भाग १४
(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)
आतापर्यंत आपण वाचले -
"सांज, चेहरा दिसत नाही आहे; पण एक मात्र नक्की की तो आपल्यातला एक आहे हे टेक्निक्स आपल्या फिल्ड मधल्या लोकांना सहज जमतं किंवा खूप मोठा सायबर नेट क्रिमिनल." माधव ?️ स्क्रीन वरची नजर बाजूला न करता म्हणाला.
"सांज, चेहरा दिसत नाही आहे; पण एक मात्र नक्की की तो आपल्यातला एक आहे हे टेक्निक्स आपल्या फिल्ड मधल्या लोकांना सहज जमतं किंवा खूप मोठा सायबर नेट क्रिमिनल." माधव ?️ स्क्रीन वरची नजर बाजूला न करता म्हणाला.
"सेकंड ऑप्शन असू शकतं नाही; कारण तो खुरापातीशी खूप फ्रेंडली होता." सांज अजूनही त्याचा चेहरा आठवायचा प्रयत्न करत होती.
"हम्म्म, यू आर अल्सो राईट." माधवने परत एकदा कॅमेऱ्याचे वेगवेगळे अँगल्स चेक केले.
आता पुढे -
"मे आय कम इन?"
"येस."
दारात उभी व्यक्ती अपेक्षित होती. एक भावनिक सेल्युट देऊन ती उभी राहिली.
बॉसनी बसायचा इशारा केला. बराच वेळ दोघेही गप्प बसून होते.
बॉसनी बसायचा इशारा केला. बराच वेळ दोघेही गप्प बसून होते.
"मी काही विचारू का?" भरपूर शब्दांची जुळवाजुळव केली गेली; पण तोंडातून मात्र हेच चार बाहेर पडले.
"हो. त्यात परमिशन का घ्यायची?"
"का?"
"काय का?"
"इतक्या लवकर का?"
बॉसनी आश्चर्याने वर पाहिले आणि ओठांवर अनुभवांचे हसू आणत म्हणाले,
"इट्स राईट टाईम. मला तर वाटलं तू खूप खुश असशील. तुझ्यासाठी ही एक बिग अपोरच्युनीटी ठरेल. आता कधी नव्हे ती, ती सेना तुझ्या ताब्यात येईल. जी इतकी वर्ष तुला हवी होती." बॉस हसत म्हणाले.
"त्यासाठी तुम्ही रिटायर व्हायची गरज नाही आणि त्या मंकिजची काय मला एवढी आवड नाही; की तुम्ही रिटायर व्हायची मी वाट पहावी." देवेशने मान खाली घातली.
"अरे देवू, मी मस्करी करत होतो. मनाला लावून घेऊ नकोस. माझ्या रिटायरमेंटचा आणि तुझा काहीही संबंध नाही. अरे, माझं वय झालं आता रिटायरमेंट घ्यायचं. मी स्वखुशीने ती घेत आहे. कोणत्याही प्रेशर खाली नाही. तू उगीच टेन्शन घेऊ नकोस आणि तुझ्या वानर सेनेला तुझ्या ताब्यात घे. मी तर ऑफिसला येत राहीन आणि हो जास्त स्ट्रीक्टली वागू नकोस हां. चांगली आहे ती मुलंपण, एकमेकांना समजून घ्या. तुझ्याकडून मला खूप अपेक्षा आहेत हे तू जाणतोस." बॉसनी परत हातातलं काम करायला सुरुवात केली.
"येतो सर मी." त्याला कळलं होतं, आता यापुढे काही माहिती देणार नाहीत. त्यांच्या शांत काम करण्याचा अर्थ असा आहे; की \"आता तु जाऊ शकतोस.\" इतक्या वर्षांच्या एकत्र काम केल्यामुळे बॉसच्या वागण्याचा अर्थ त्याला बऱ्यापैकी समजत होता; तरीही थोडीशी चेहऱ्यावर नाराजी घेऊन तिरुपती निघाला.
\"मी किती विचारलं तरी ते सांगणार नाही हे मला माहीत होतं. तरी फक्त त्याच्या सांगण्यावरून मी त्यांना विचारायला गेलो. त्याने माझ्यासाठी खुप काही केलं आहे. त्याची इतकी छोटीशी इच्छा मी पूर्ण करू नाही शकलो. असो तो पुढच्या आठवड्यात हेड ऑफिस जॉईन करेलच. कदाचित त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला स्वतः लाच मिळेल.\" तिरुपती विचार करत त्याच्या केबिनमध्ये पोहोचला.
त्याला स्वतःला तर जाणून घ्यायचं होतंच; की बॉस का रिटायर होतायत. त्याचबरोबर त्या संध्याकाळी तो अचानक इतक्या वर्षांनी येऊन याला भेटला. ही रिटायरमेंटची बातमी त्यानेच तिरुपतीला पहिल्यांदा सांगितली.
खुर्चीत बसलेल्या तिरुपतीच्या डोळ्यासमोर ती संध्याकाळ उभी राहिली.
खुर्चीत बसलेल्या तिरुपतीच्या डोळ्यासमोर ती संध्याकाळ उभी राहिली.
________________________________________________________
नुकताच काम आटपून तो ऑफिसमध्ये बसला होता. इतक्यात त्याला मेसेज आला.
"खाली पार्किंग एरियात भेटू."
तिरुपतीच्या चेहऱ्यावर एक हास्य आले. तो लगबगीने आपल्या आवरून पार्किंगला जायला निघाला. लिफ्टमधून बाहेर येत होता तोच त्याला पांडव दिसले, ते काही गुंडांना घेऊन आले होते. सगळे निघून गेले मात्र सांज मागे राहीली. हा चालतच सांजच्या विरुद्ध दिशेने जात होता, तेव्हाच त्याला तिच्या कपाळावरची जखम दिसली. त्याची पावले आपोआप तिच्या दिशेने वळली. ही कधी व्यवस्थित राहणार नाही. एवढासा जीव आणि नुसती वळवळ. काय लावून घेतलं काय माहित. त्याने तिला तिरकसपणे विचारले. ते दोघे बोलत होते, तेवढ्यात त्याचा फोन परत वाजला.
"हॅलो, मी दुसऱ्या लाईनमध्ये उभा आहे. तू कुठे आहेस?"
तिरुपतीने काही न बोलता सांजला जाण्याचा इशारा केला आणि आपण फोनवर बोलत बोलतच सांगितलेल्या डायरेक्शन फॉलो करत त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचला.
"एम्बर, किती दिवसांनी दिसतोस?"
"बिग न्युज आहे म्हटलं तुला स्वतःच्या तोंडाने सांगावी म्हणून आलो. तुला प्रमोशन मिळतेय. काँग्रॅजुलेशन."
"थँक यु सो मच. म्हणजे बॉसला पण प्रमोशन मिळत असेल."
"थँक यु सो मच. म्हणजे बॉसला पण प्रमोशन मिळत असेल."
"नाही ते रिटायर होतात. त्यांनी प्रमोशन नाकारलं आणि रिटायरमेंट स्वीकारली." हे ऐकून तिरुपतीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
"त्यांना प्रमोशन मिळत होतं ना? मग त्यांनी असं का करावं?"
" हेच तुला शोधून काढायचं आहे. एवढं करशील ना माझ्यासाठी."
"तुला का या प्रश्नाचे उत्तर हवंय? माझं सोड. मी तर त्यांच्या ऑफिस मधलाच माणूस आहे."
"मलापण क्युरिओसिटी आहे रे. एवढं मोठं प्रमोशन त्यांनी का नाकारलं? तूला माहीतच आहे ते बर्याच जणांचा आदर्श आहेत. ही इस रोल मॉडेल."
"तुला का या प्रश्नाचे उत्तर हवंय? माझं सोड. मी तर त्यांच्या ऑफिस मधलाच माणूस आहे."
"मलापण क्युरिओसिटी आहे रे. एवढं मोठं प्रमोशन त्यांनी का नाकारलं? तूला माहीतच आहे ते बर्याच जणांचा आदर्श आहेत. ही इस रोल मॉडेल."
"ते तर आहेच." इतक्यात तिरुपतीचे लक्ष त्या दोघांकडे संशयाने बघणाऱ्या सांजकडे गेले आणि त्याने एम्बरला बाजूला नेले.
एम्बर अजून थोडा वेळ गप्पा मारून निघून गेला.
________________________________________________________
हवेतला गारवा हळूहळू वाढत होता. आकाशात दाह निर्माण करणाऱ्या सुर्यालाही आता स्वतःचा दाह सोसवेना. तो परतीच्या प्रवासाला निघाला. संध्येने तिचे शीतल श्यामल जाळे पसरवायला सुरुवात केली. तिच्या रंग छटांचा आस्वाद घेत स्वतःचा क्षीण कमी करत रवि अस्ताला गेला.
आकाशात आता तिमिर दाटू पाहत होता. मनात अजूनच दुःख साचू लागले. रात्रीला तिच्या एकांतात सोबत करायला तिच्या प्रियकराने हजेरी लावली होती.
त्याचे शीतल प्रतिबिंब कारंज्याच्या पाण्यात दिसत होते. कारंज्याचे शीतल तुषार मनाचा विरह दूर करण्यात असफल होत होते.
नेहमी प्रमाणे त्याच्या कठड्यावर बसून मीराने थंडगार पाण्यात पाय सोडले. एक हृदयाला गोठवून टाकणारा अनुभव तिच्या अंगप्रत्यंगातून धावत गेला.
नेहमी प्रमाणे त्याच्या कठड्यावर बसून मीराने थंडगार पाण्यात पाय सोडले. एक हृदयाला गोठवून टाकणारा अनुभव तिच्या अंगप्रत्यंगातून धावत गेला.
नकळतच ओठावर गीत उमलू लागले.
का रे दुरावा,
का रे अबोला
अपराध माझा
असा काय झाला?
अपराध माझा
असा काय झाला?
डोळे चंद्राच्या प्रतिबिंबावर जाऊन स्थिरावले. त्यांना रजनीच्या प्रियकरात आपल्या जीवलगाची प्रतिमा दिसू लागली, भासू लागली.
ओठ अजुनही मधुर गुंजारव करत होते.
ओठ अजुनही मधुर गुंजारव करत होते.
का रे दुरावा,
का रे अबोला
अपराध माझा
असा काय झाला
का रे अबोला......
का रे अबोला
अपराध माझा
असा काय झाला
का रे अबोला......
दृष्टी आता धूसर होऊ लागली होती. चंद्रानेही तिचं दुःख सहन न होऊन हळूच ढगांचा आडोसा घेतला.
नीज येत नाही
मला एकटीला
कुणी ना विचारी
धरी हनुवटीला
मान वळविसी तू
वेगळ्या दिशेला
अपराध माझा
असा काय झाला
का रे अबोला...
मला एकटीला
कुणी ना विचारी
धरी हनुवटीला
मान वळविसी तू
वेगळ्या दिशेला
अपराध माझा
असा काय झाला
का रे अबोला...
पाऊस येण्याअगोदर जसे झरझर काळे मेघ दाटून येतात. आकाश गडद होतं जाते. तशी तिची नजर आसवांच्या दाटीवाटीने ओथंबून गेली. तिने हळुवार पाण्यातून पाय बाहेर काढले. इतक्यात एक नर्स तिथे येऊन तिला रूममध्ये जायला सांगू लागली. ती हसली आणि पावले तिच्या खोलीकडे वळवली. हसली होती खरी पण का कोण जाणे ते हसू, ना मनापासून निघाले होते ना डोळ्यांपर्यंत पोहचले होते. ओठांवर प्रकट होऊन, ओठांवरच विरले होते. गाण्याचे बोल तेव्हा तिला सावरायला पुढे सरसावले.
तुझ्यावाचुनी ही
रात जात नाही
जवळी जरा ये
हळू बोल काही
हात चांदण्याचा
घेई उशाला
अपराध माझा
असा काय झाला
का रे अबोला...
तिचे पाऊल जरा डळमळले आणि दुरून पाहणाऱ्या व्यक्तीच्या मनात कालवाकालव झाली. त्याने धावत येऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि आधार देत तिला सावरले. तिने त्याच्या आधाराला असे आपलेसे केले की जसे तो अदृश्य होईल तिने त्याचा हात सोडला तर. पावले आता अतीसंथपणे पडत होती.
रात जागवावी
असे आज वाटे
तिने त्याच्या डोळ्यात बघत पुढील ओळी म्हणायला सुरुवात केली.
तृप्त झोप यावी
पहाटे पहाटे
नको जागणे हे
नको स्वप्नमाला
तिच्या डोळ्यातल्या आसवांनी रिते होतं त्याचे डोळे भरायला सुरुवात केली होती.
पहाटे पहाटे
नको जागणे हे
नको स्वप्नमाला
तिच्या डोळ्यातल्या आसवांनी रिते होतं त्याचे डोळे भरायला सुरुवात केली होती.
अपराध माझा
असा काय झाला
का रे दुरावा...
शेवटचं कडवं संपलं होतं. ती आणि तो तिच्या खोलीच्या दारापाशी पोहोचले होते. गाणे काय संपले जणू आसमंत स्थिरावला. कोणाची ही पर्वा न करता वाहणारा वाराही स्तब्ध झाला. घड्याळाची टिकटिक शांततेचा तह मोडत स्वतःचं अस्तित्व जाणवून देत होती.
दारात उभ्या डॉ. लोबोंना बघून ते तिथेच थबकले. त्याने काळोखाचा आडोसा घेत भरलेले डोळे लपवले.
"आपण कोण?"
"मैं रणछोड."
( गाणे :का रे दुरावा.
गीतकार : ग. दि. माडगूळकर,
गायक : आशा भोसले,
संगीतकार : सुधीर फडके,
चित्रपट : मुंबईचा जावई - 1970 )
-©® स्वर्णा
काळजी घ्या, आपली आणि आपल्या प्रियजनांची.
वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा
वाचत रहा. आनंदी रहा. सुरक्षित रहा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा