द बॉस पर्व 3: भाग 3

इनायाला मिळताय संकेत
इनया केबिनमध्ये जे घडलं त्याचा विचार करतच घरी येते पण रात्रभर तिला झोप लागत नाही. तनिषाच्या केबिनमध्ये जे घडलं तो योगायोग होता? की कसला संकेत?

इनाया भूतकाळ आठवू लागली. अमेरिकेत आपलं प्रस्थ स्थापन करून तनिषा भारतात परतली होती, सगळं सुरळीत सुरू होतं पण...शेवटचा दिवस..तनिषा पूर्ण ऑफिसमध्ये फिरली, तिच्या केबिनमध्ये बराच वेळ काहीतरी करत होती आणि अचानक तिला चक्कर आली होती..गेली कित्येक वर्षे बिझनेसमध्ये आपला जीव ओवाळून टाकल्यानंतर तिच्या तब्येतीची तीन तेरा वाजले होते..म्हणूनच तो अटॅक आणि...

इनाया त्या आठवणीने पटकन उठून बसली. डोळ्यावर चष्मा चढवला..खिडकीबाहेर बघून पुन्हा विचारात मश्गुल झाली.

"तनिषा नक्की या जगात नाही ना? ती या जगात असण्याची शक्यताच नाहीये.."

पण सोबतच दुसरी शंका मनात घर करू लागली..केबिनमध्ये आज तो प्रकार घडला होताच.. पण, ती तनिषा होती..ती काहीही घडवून आणू शकत होती..

जर ती जिवंत असेल तर?? पण ती का असं करेल? जिवंत असती तर एकदा तरी भेटायचा प्रयत्न केला असता तिने..

नाही नाही..आज हे भलतेसलते विचार डोक्यात का गुंता करताय कळत नाहीये..

डोकं पकडून इनाया कशीबशी झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी अनकाला सुट्टी असल्याने ती उशिराच उठली होती.. उठल्या उठल्या तिने tv सुरू केला..इनायाने तिला चहा आणून दिला आणि इनायाही तिच्या शेजारी बसली..

"मग..पुढे काय करायचं ठरवलंस?"

"अम्मा..मी आणि माझ्या मैत्रिणींनी दुसऱ्या एका शहरात एका कोर्ससाठी जायचं ठरवलं आहे..तिथे बिझनेस मॅनेजमेंटचे धडे देतात म्हणे.."

"बरं.. कधी जाणार? आणि किती दिवस?"

"चार दिवसांचा कोर्स आहे..तिथे आम्ही 2 रूम बुक करतो..उद्या जायचं आहे.."

"आणि तू मला हे आत्ता सांगतेस??"

"अगं काल रात्रीच बोलणं झालं आम्हा मैत्रिणीचं..तेव्हा ठरवलं आम्ही.."

"बरं आता काय बोलणार.."

"बरं आई...या बिझनेस वूमन कसल्या सॉलिड असतात ना? काय तो swag, काय तो attitude..."

"तुला तसं राहायचं आहे म्हणून बिझनेस करायचा म्हणतेस का तू?"

"तसं नाही गं.. पण बिझनेस वूमनची किती मजा असते ना? टिपिकल बायकांसारखं नसतं त्यांचं जीवन.."

हे ऐकून इनाया हसायला लागते..

"हसायला काय झालं अम्मा?"

"माझ्या तनिषाची आठवण झाली.."

"त्यांचा swag तर भारीच असेल की.."

"तू जे बोललीस, त्यातलं काहीही नव्हतं तिच्याकडे.. ना attitude ना कसला पेहराव..अगदी सामान्य बाईसारखी फिरायची गं ती..भाजीला स्वतःच जायची, चार दुकानं फिरून पोरींचे शाळेचे प्रोजेक्ट पूर्ण करायची..चार माणसात मिसळून जायची..तळागाळातील लोकांपासून ते उच्चपदस्थ लोकांपर्यंत सर्वांमध्ये ती लोकप्रिय होती.."

"काहीही सांगतेस..तनिषा मावशी, जिने बिझनेस of the year चा अवॉर्ड मिळवला..जिने अमेरिकेत आपलं प्रस्थ मांडलं.. जिची बातमी परदेशातील वर्तमानपत्रात मुख्य पानावर यायची ती अशी साधी असेल?"

"होय...तुला नाही माहीत...कोणत्या दिव्यातून ती गेलेली.. एकीकडे मनातील स्वप्न, दुसरीकडे घरातून तिचा मोडीत काढला जाणारा संघर्ष.. एकीकडे करोडोंची उलाढाल.. दुसरीकडे स्वतःच्याच अस्तित्वासाठी धडपड..मोठी कहाणी आहे ती...तुला नाही कळणार.."

"आई, तिच्या आयुष्यावर एखादा चित्रपट बनू शकतो की गं.."

"ऑफरही यायच्या तश्या...पण तनिषा ऐकेल तेव्हा खरं.. तिला प्रसिद्धीची हाव नव्हती..तिला फक्त आपलं काम महत्वाचं होतं.."

आईने तनिषाचं वर्णन केल्यावर इनाया मनातल्या मनात तिची छबी घोळवू लागली..

"काय लेडी असेल यार ही...हवी होती आज.."

दुसऱ्या दिवशी इनायाने आपली बॅग भरली आणि आपल्या कोर्ससाठी जायला निघाली. इनायाच्या सतत सूचना सुरू होत्या..

"बाहेरचं जास्त खाऊ नकोस..मैत्रिणींना सोडू नकोस..एकटी कुठे फिरू नकोस.."

"हो गं आई.."

असं म्हणत इनायाने अम्माचा निरोप घेतला. इनाया एकटी घरी होती, हे एकटेपण तिला कधीच खात नव्हतं..उलट हा एकटेपणा तिला फार प्रिय होता.. तनिषामुळे त्या घातक नवऱ्यापासून सुटका झालेली...नाहीतर, आज मी आणि माझी लेक कुठे खितपत पडलो असतो कुणास ठाऊक..

4 तास उलटले, इनाया अनकाला फोन लावत होती पण फोन लागेचना. इनायाची काळजी वाढू लागली..तिने तिच्या मैत्रिणींना फोन केला, त्यांचेही फोन रेंज मध्ये नव्हते.

क्रमशः


🎭 Series Post

View all