुन्हां गोधळ 
हजार प्रश्न 
साधा कॉल न करणारी ती व्हिडिओ कॉल का करतेय 

चालू झाले पुन्हां वाट बघण्याचे सत्र 
दुपारी कॉल करते म्हणाली 
व मी सकाळपासून वाट बघत होतो 
माहीत होतं कॉल दुपारी येणार आहे 
तरी पुन्हां पुन्हां मोबाईल बघत होतो. 
दुपार उलटून गेली पण कॉल काही आला नाही.
तिच्यावर भरोसा ठेवावा 
अशी ती नव्हतीच कधी 
अशी मनाची समजूत काढून पुन्हा 
माझ्या कामाला लागलो 
पण मनातून तरीही तिचा विचार जात नव्हता 
पुन्हा तेच प्रश्न,
तिला कुणी म्हणाल होत का कॉल कर ,
एक तर स्वतः म्हणाली करते 
मग 
बोललेलं पाळायला नको का?
पण ती कधी सुधारणार आहे का ?
असे म्हणून सोडून दिलं 
विचार चालू होते, 
मन लागत नव्हता, 
तेवढ्यात तिचा व्हिडिओ कॉल आला 
काही सुचण्याच्या आत तो उचलला ही गेला. 
आज इतक्या वर्षांनी बघत होतो तिला 
माहीत नाही भास होत की खर  पण आज आपलेपणा जाणवत होता मला.
व्हिडिओ कॉल चालू होता व तिची नजर मात्र इकडे तिकडे खिळली होती.
आजही ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नव्हती. 
व झालीच कधी नजरेला नजर तर लाजत होती.
दोन मिनिटं बोलून तिने कॉल कट केला ते मलाही कळले. 

पण आज मी खुप समाधानी होतो.
ती भेटली नाही पण आजही ती मला बघून लाजते हे समाधान मला आयुष्यभर तिच्यासोबत जोडून ठेवायला पुरेसे होते.

त्या कॉल नंतर कधी जास्त बोलणे झालेच नाही फक्त इतके कळले की तिलाही तिच्या जबाबदाऱ्या आहेत व मलाही 

वाटाही वेगवेगळ्या आहेत व स्वप्न ही,

पुन्हा वेगवेगळे झालो 
परिस्थिती चे भान ठेवून. 

थांबली ती ही नाही 
थांबवलं मी देखील नाही 

पण जे काही क्षण 
मिळालेत ते पुरेसे आहेत आयुष्य जगायला 

ज्या कोरोना चा राग राग करत होतो 
त्यातच काही चांगलं सुद्धा घडत होतं फक्त नजर पाहिजे शोधणारी 
व जपून ठेवणारी 


कोरोना व ती 
हे दोन शब्द पुरेसे आहेत आयुष्य जगायला

कथा आवडल्यास like, share v comments नक्की करा 
व आपले अभिप्राय किंवा काही सूचना असेल तर नक्की कळवा 
त्यांचे स्वागत असेल 
आणि मला फॉलो करा