माई आणि आर्या मानवला विचारू लागल्या,
"काय झालं? तनिषा बेशुद्ध का झाली?"
मानवने दोघींना आधी धीर दिला,
"सिरीयस काही नाही, ब्लड प्रेशर वाढल्याने तिला भोवळ आली आणि ती बेशुद्ध झाली"
पण एवढंच कारण नव्हतं, इतकी वर्षे स्वतःकडे झालेलं दुर्लक्ष, ब्लड प्रेशर, डायबिटीस सारखे वयानुसार वाढलेले विकार आणि सततचा तणाव..या सर्वांनी आज शरीरावर ताबा मिळवला होता.कामाच्या मागे धावताना तिने स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. सतत नवनवीन योजना, रणनीती, डावपेच आणि ध्येय सर केल्याशिवाय शांत न बसण्याची वृत्ती.. आज हे सगळं बाहेर आलं होतं. शरीर जणू सांगत होतं की आता बास झालं, थांबव आता हे सगळं..!
तनिषा शुद्धीवर आली. डॉक्टर मानवला भेटले..
"हॅलो मिस्टर मानव, तुम्हीही एक डॉक्टर आहात त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही, पण तरीही माझ्या ट्रीटमेंटचा एक भाग म्हणून सांगतो.. मॅमचं शरीर वेगवेगळ्या आजारांनी पोखरत चाललं आहे, आज थोडक्यात निभावलं पण जसजसं वय वाढत जाईल तसतसं मॅमची प्रतिकारशक्ती कमी होत जाईल, त्यांना आता तणावमुक्त आणि पथ्यपाणी पाळणाऱ्या आयुष्याची गरज आहे."
मानवला हे सगळं माहीत होतं, त्याने मान डोलावली, डॉक्टर ला थँक्स म्हटले. दोन दिवस तनिषा हॉस्पिटलमध्येच होती. तिसऱ्या दिवशी तिची प्रकृती सुधारायला लागली.
***
(शब्दांतर ऑफिस)
इनायाला आता शब्दांतरमध्ये महत्वाचे निर्णय घेणं भाग होतं. मासिकात बऱ्याच काळापासून काहीही बदल झाले नव्हते, काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची गरज वाटत होती. इनायाने तांत्रिक बाजू सांभाळली होती, त्यामुळे या नवीन कल्पना, उपक्रम राबवणं तिला कठीण जात होतं. पण बदल करणं आवश्यक होतं, लोकांना काहीतरी नवीन देऊन लोकप्रियता टिकवून ठेवणं महत्वाचं होतं. इनायाला काहीही सुचत नव्हतं. ती शब्दांतरचे जुने मासिकं चाळत बसली. त्यातून काही मिळतंय का हे बघू लागली. ज्या ठिकाणी शब्दांतरच्या जुन्या मासिकांचा संग्रह होता तो चाळत असतांना तिथून अचानक एक फाईल खाली पडली. इनायाने कुतूहलाने ती उघडली. त्यातलं एकेक पान ती वाचू लागली, वाचता वाचता मटकन खुर्चीवर बसली..मन सुन्न झालं.. विचारशक्ती मंदावली.. काय होतं त्या फाईल मध्ये?
"साल 2010-2015- या काळात खालीलप्रमाणे बदल मासिकात यायला हवे.
- प्रि वेडिंग फोटोशूट बद्दल माहिती
- डाएट बद्दल माहिती
- वाचकांसाठी वाचन प्रकल्प
- प्रि वेडिंग फोटोशूट बद्दल माहिती
- डाएट बद्दल माहिती
- वाचकांसाठी वाचन प्रकल्प
साल 2015-2020
- आरोग्यविषयक
- बाल संगोपन
- आरोग्यविषयक
- बाल संगोपन
साल 2020-2025
- फ्रिलांस म्हणजे काय?
- उद्योजक कसा असावा?
- फ्रिलांस म्हणजे काय?
- उद्योजक कसा असावा?
साल 2025 ते 2030
..
...
..
...
आणि ही यादी अगदी 2060-2065 पर्यंत लिहिली होती.
आपण उद्या असू अथवा नसू, शब्दांतर जगायला हवं, इथला उत्साह टिकून राहायला हवा, लोकप्रियता वाढत जायला हवी या सर्वाचा विचार तनिषाने खूप पूर्वीपासूनच करून ठेवला होता. ती फाईल सुद्धा अश्या जागेवर ठेवली होती.. तिला माहीत होतं की नवनवीन कल्पनांसाठी माझ्या नंतर एखादा व्यक्ती येईल आणि त्याला हे सापडेल. जेव्हा कल्पना, नावीन्य संपेल तेव्हा तो इथवर नक्की पोहोचेल.. आणि तेव्हा त्याला याची गरज पडेल !
"मे आय कम इन?"
केबिनचं दार उघडून आत एक महिला आली.
इनाया काही क्षण तिच्याकडे बघत बसली आणि अचानक म्हणाली..
"तू शलाका ना? तनिषा मॅमची बायोग्राफी लिहिणारी?"
"हो मॅडम, पण तुम्ही ओळखलं मला?"
"बऱ्याच वर्षांपूर्वी आपली भेट झालेलीच की..."
"पण नंतर बराच काळ गेला...मीही संसारात रमले.."
"हम्म...तू नाही गेलीस अमेरिकेत? भैरव सोबत?"
"मॅडम, मी त्याचसाठी आज माफी मागायला आलेली आहे..माझ्या नवऱ्याने जे काही केलं त्याला माझा अजिबात पाठिंबा नव्हता, पण भैरवने काहीएक ऐकलं नाही...तो इतका कसा बदलला हे एक कोडंच आहे माझ्यासाठी. मी खूप समजावलं, पण सगळं व्यर्थ. तो कृतघ्न झाला, पण मी नाही... मीही जातेय अमेरिकेत, पण मला तनिषा मॅम सोबत काम करायचं आहे...भैरव साठी नाही.."
इनाया काहीवेळ विचार करते, आणि म्हणते..
"आज तनिषा इथे असती तर काय म्हणाली असती माहितीये?"
"काय.."
"भैरव आणि तुझ्यात वाद होतील, तुमच्या संसाराला तडा जाईल असं काहीही कृत्य करायचं नाही.. आपलं कुटुंब आधी मग बाकीचं. त्याने जे काही केलं ते आपल्या कुटुंबासाठीच ना?"
"जर कुटुंब प्राथमिकता असेल तर तनिषा मॅमने का दूर ठेवलं आपल्या कुटुंबाला?"
"कारण तुझ्यासारख्या अश्या अनेक कुटुंबांना घरपण मिळावं, कौटुंबिक समाधान मिळावं म्हणून ...दिव्यांनी सजलेलं अंगण सर्वांनाच प्रिय असतं, पण पहिला दिवा पेटण्यासाठी कुठल्यातरी एका काडीला समर्पित व्हावं लागतंच ना...त्याशिवाय ही रोषणाई दिसणार कशी?"
***
"मानव, तनिषाचे इथे खूप हाल झाले असणार, स्वतःकडे दुर्लक्ष झालं असणार, त्याशिवाय का तिची ही अवस्था झालीये? आता बास, चुपचाप इथलं सगळं थांबवायचं आणि भारतात परतायचं..मी काहीएक ऐकून घेणार नाही..तिला म्हणा आता तुला इथे अजिबात थांबता येणार नाही, हुकूम आहे माझा.."
नर्स धावत डॉक्टरकडे पळत जाते,
"डॉक्टर, ब्लड प्रेशर अचानक वाढलंय परत.."
डॉक्टर पटकन चेकिंग साठी जातात. आर्याही मागोमाग जाते. तिथे tv वर बातम्या सुरू असतात..भैरव भर सभेत आपल्या कंपनीची नवीन announcement करत असतो.
"Face of America ची नवीन घोषणा, आता वर्तमानपत्र येणार नव्या अवतारात...वर्तमानपत्र वाचून झाल्यावर पेपर बॅग म्हणून त्याचा पुनर्वापर करता येऊ शकेल..आणि आता वर्तमानपत्रात असेल विनोदी, मिश्किल मजकूर.. saracastic बातम्या, व्यंगचित्रे आणि बरंच काही.."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा