पुर्वाध (उमेश फक्त स्वातीला गोवण्यासाठी मिहीकाचं घर टापटीप केल होतं..पण खरा खुनी कोणीतरी दुसरा होता हे सांगणारा डाग म्हणजेच बुटाचा ठसा शरण्याला कोड घालत होता.कसं सोडवेल ती हे कोडं.जाणून घ्या अंतीम भागात.)
शरण्याने उमेशचा हाच कबुलीजबाब घेतला आणि त्याच्याकडुन सोफ्टवेअर कंपनीच्या त्या माणसाचा नंबर घेतला ज्याने सीसीटीव्ही आणि थंब इंप्रेशन डिलीट केलं.
शरण्याने फोन न करता डायरेक्ट कंपनीतच जाऊन त्या माणसाला उचललं कारण फोन करून बोलावलं असतं तो सावध झाला असता.शरण्याने उमेशचा कबुलीजबाब दाखवला आणि त्याला त्याचा गुन्हा मान्य करायला सांगितला.
आधी तो माणुस आपण हे केलच नाही, हे खोट आहे असा कांगावा करत राहिला, पण मग पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने मान्य केल की दुसऱ्या दिवशी त्याने उमेशचे लॉग डिलिट केले.
शरण्याला आता खरच केस खुप कॉम्पलिकेटड वाटायला लागली होती. खुनी सोसायटीतच वावरत होता. कोणी बाहेरच असं त्यादिवशी सोसायटीत आलं नव्हतं. शरण्याने परत मिहीकाचे वॉटसअप मॅसेज चेक करायला सुरवात केली. एक नंबर तिला जुन्या चॅटमध्ये दिसत आधी दिसत होता, पण तिच्या फोनमध्ये आता नव्हता.
शरण्याला जाणवलं की खुन्याने मिहीकाच्या मोबाईलमधुन स्वत:चा नंबर व इतर चॅट डीलीट केली आहे. कदाचित त्यासाठी तो परत आला असावा आणि त्यावेळी पावसाच्या पाण्यामुळे गालिच्याला डाग लागला असावा. तिने तो गालिचा एविडन्स बॅग मधुन काढला. तेव्हा तिला जाणवलं गालिच्यावरती खुप चिखल आहे. जणू कुणीतरी पायाचा ठसा राहू नये म्हणुन गालिच्याला अगदी जोरात पाय पुसले असावे.
शरण्याने वॉटसअपकडून त्या नंबरचे जुने बॅकअप चॅट मागवले व त्या बेसिस वर अरेस्ट वॉरंट काढलं आणि ती मिहीकाच्या सोसायटीत पोहचली. तिने साबळे यांच्या घरी बेल वाजवली. शरण्याला आपल्या टीम बरोबर परत पाहुन साबळे यांनी विचारलं.
"बोला मॅडम.. परत काही विचारायचं होत का ? सापडला का खुनी तुम्हाला ?
"हो !साबळे साहेब.मी तुमच्या मुलीला अरेस्ट करायला आली आहे. हे घ्या अरेस्ट वॉरंट."
"काय रेवा ..? ती असं का करेल ?तुमचा काही गैरसमज होतोय." साबळे चकीत होऊन म्हणाले.
"ते तुम्ही रेवालाच विचारलं तर बरं होईल. रेवा तू सांगणार का मी सांगू ?" शरण्याने रेवाकडे पाहत विचारलं.
रेवा थंड उभी होती जणू तिला काहीच आश्चर्य वाटत नसावं. ती म्हणाली ,
" हो! मीच मारलं मिहीकाला. मिहीका माझी प्रियकर होती. मी प्रेम करायची तिच्यावर. तिने मला वचन दिल होतं की उमेश अंकल कडुन सोने आल्यावर आम्ही पळुन जाणार होतो...पण नंतर मला कळलं की मिहीका मला फक्त भुलवत होती कारण मी तिच्या हौशी पुऱ्या करायच्या होत्या. तिच तर दुसऱ्या मुलाबरोबर अफेयरही होतं. मला हे सहन झालं नाही. मी मिहीकाला मारायचं ठरवलं."
"मग तू मिहीकाला मारलं कसं ?" शरण्याने विचारलं.
"परफ्युम कलेक्शन करणं, तिला खुप आवडायचं म्हणुन मी खुपच महागडा परफ्युम मागवला. आधीच मी डार्क वेब मधुन क्लोरोफॉर्म मिळवुन ठेवला होता."
"मी मिहीकाला त्या दिवशी फरफ्युमचा फोटो पाठवला आणि मला शेवटचं भेटायचं आहे म्हणुन तयार राहायला सांगितलं. मला माहित होतं..तो परफ्युम मिळवण्यासाठी ती नक्की मला भेटेल. झालही तसचं.मी आधी तो सुगंध तिच्या ड्रेस वर मारला आणि जेव्हा ती तो सुगंध एन्जॉय करत होती. मी क्लोरोफॉर्म तिच्या तोंडावर गच्च पकडला.
"ती बेशुद्ध पडली .मग मी तिकडेच पडलेल्या पॉलीथीनच्या बॅगेने तिचा जीव घेतला.मी क्लोरोफॉर्मचा वास जावा म्हणुन दरवाजा उघडा ठेवला होता.पाहिलं तर उमेश अंकल आत आले आणि परत ते काहीवेळेने बाहेर गेले. ते गेल्यावर मी ही खाली आली. थोड्यावेळाने लक्षात आलं, ह्या सगळ्या गडबडीत मी माझा परफ्युमची बॉटल तिकडेच विसरली होती म्हणुन परत आत गेली."
" मी बाहेर पडणार तेव्हा मला उमेश अंकल परत आत येताना दिसले म्हणुन मला अंकल परत घरातून जाईपर्यंत बाल्कनीतच उभं राहवं लागलं.पाऊस पडुन गेल्यामुळे माझ्या बुटांना चिखल लागला होता.मी मिहीकाच्या डेडबॉडीकडे गेली आणि परफ्युमची बॉटल उचलली. तिकडेच असलेल्या गालिच्याला पाय पुसला आणि लॅच ओढून परत घरी आले."
"बाबा आणि आई तेरवा घरी नव्हते म्हणुन मी तिला त्यादिवशी मारायचं ठरवलं होतं. मला काही पश्चाताप नाही आहे कारण मिहीका सारख्या स्वार्थी मुलीला मारून मी चांगलच केलं असं मला वाटतं."
शरण्याच्या टीमने रेवा वर मनुष्यवध आणि उमेशवर खुनाचे पुरावे नष्ट करणं आणि कट कारस्थान करणं हे चार्ज लावुन दोघांना अटक केली. तसचं शरण्याने स्वातीला ओसीडीसाठी ट्रिटमेंटलाही पाठवलं. स्वातीचा ओसीडी जरी पुर्ण बरा झाला नसला तरी आता तो बराच आटोक्यात असतो. खरच जर रेवाच्या बुटांनी डाग लावला नसता तर निर्दोष स्वाती गुन्हेगार ठरली असती, म्हणुन कधी कधी घरात असणारे डाग चांगलेही असतात.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा