Login

देश की धर्म

I discussed the main issue. Comment your opinions.

    भारत एक लोकशाही देश आहे. सर्वधर्मसमभाव व धर्मनिरपेक्ष असलेला हा देश आज अर्थव्यवस्थेत जगात पाचवा क्रमांकावर आहे. पण आजकाल या देशाचे वातावरण काही वेगळं झालंय. या देशात सर्व धर्माचे लोक राहतात. धर्माचं विषय संवेदनशील आहे , म्हणून काही लोक या विषयावर बोलण्याच टाळतात. पण आज यावर बोलण्याची खरोखर खूप गरजेचं आहे. 

     तुम्ही चांगलं ओळखलंत की मी कोणत्या विषयावर बोलत आहे. दिल्ली मध्ये १६ वर्षीय साक्षी नामक मुलीला, एक साहिल नामक मुलगा चाकूने ४० वेळा वार केला व दगडाने ठेचून मारला आणि आजूबाजूचे लोक फक्त बघत जात होते. बहुधा असली वेळ आपल्या आई बहिणीवर येण्याची वाट पाहत असावे . का कुणास ठावूक भीती सुध्दा असू शकते. या घटनेने देशाला हादरून सोडलं. यात नेमकं चूक कुणाची? तुम्ही म्हणाल की त्या मुलीचं आहे की ती त्या धर्माच्या मुलाशी प्रेम केलं . कोणी म्हणालं त्या मुलाचं चूक आहे की तो हे काम केलंय. पण दुर्दैव हे आहे की या मध्ये त्या त्या धर्माचे लोक त्या त्या साईड घेत आहेत. हे खरचं चुकीचं आहे. 

       तो मुलगा एवढ्या रागाने या घटनेला तोंड दिला. एवढं राग कशावरून आला असावा याचं विचार आपण करायला हवं. ती मुलगी एवढ्या लहान वयात रिलेशन मध्ये असून तिच्या पालकांना कसं माहिती नाही . याचा सुध्दा विचार आपण करावं. 

      इंस्टाग्राम व ट्विटर वर खूप सारे पोस्ट येत आहेत. त्याने काय होईल? काही फरक पडेल? देशाचं वातावरण ठीक होईल? या पोस्ट मुळे साक्षीला न्याय मिळेल? काही दिवसाने क्रिकेट मॅच लागेल आणि सगळे विसरून जातील. याने काहीही होणार नाही. उलट याने देशाचं वातावरण बदलून जाईल. हे या देशाच्या प्रगतीसाठी घातक आहे. 

      आज त्या मुलाने पोलिसांना सांगितला की ' मी तिला मारलं यात मला काही दोष वाटतं नाही.' या एका वाक्याने समजत की आपली युवा कुठ चालली आहे. देशाच्या अल्पवयीन मुलीलासुध्दा विचार करण्यासारख आहे . पण एक मात्र आहे की असले घटनांमुळे दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष निर्माण होतो. या घटनेला वाईट म्हणूनच बघावं. सगळ्या धर्माने याला विरोध करणं गरजेचं आहे. ते मात्र दिसत आहे का? याच विचार आपण नक्कीच करावा.

     या देशाला युवांची गरज आहे. पण असल्या युंवाची गरज मुळातच नाही. हे पण खर आहे की एका मुळे पूर्ण धर्म वाईट होऊ शकत नाही. या देशाला जेवढी गरज सी. वी रमण ची आहे तेवढीच गरज ए.पी.जे अब्दुल कलाम ची पण आहे. 

    मी महाराष्ट्रात राहतो. या राज्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार आहे. त्यांनी आपल्या काळात कधीही असल्या घटनेला धर्माच्या नजरेने पाहिले नाही.ते फक्त अपराधीला शिक्षा दिले.  ते कधीही धर्माच्या नजरेने भेदभाव केले नाही. हा पण ते आपल्या धर्माला धरून होते. हीच गरज आपल्याला आहे. धर्म ही तितकीच गरज आहे.म्हणून दुसरं धर्म वाईट असं नाही. धर्माला धरून आपल्याला या देशाची प्रगती करायला हवी. 

      आजकाल तर वातावरण खूप तापलेला आहे. रामनवमी ला दुसऱ्या धर्माचे लोक दगडफेक करतात. तर रमजानला सुध्दा दुसऱ्या धर्माचे धमकी देतात. असं का होतोय याच विचार करायला हवं. 

     याच मूळ उपाय काय आहे? सर्वात आधी शिक्षण व धर्मशिक्षण महत्वाचं आहे. कोणताही धर्म दुसऱ्या धर्माला वाईट म्हणत नाही. याचं विचार सर्वांनी करावं. असले कोणतेही घटना देशाला हादरून जात. या साठी सगळे एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. तरच या देशाची अजून प्रगती होईल. याच उत्तम उदाहरण म्हणजे जपान . या देशात सर्वात आधी देशाला ठेवलं जातं नंतर धर्म ठेवलं जातं. हे आपल्याला कळायला हवं. 

     असली कोणतीही घटना झाली असावी , या सर्वात एक कॉमन आहे. याच परिणाम महिलांवर किंवा मुलीवर पडतो. तिला अजून बंधने घातली जातात. यात सगळे धर्माचे मुली समावेश आहेत. यात महिला आयोग का समोर येत नाही. का सरकारवर दबाव घालत नाही? का कायदा भक्कम करायला भाग पाडत नाही? 

    दुसरी महत्वाची गोष्ट. कायदा अजून भक्कम करायला हवं. कायदा कोणताही धर्म बघत नाही.  म्हणून फक्त भक्कम करून चालणार नाही , त्याची अंमलबजावणी ही तितकीच महत्वाची. 

    या देशातील सर्व पालकांची ही जबाबदारी आहे. आपला मुलगा काय करत आहे ? याची जाणीव करून घ्या. आपली मुलगी काय करत आहे ? याची ही जाणीव करून घ्या. दुसऱ्या धर्माला वाईट म्हणून चालणार नाही. या घटनेला सर्व धर्माच्या लोकांनी विरोध करणं गरजेचं आहे. 

     या देशाला खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे. त्यांच्या विचारांची गरज आहे. या युवा मार्गदर्शनाची गरज आहे. हे मार्गदर्शन आता जुनी पिढी करण्याची गरज आहे. युवा पिढीत आग आहे. ती आग देशाच्या प्रगतीला लागावं ही फक्त आशा. जो पर्यंत व्होटिंग करताना धर्म बघून वोट घालतात तो पर्यंत देशाचं प्रगती होणार नाही. 

    सर्वांनी एक प्रश्न स्वतः ला विचारावं की आधी देश की आधी धर्म ? जर उत्तर आधी धर्म असेल. तर देश दबघाईत जाणार हे मात्र नक्की.

    जय हिंद 

**********************************

ऋषिकेश मठपती

मी फक्त आपलं विचार मांडायचा प्रयत्न केला आहे. कुणाचे भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी असावी. या विचाराबद्दल काय वाटलं हे नक्की कॉमेंट करा. यावर खरोखर बोलण्याची गरज आहे. लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा....