भाग ४३
(ही एक काल्पनिक कथा आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्याशी कृपया तिचा संबंध जोडू नये. कुठेही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा. बऱ्याच गोष्टी मनोरंजनासाठी लिहिल्या आहेत. खऱ्या आयुष्याशी त्याची कृपया तुलना करू नये. तुम्हाला वाचताना आनंद मिळावा हे एकमेव ध्येय आहे. धन्यवाद.)
आतापर्यंत आपण वाचले -
\"के जॉयला कसं मारलं?\" ते चित्रगुप्तने सांजला सांगितलं.
त्याने तिला ड्रग माफिया विरुद्ध प्रूफ दिला.
सिरियल किलरचा मर्डरपण त्याने कबूल केला.
नंदू आणि टीम त्यांच्यापर्यंत येऊन पोहचली.
चित्रगुप्त त्याच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी सांजवर सोपवून सरेंडर झाला.
"आई!" एक अस्पष्ट किंकाळी खोलीत पसरली. घामाने डबडबलेली ती गादीवर अंग आकसून बसली. इतक्यात तिच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि .......
ती दोन मजबूत बाहुपाशात बंदिस्त झाली. तो स्पर्श तिच्या देहाची थरथर थांबवणारा व मनाला शांत करणारा ठरला. ती तशीच त्याच्या मिठीत झोपली. तिला शांत तिच्या जाग्यावर झोपवून, त्याने तिच्या अंगावर पांघरूण घातले व खोलीतून बाहेर आला.
खोलीत काळोख असल्यामुळे, त्याला कळलं नव्हतं; की ती कोण आहे; ना की तिला कळलं होतं तो कोण आहे.
त्याच्या दृष्टीने त्याने एका घाबरलेल्या छोट्या मुलीला शांत केले होते. तिच्यासाठी तर तो एक आभास होता.
_______________________________________________________
आता पुढे -
ठिकाण : सांजच घर
रात्री पडलेल्या स्वप्नामुळे झोप नीट न झालेली सांज, आज जरा उशीराच उठली. तिचं उशिरा हे तरीही इतरांसाठी भल्या पहाटे होतं. एक्सरसाईज करत असतानाही तिला सतत काल रात्रीच्या ब्लर मेमरीज छळत होत्या. नेहमीप्रमाणे तिला क्लिअर काहीच आठवत नव्हतं.
तरीही काल रात्री काही तरी वेगळं घडलं होतं. इतर वेळी ती जाणून बुजून सगळं विसरायचा प्रयत्न करायची त्या मेमरी कुठे तरी आत मनात खोलवर पुरून टाकायची तिला घाई लागलेली असायची.
आज असं काहीच नव्हतं. जे काल रात्री घडलं त्यात नक्कीच इतर रात्रींपेक्षा काहीतरी वेगळं होतं. जे आठवायचा प्रयत्न तिचं मनसारखं करत होतं.
पण काय?
\" शी!! मला काहीच कसं आठवतं नाही.\" या विचारातच गुंतलेली असताना तिने ब्रेक फास्ट बनवला.
आजोंसाठी ब्रेकफास्ट प्लेट रेडी करून तिने ती त्यांच्यासमोर ठेवली.
या विचारांच्या गोंधळात आपण ज्या व्यक्तीच्या समोर प्लेट ठेवतोय ती व्यक्ती \" आजो \" आहेत का? हे तिने पहिलेच नाही.
डायनिंग टेबल समोरची खुर्ची ओढून बसत असताना त्याला किचनमध्ये काम करणारी सांज दिसलीच नाही.
त्याचा आज त्या घरातला तिसरा दिवस होता.
जेव्हा तो घरात राहायला आला तेव्हा त्याला एवढं माहित होतं; की या घरात एक रिटायर्ड ब्रिगेडियर आणि त्यांची नात राहतात. त्याला तिथे आल्यापासून ती दिसली नव्हती. त्यानेही तिची चौकशी करायचा विशेष प्रयत्न केला नव्हता. त्याची गरज एवढीच होती की त्याला राहायला एक शांत जागा हवी होती.
ब्रिगेडियर अय्यर आणि त्याचा पहिल्याच भेटीत हार्ट टू हार्ट बाँड जॉइंट झाला होता. त्यामुळे त्याने बाकी छोट्या गोष्टींना इग्नोर केलं होतं.
तिने त्याच्यासमोर जेव्हा प्लेट ठेवली, तेव्हा सहजच त्याने वर पाहिले.
तिला समोर पाहून तो फ्रिज झाला. तिने मात्र त्याच्याकडे पाहिलेही नाही.
\" ही इथे काय करते. इतकी सहज वावरते म्हणजे ही...............\" सांज अय्यर.\" अमादे!!!!(अरे माझ्या देवा) ही ब्रिगेडियरांची नातेवाईक आहे??? मला आधी का हा डाऊट आला नाही. तिचं आणि ब्रिगेडियरांच नातं आहे तरी काय? फर्गेट इट. कळेलच आपल्याला. \" तो विचार करत असताना, ती मात्र त्याच्याकडे न बघताच तिथून निघून गेली होती.
"ब्रेकफास्ट पेश किया जाय!!!" आजो सकाळचे ज्युडो ट्रेंनिग क्लास संपवून आले होते. त्यांच्या अश्या बोलण्याने सांज जरा गोंधळली.
पुन्हा बाहेर येत डायनिंग टेबलच्या दिशेने पाहू लागली आणि पाहतच राहिली.
तिच्या समोर बसलेला तो, तोच आहे. हे तिला पटतच नव्हते.
"......??????" तिने प्रश्नार्थक नजरेनं आजोंकडे पाहिलं.
" लेट मी इंट्रोड्युस यू बोथ. यंग मॅन, शी इज माय वन अँड ओन्ली डियरेस्ट ग्रँड डॉटर सांज, शी इज सीबीआय ऑफिसर." आजोनीं असं अग्नेयला म्हणत ते सांजकडे वळले. "सांज, ही इज अवर न्यू पेईंग गेस्ट. ही इज आल्सो अ सीबीआय ऑफिसर. मिस्टर ...."
" सीबीआय ऑफिसर मिस्टर अग्नेय." सांजने त्यांचं वाक्य पूर्ण केले. त्या दोघांनी मानेनेच एकमेकांना ग्रिट केले.
"तुम्ही एकाच ऑफिसला आहात का?" आता आश्चर्य वाटायची पाळी आता आजोंची होती.
दोघांनी एकत्र माना सरळ उभ्या रेषेत हलवल्या.
" ओके. दॅट्स गूड, म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांना आधी पासून ओळखतात. मग इंट्रोड्क्शनची गरज नाही. चला, ब्रेकफास्ट खाऊन घेऊ. तुम्हां दोघांना ऑफिसला जायचे असेल." असं म्हणत आजोंनीही डायनिंग टेबलजवळची एक चेअर बाहेर ओढली आणि बसले.
सांज दोन प्लेटमध्ये नाश्ता सर्व्ह करून घेऊन आली. एक तिने आजोंच्या पुढ्यात ठेवली आणि दुसरी प्लेट रिकाम्या चेअर पुढ्यात ठेवून आपण तिथे बसली.
अग्नेय शांतपणे पुढ्यातल जेवत होता. अधून मधून त्याची नजर सांजवर जात होती.
ती मात्र कुठेही न बघता प्लेटमध्ये डोळे रुतवून नाश्ता खात होती. आज तिचा चेहरा त्याला वेगळा वाटत होता.
तिने भरभर प्लेटमधलं संपवलं आणि तिच्या खोलीच्या दिशेने निघून गेली. तिची पाठमोरी आकृती नजरेआड होईपर्यंत त्याच्या डोळ्यांचा पाठलाग थांबला नाही.
तिला पाहणारे डोळे आता मात्र सरप्राइज झाले; कारण ती त्याचं खोलीत जात होती, ज्या खोलीत तो काल मध्यरात्री गेला होता. त्याचं असं तिच्याकडे टक लावून पाहणं आजोंच्या नजरेतून सुटले नाही.
आजोंना पास्ट नाईट आठवली. नेहमीप्रमाणे ते प्राणायाम आणि योगा आटपून बेडवर पडले होते. वयाच्या या पडावामध्ये लगेच झोप येणं ही आशाच त्यांनी कधी धरली नव्हती.
विचार आणि आठवणी यातून स्वतःला सावरत पापण्या मिटायला सुरुवात केली. तेवढ्यात त्यांच्या कानावर सांजचा आवाज आला. खरंतर तो तितका मोठा आवाज नव्हताच; तरीही त्या शांततेत आणि आजोंच्या जागरूक मनाने तो लगेच टिपला. बेड वरून उठतं त्यांनी टेबलावर ठेवलेले ग्लासेस डोळ्यांना लावले. बाजूला असलेला रॉब अंगात चढवत त्यांनी सांजच्या खोलीच्या दिशेने जायला सुरुवात केली.
