Login

पांडव भाग ४०

The Truth Always Comes Out
पांडव - fantastic five⭐
भाग ४०


(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)

आतापर्यंत आपण वाचले -

देवेशने ही नंदूसमोर आपले मनमोकळे केले.

सांजला पडणारे नाईट मेअर.

सांजच्या भूतकाळाबद्दल देवेशला पडलेले काही अनुत्तरीत प्रश्न.

फ्रेंडशिपने भरलेला ब्रेकफास्ट.

चित्रगुप्त शास्त्रीच्या विरुद्ध सर्व पुरावे मिळणं.

त्याचा सांजला आलेला फोन कॉल.
"मला फक्त तुला भेटायचं आहे. फक्त तुझ्याशी बोलायचं आहे. ते जर तिथे सगळ्यांसमोर बोलायचं असतं, तर मी आता तू जो फोन स्पीकर वर ठेवला आहेस; तेव्हाच नसतं का बोललो? मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे. म्हणून मी तुला बोलावत आहे. " चित्रगुप्तच्या प्रत्येक वाक्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. सांज मात्र अजूनही शांत होती. तो पुढे बोलू लागला, " तुझा आतापर्यंत माझ्यावरचा विश्वास उडाला असणार. तरीही विचारतो. तू माझ्यावर विश्वास ठेवून मला भेटायला येऊ शकतेस का?"

सांजने त्याचं बोलणं ऐकून एक दीर्घ श्वास घेतला आणि ती म्हणाली, "हो."


आता पुढे-

ठिकाण : सीबीआय हेड क्वार्टर

"एकटी येशील अशी अपेक्षा करतो. तुझ्या अपेक्षा जरी मी भंग केल्या असतील, तरी तू माझ्या अपेक्षांना तडा जाऊ देणार नाहीस. अशी वेडी आस आहे मला." त्याचा आवाज खूपच संथ येतं होता.


"हो. मी एकटी येईन. तुझ्या अपेक्षा सांगून झाल्या असतील तर मी ही एक अट ठेवू का?" सांज शब्द अगदी मोजून मापून बोलतं होती.

"हो, बोलना." ती काय सांगते हे ऐकण्यासाठी त्याने जीव कानात एकवटला.


" मी येईपर्यंत आणि तिथे पोहचल्यावर ही तू तूझ्या किंवा इतर कोणाच्याही जिवाचं काहीही बरं वाईट करून घेणार नाही आहेस." सांजच्या या शब्दांनी त्याच्या गालावर एक अश्रू ओघळला.

".......". काही वेळ पलीकडून काहीच रिप्लाय आला नाही.

"प्रॉमिस? हे तरी तू पाळशील. अशी मी आशा करते." सांजनेही त्याच्याच टोन मध्ये त्याला क्वेशनींग केलं.

"प्रॉमिस. मी तुला ॲड्रेस आणि टाईम कळवतो." एवढं बोलून त्याने फोन ठेवला.

फोन डिस्कनेक्ट होताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या.


"मला माहित आहे, आता तुम्ही सगळे म्हणाल; की मी एकटीने जाऊ नये. तरीही मी जाणारं आहे. मला काही माझ्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून हवी आहेत." सांज ठाम पणे म्हणाली.


" काही गरज नाही. ती उत्तर आम्ही त्याला इकडे पकडून घेऊन आलो की तुला घेता येतील. ही इज कॉल्ड ब्लडेड मर्डरर. तू तुझ्या जीवाशी अजिबात खेळणार नाही आहेस." देवेशच्या व्हॉईसमध्ये बॉसीनेस कमी कन्सर्न जास्त जाणवतं होता.

" वी ऑल एग्री विथ हिम. तू एकटीने जायचं नाही आहे. म्हणजे नाही." रावणने असं म्हणताच सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला.


"आय नो, ही इज मर्डरर. बट आय एम अल्सो अ वेल ट्रेनड कॉप." तिने बोलताना तिची बाजू घ्यावी म्हणून आशेने नंदूकडे पाहिले.

" ओके. तू जाऊ शकतेस फक्त त्याने सांगितलेली प्लेस अँड टाईम तू आम्हांला सांगायचीस." नंदूचा हा स्टँड बघून सगळ्यांना आश्चर्य वाटले.

"थँक्यू, बडी. येस मी तुला सगळी इन्फो आणि अपडेट देत राहीन." ती आता निश्चिंत झाली होती.

_______________________________________________________


ठिकाण: सीबीआय हेड क्वार्टर


"तुला असं वाटत नाही तू तिला परमिशन घेऊन चूक केली आहेस." ज्यूलिया रागात नंदूला म्हणाली.

"तिला काही झालं म्हणजे? आला मोठा तिची काळजी घेणारा! तिच्या परिस्थितीचा तरी विचार करायचा तू! हो! मला माहीत आहे. ती एक सक्षम कोप आहे. मी नाही म्हणत नाही; पण त्याच्याबाबतीत तिच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे. त्या सॉफ्ट कॉर्नरमुळे, ती त्याच्यावर पटकन हत्यार उचलणार नाही आणि याचा त्याने गैरफायदा घेतला तर? त्याला गुन्हेगार म्हणायला, आधी ती म्हणूनच तयार नव्हती. तू जे बोललास ते आम्हाला अजिबात  मान्य नाहीये." आज पहिल्यांदाच ज्युलिया नंदूच्या विरुद्ध बोलत होती.

"मला माहित आहे डार्लिंगच्या मनात त्याच्याबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर आहे. याचा अर्थ हा नव्हे; की तो त्याचा गैरफायदा घेऊ शकेल. मी असं कुठे म्हणालो? की आपण तिच्या मागे जाणार नाही. मी फक्त एवढंच तिला म्हणालो; की तू जा. आपण जायचं आहेच तिच्यामागे; पण तिला कळू न देता." त्याच्या या वाक्याने ज्युलिया मनापासून हसली आणि तिने त्याला मिठी मारली.

दोन क्षणांसाठी काय झाले, हे नंदूच्या लक्षातही आले नाही. आपण आपल्या नकळत काय करून बसलोय, हे तिला, तिच्या नाकात त्याच्या परफ्यूमची स्मेल शिरल्यावर लक्षात आलं.


एखाद्या परिस्थितीला सहज बळी पडेल ती ज्युलिया कसली? ती लाजली होती; पण चेहऱ्यावर मात्र तिने तसं काहीच दाखवून दिलं नाही. अगदी बिनधास्तपणे आणि सहजतेने त्याच्यापासून वेगळे होऊन त्याच्या खांद्यावर टॅप करत, ती म्हणाली,

"दॅटस् लाईक अ गुड बॉय. तुझ्याकडून मला हीच अपेक्षा होती." असं म्हणून वाऱ्याच्या झुळुकेसारखी तिथून निघूनही गेली.


नंदू मात्र तिच्या वागण्यातून सावरला नव्हता. सांज व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही मुलीने आजपर्यंत त्याला मिठी मारली नव्हती. अशी मिठी मारण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती.

"ॲक्शन प्लॅन काय आहे?" माधवने दोनदा त्याच्या कानात विचारले.

तो मात्र अजूनही मागच्या प्रसंगात गुंतला होता.

" ओ मिस्टर देवधर, मी तुमच्याशी बोलतोय!" माधवने वैतागून त्याला हलवले.


"तू मला काही म्हणालास का?"


"नाही! इथे मला वेड लागले, म्हणून मी एकटाच बोलतोय." माधव आता बऱ्यापैकी वैतागला.

"रावण, याला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे. आपल्याला माहीत होतेच; पण आता याने स्वतःही कबूल केले आहे; की हा वेडा आहे. तेव्हा उशीर नको करायला." नंदू आणि रावण एकमेकांकडे बघून हसू लागले.

"हा! हा! हा! झाली मस्करी करून, आता ऍक्शन प्लॅन तयार करूया का?"माधव जरा नाराजीनेच खांदे उडवत म्हणाला.


" हो फर्स्ट स्टेप, वेट अँड बी अलर्ट. जोपर्यंत सांज आपल्याकडे त्यांच्या भेटीची माहिती द्यायला येत नाही, तोपर्यंत तिला असं वाटलं पाहिजे; की आपण वेगळ्या गोष्टीत गुंतलो आहोत. हे सगळं फक्त तिला वाटावं म्हणून; पण आपण खरं स्वस्थ नाही बसायचं आहे. माधव, तू सांजच्या नंबरवर येणारे सगळे कॉल्स आणि मेसेज गॅदर कर. रावण, तुला मी मगाशी जे जीपिएस डिवाइस दिलं ते, तू तिच्या गाडीत फिट करून आला असशीलच." नंदूने रावणला असं विचारताच त्याने होकारार्थी मान हलवली.

"गूड. आता मी जरा मिस्टर खुरापातीबरोबर, बाहेर काही कामासाठी जातोय असे तिला सांगून तिच्याआधी निघतो. तू आणि रावण, ज्युलिया आणि स्वामीला प्लॅन समजावून सांगा. काहीतरी कारण ठरवून तुम्ही एकत्र निघा. मी जाताना एकदा तिला चित्रगुप्तच्या कॉलबद्दल विचारेन, म्हणजे तिला संशय नको यायला."नंदूने असं सांगताच माधवने डोक्याला दोन बोटं लावून त्याला सेल्युट केला," ओके."


"आज सकाळपासून तो खुरापातीच्या नसलेल्या पदरातला निखारा कुठे दिसला नाही ते." माधवने असं बोलताच नंदू आणि रावण हसायला लागले.

" ही इज ऑन अ टू डेज लिव्ह." रावण म्हणाला.

"मेडिकल?"माधव.

"नो पर्सनल." रावण.

"इज इट बिग इश्यू नाऊ?"नंदूने रागाने विचारले.

दोघांच्याही मनात लेफ्ट टू राईट सरळ रेषेत हलल्या.


_______________________________________________________


ठिकाण: सीबीआय हेड क्वार्टर, देवेशचं ऑफिस.


" मे आय कम इन, सर?" नंदूने डोअर नॉक करत विचारलं.

"येस." आतून आलेला आवाज जास्तच चिडलेला जाणवत होता.

नंदू दबकतचं आत आला.

"सॉरी, सकाळचा प्लॅन माझा नव्हता. डार्लिंग बोलली; की जरा तुझी गंमत करूया. थोडसं जरा जुन्या आठवणींना उजाळा." त्याने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.

" हे तू मला का सांगतोय?" देवेशचा आवाज अजूनही कमी झाला नव्हता.

"तू त्यासाठीच तर चिडला आहेस ना?" नंदूने विचारले.

" ……" देवेशने डोळे फिरवले.

" नाही? ओह मी डार्लिंगला एकटं जायला परवानगी दिली म्हणून तुला राग आलाय." नंदूने एक दीर्घ श्वास सोडला. " एवढंच ना? अरे! त्यासाठी बोलायला तर मी इथे आलोय."

"तू तडकाफडकी तिला \"जा.\" असं कसं सांगू शकतोस. मान्य आहे या सगळ्यामागे तुझा काहीतरी प्लॅन नक्की असणार; पण तुला वाटतं नाही तू त्याला अंडरइस्टिमेट करत आहेस." देवेशने मुठी आवळल्या.

" मी त्याला कधीच अंडरइस्टिमेट केलं नव्हतं. जेव्हा तो तुम्हांला इनोसंट वाटतं होता, तेव्हा ही तो माझ्यासाठी एक सस्पेक्ट होता."नंदूने आश्चर्याने विचारले.

"....." देवेश गंभीर होऊन नंदूचं बोलणं ऐकत होता.

" हे सगळं करण्यामागे माझा एक प्लॅन आहे. आता पर्यंत जर विचार केला तर त्याने कोणत्याही निरपराधी माणसाला त्रास नाही दिला. सो तो डार्लिंगलाही काही करणार नाही." नंदू अगदी बेफिकरीने म्हणाला. त्याने देवेशला त्याचा सविस्तर प्लॅन सांगितला.

"ओके. आय लाईक दॅट. चल आपण निघू या. मलाही संयुच्या नाईट मेअरविषयी तुझ्याशी बोलायचं आहे." देवेश जागेवरून उठतं बोलला.

" लेट्स गो देन." नंदूही उठून वळला आणि बाहेरच्या दिशेने जायला निघाला.

ते दोघेही देवेशच्या ऑफिसमधून बाहेर पडत होते, तेवढ्यात त्यांना समोरून येणारी सांज दिसली.


ती कुठल्यातरी विचारात गुंतलेली होती.


"डार्लिंग, चित्रगुप्तने काय मेसेज पाठवला?" नंदूला तिच्या चेहऱ्यावरून गडबड जाणवली होती.

"हो, नाही. अजून काही मेसेज नाही आला. आला की मी तुला सांगेनच." ती नजर चोरत म्हणाली.


"मला नाही वाटतं." नंदू तिच्यावर डोळे रोखून म्हणाला.

"का? का नाही वाटतं? बडी, तुझा माझ्यावर विश्वास नाही? तू तरी सांग याला; की मी त्याचा विश्वास नाही तोडणार." ती पॅनिक होऊन म्हणाली.

"अग हो, आम्हां दोघांनाही ते माहित आहे. तो त्याच्यासाठी नाही बोलला असं. आम्ही दोघे बाहेर जातोय. एक काम आलं आहे. त्यामुळे तुला मेसेज सांगण्यासाठी आम्ही ऑफिसमध्ये नाही भेटणार असं त्याला म्हणायचं होतं."देवेश तिला असं सांगताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

"मेसेज आला की कॉल कर आम्हाला. आम्ही नजर ठेवू. ओके." नंदूने तिला आश्र्वस्त केलं आणि निघाला.

तिच्यापासून जरा दूर गेल्यावर नंदूचा मोबाईल वाजला. त्यावर एक ॲड्रेस आणि टाईम होता.

त्याने तो वाचून तसाच फोन खिश्यात ठेवला. चेहऱ्यावर काही दाखवू न देता तो देवेशला घेऊन कॅफेच्या दिशेने निघाला.


_______________________________________________________


ठिकाण : सीबीआय हेड क्वार्टर.


सांज चित्रगुप्तच्या नव्या मेसेजची वाट बघत होती.

थोड्या वेळापूर्वी एक एक करून मेसेज येतं होते.

माझा पत्ता मोठे हृदय तुझे,
सध्या तिथे मार्ग नाही.
किती ते दूर जावे लागते?
एखादा रिक्षा धर तू बाई.

वाचून आधी ती थोडी चिडली; पण नंतर त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरचं तिला कौतुक वाटलं.

ते वाटतं असतानाच दुसरा मेसेज आला,


नाही निळा नाही पिवळा
प्रेमाचा माझ्या रंग लाल
तोच परिधान केलेला
निवड तू गाडीवान


मेसेज एका पाठोपाठ एक येत होते.


रंग सगळे सोडून गेले
तरी हे दोघे सोबत असतील.
मधुर संगीताच्या तालावर
पावले सगळ्यांची थिरकतील.

लास्ट मेसेज.

नको वाट बघुस माझ्या मेसेजची
वाट तुझी मी इथे पाहत राही.
चुकवून साऱ्यांच्या नजरा ये तू 
रवीला घरी जायची होईल घाई.


सांजने नोट डाऊन करायला सुरुवात केली.

फर्स्ट मेसेज मधून
१ बिग हार्ट रोडला जायचं,
२ तिथून रिक्षा पकडायची.

हे दोन क्लू मिळाले.

सेकंड मेसेज
३ रेड टी शर्ट ऑर शर्ट वेअर केलेला रिक्षा ड्रायव्हर चुझ करायचा.

थर्ड मेसेज

४ ब्लॅक अँड व्हाइट पब.

लास्ट मेसेज
५ टाईम :७:२३
तिने त्या दिवसाचा सनसेट टाईम सर्च केला.


ती हेड क्वार्टरमधून बाहेर पडली.

तिने पार्किंगमध्ये जाऊन स्वतःची गाडी काढली आणि बिग हार्ट रोडचा रस्ता धरला.


क्रमशः



©® स्वर्णा.




आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.