Login

वेड्या मना..(कविता )

मनावरील कविता
हे वेड्या मना पुन्हा सवय नको लावुन देऊस,
झाली कदाचित मनावर खोलवर जखम तर मलम नको लावुन घेऊस..
राहिल्या जर खुणा त्या जखमांच्या,
तर आठवणींची खपली नको काढुस..
कितीही समजावलं मनाला,
तरी आशेचा नवा किरण नको जागवू देऊस..
मन हे असंच असतं त्याला पुन्हा सवय नको लावुन देऊस..