खोलीजवळ येताच डोअर आधीच उघडा होता. त्यांनी रूममध्ये डोकावल; तेव्हा त्यांना अग्नेयच्या मिठीत थरथरणारी सांज आणि तिला निर्मळ मनाने आश्र्वास्त करणारा अग्नेय दिसला.
त्याच्या स्पर्शाने ती सावरत होती. सांज मुळातच खूप सेन्सिटिव्ह आहे. एखाद्याचा चुकीचा स्पर्श ती लगेच ओळखायची. ज्याअर्थी ती शांत होती, त्या अर्थी त्याच्या स्पर्शात काही वावग नव्हतं. आज इतक्या वर्षात पहिल्यांदा आजो आणि नंदू सोडून दुसऱ्या व्यक्तीच्या स्पर्शाने ती शांत होतं होती.
हे पाहून ते थोडा वेळ तिथेच थांबले. त्या दोघांच्या वागणुकीत त्यांना काही खटल नाही. अग्नेयला ऑकवर्ड वाटू नये; म्हणून ते सांज सेफ आहे याची खात्री करून, त्या दोघांनाही कळू न देता आल्या पावली माघारी परतले.
अग्नेय अजूनही काल रात्रीच्या विचारात होता.
\" मी जिला काल रात्री मिठीत घेतलं; ती कोणी हाय स्कूल गोइंग गर्ल नसून…… ती सांज होती!! तिने माझ्याबद्दल मिसअंडरस्टँडींग नाही ना करून घेतलं. काहीच बोलली नाही. तिचे ग्रँडपा इथेच बसले आहेत; म्हणून ती गप्प….. तिचे ग्रँडपा\" मनातल्या विचारांबरोबर नजर तिच्या ग्रँडपांकडे म्हणजेच आजोंकडे वळली.
आजो त्याने त्यांच्याकडे पाहण्या आधीच ब्रेकफास्ट वर कन्संट्रेट करून खाऊ लागले. त्याला त्यांचा अंदाज घेता येईना.
त्यानेही मग आपला नाश्ता घाईने संपवला आणि तयारी करायला आपल्या रूममध्ये गेला.
_______________________________________________________
ठिकाण: सांजचं घर
आजोंची थॉट प्रोसेस त्या दोघांभोवती फिरत असताना; ते दोघे त्यांना ऑफिसला जायला निघालेले दिसले.
" बाय आजो."सांज.
"बाय सर." अग्नेय.
" तुम्ही दोघे एकाच ऑफिसला जाताय ना मग दोन वेगवेगळ्या गाड्या का नेताय? फ्युल इज प्रिशिअस. यू मस्ट सेव्ह इट." आजो म्हणाले, तसे या दोघांनी एकच वेळी एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.
\" मी तयार आहे; पण ही येईल का माझ्या बरोबर?\" तो तिथेच तिला पाहत उभा होता.
\" असा काय उभा आहे हा? कसली वाट बघतोय? उशीर होईल जायला. मीच माझी गाडी घेते.\" ती मनात चरफडत स्वतःच्या गाडीच्या दिशेने निघाली.
"काय पाहत उभा राहिला आहेस? ती जाईल हां तुला सोडून. तिला गाडीत बघत बसत." आजोंनी त्याला वेक अप कॉल केला.
तो ही धावतच तिच्यामागे गेला.
गाडीत दोघेही शांत होते.
\" कशी सुरुवात करू? तिने माझ्या वागण्याचा वाईट अर्थ काढला नसेल ना????\" तो.
"काही म्हणालास का?" ती.
\" चल अग्नेय, पटकन सॉरी म्हणुन घे.\" तो, "ते कालच्यासाठी सॉरी."
"इट्स ओके. नो प्रोब्लेम. होत असं प्रत्येकाबरोबर."ती पुढे बघून गाडी चालवत म्हणाली.
"नाही ग! माझ्याबरोबर नाही होतं. ती माझी पहिलीच वेळ होती." तिला पटवून देण्यासाठी कासावीस झालेला तो. थोडासा आश्चर्य चकित ही झाला.
\" एवढी मोठी गोष्ट ही इतक्या सहज घेते?? मी मारलेली मिठी जरी निर्मळ असली तरी तिला वाटू शकतं मी परिस्थितीचा गैरफायदा घेतला. नाही माझा असा काही उद्देश नव्हता. मला हे तिला पटवून द्यावं लागेल.\" तो आता मात्र खूप सिंसियरली म्हणाला,
" नाही मी असा नेहमी नाही वागत."
" नाही मी असा नेहमी नाही वागत."
"इट्स ओके. कामाच्या दिवसात दोन दिवस सुट्टी घेणं इट्स नॉट अ बिग डील." तिचं लक्ष अजून ही समोर.
"?????" \" काय? सुट्टी? हिला काय वाटलं? मी कालच्या सुट्टीबद्दल बोलतोय. हिला आठवतं नाही आहे; की ती विसरायचा प्रयत्न करत आहे; की तिला हे इतकं कॅज्युअल वाटत. \" त्याच्या भुवया आकसल्या.
"हाऊ आर यू फिलिंग नाऊ?" त्याला या विचारात पुन्हा कालची रात्र आठवली. त्याने अगतिक होऊन तिला विचारलं.
"आय एम फाईन. मला काय झालंय?" आता मात्र ती कन्फ्युज होऊन त्याच्याकडे पाहू लागली. तसा तो गोंधळला. \" त्या मोठ्या मोठ्या डोळ्यात बघून कसं सांगायचं; की काल तू रेस्टलेस होतीस आणि मग मी तुला…\"
"काल चित्रगुप्त सरेंडर झाला ना! डी टी काल म्हणाला मला." त्याच्या या वाक्याने तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले.
\" ओह आता लक्षात आलं. ही तेच सगळे प्रसंग आठवून अशी रिॲक्ट झाली असणार. तिला यातून सावरायला थोडा वेळ लागेल. त्यात मी कुठे तिला त्याचं गोष्टींची आठवण करून देतोय.\" तो ओठांनी गप्प असला तरी मनात मात्र विचारांची वर्दळ होती.
"डी टी?" तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिले.
"देवेश तिरुपती." त्याचं एक्स्प्लेने शान आणि तिचं गाडी चालवताना मान हलवून \" ओह आय सी.\"
"......"तो पुढे काही विचारणार एवढ्यात ऑफिस आलं.
_______________________________________________________
ठिकाण: सीबीआय हेड क्वार्टर
" गूड मॉर्निंग."
" गूड मॉर्निंग."
सकाळी सकाळी सगळे एकमेकांना विश करत होते.
सांज आणि अग्नेय एकत्र येताना दिसले तरी बाकीच्यांना तो कोइन्सिडन्स वाटला. त्यांनी ती गोष्ट निग्लेक्ट केली.
"किलिंग इज हिलींग केस सोलव्ह झाली आहे. आपण आता त्या केसमध्ये ज्या लीड मिळाल्या होत्या त्याचा युज करून ड्रग माफियाला टार्गेट करूया." तिरुपतीच्या बोलण्याला सगळ्यांनी दुजोरा दिला.
"एन के, तू आणि स्वामी ने सुद्धा काही माहिती गोळा केली आहे ना?" देवेशने नंदूला एन के म्हटलं खरं! आता मात्र माधवचं तोंड बघण्यासारखं झालं होतं. भरीस भर त्यावर नंदू काहीच रीॲक्ट झाला नव्हता.
"मला इथे काम नाही करायचं आहे!" माधव जवळ जवळ किंचाळत जागेवरून उठला.
सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले.
\" याला मध्येच काय झालं?\"
"व्हॉट हॅपन माधव?" सांज वैतागत म्हणाली.
"आपल्या टीमचा रूल काय आहे? नो सिक्रेटस करेक्ट ना?" त्याच्या असं विचारण्यावर सांजने होकारार्थी मान हलवली.
"मग तुम्हां तिघांचं पॅच अप झालं आहे. हे कधी सांगणार?"आता मात्र सगळे हसायला लागले.
"त्यात सांगण्यासारख काय आहे? त्यांनी न सांगता ही आम्हांला कळलं हो की नाही रावण?" ज्युलियाने असं विचारताच रावणने मान हलवली." तू लेट करंट आहेस. त्याला आम्ही काय करणार." ज्युलिया आता त्याची टांग खेचू लागली.
सगळे हसत होते; मात्र त्यांच्या पुढे वेगळं चॅलेंज त्यांची वाट बघत होते.
क्रमशः
©® स्वर्णा.
आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट माध्यमातून तुमचा प्रतिसाद नोंदवा.
प्लीज वाचायला नक्की वेळ काढा आणि तुमचे अभिप्राय नोंदवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा