Login

डाव नियतीचा भाग : 3

ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे .
डाव नियतीचा भाग : ३
------------
समर एक दीड तासात राणीच्या मिळालेल्या पत्त्यावर पोहोचला. समोर एक मोठी बिल्डींग होती. त्याने बिल्डिंगच्या वॉचमनला राणीबद्दल विचारलं. वॉचमनदादा म्हणाले की "इस जगह ऊपर वाले फ्लैट में रानी और उसके पापा दोनों ही रहा करते थे ।वह लोग बहुत अच्छे थे। रानी जी के पैदा होने पर उनकी माँ कुछ दिन बाद चल बसी तबसे रानी का पालन पोषण अकेले उनके पिता ने किया। रानी जी को कॅन्सर हुआ ऐसे सुनने मे आया और वो लोग महाराष्ट्र चलें गयें इलाज के लिए। वो लोग वही के थे यहाँ तो बस बेबीजी की पढ़ाई के लिए आये थे। इसके सिवा कुछ पता नहीं ।" वॉचमन जे काही बोलले ते ऐकून समरच्या हाती फक्त निराशा आली. समर परत जाण्यास निघाला. आता त्याला राणी कधी भेटेल याची काहीच शाश्वती नव्हती. आता राणीच्या बाबांना कॉल करणे हा शेवटचा एकच पर्याय उरला होता.
"आप जिस नंबरसे संपर्क करना चाहते हैं वह अभी सक्रिय नहीं है ।" शेवटची एक उमेदीची ज्योत होती ती देखील विझली.
आज पुन्हा हताश, निराश होऊन समर घरी परतला. समरचे काका-काकी देखील समर ची ही स्थिती पाहून काळजी करू लागले. काकीने समरच्या आई-बाबांना निरोप दिला. समरचे आई-वडिलांसोबत बोलणं झाले तेव्हा समर म्हणाला, "काही नाही अभ्यास खूप आहे म्हणून थकतोय" असे उत्तर दिले.
आता समर दररोज न चुकता कॉलेजला जाऊ लागला. आई-वडिलांच्या परिश्रमाचे जाण असलेला समर परीक्षेसाठी चांगली तयारी केली.खूप मन लावून अभ्यास केला. अभ्यास, परीक्षांची तयारी , प्रॅक्टिकल्स या सर्वांत समर स्वतःला मग्न ठेवलं. पाहता पाहता वर्ष सरलं. येथे समरच्या ध्यानी मनी कोरली गेलेली राणीची प्रतिमा तशीच राहली होती. समरने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. एमबीबीएस करून एक चांगला डॉक्टर बनून पुन्हा आपल्या गावी, महाराष्ट्रात परतला. शहरात एका खाजगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत समर कॅन्सरवर संशोधन सुरू ठेवलं.
एके दिवशी आपल्या कार ने ड्युटीवर जात होता सिग्नलवर गाडी थांबली असताना रस्ता ओलांडून एक मुलगी एका वयस्कर माणसासोबत जात होती. तेच पाठीवर रुळणारे मऊसूत केस,तीच कांती, तसेच तेज पाहतो तर काय चेहरा ही तोच. सिग्नल च्या दुसऱ्या बाजूला रस्ता ओलांडणारी राणी पाहून समरला आश्चर्याचा धक्का बसला. ग्रीन सिग्नल मिळाला गाडी सुटली तो पर्यंत राणी रिक्षात बसून गेली सुद्धा. समर त्या रिक्षाचा पाठलाग करू लागला. पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर एका सोसायटीमध्ये ती रिक्षा गेली. सोसायटीत प्रवेश केल्यानंतर आठवे घर राणीचे होते. समर विचार करू लागला. आज पुन्हा तशीच घाई करायला नको थांबूया. योग्य वेळ साधून या वेळेस लग्नाची मागणी घालूया.
" मनू; ए बाळा ! यंदा च्या वर्षी तरी जावयाच सुख कळू दे रे बाळा." शंतनू थकलेल्या जड स्वरात लेकीला म्हणाला.
" बाबा जावई तुमचा सांभाळ करणारा असावा. त्यात माहिती आहे ना तुम्हाला जावयाचे सूख हवे आणि लग्नानंतर अपत्याचे सुख जे माझ्या नशीबी नाही."
हे ऐकताच ५५ वर्षीय शंतनू च्या डोळ्यात टचकन पाणी आले. डोळ्यात तरळणारे अश्रू घेऊन शंतनू तसाच आपल्या खोलीत शांतपणे निघून गेला. मनू सर्व भाज्या निवडून व्यवस्थित ठेवण्यात लागली. शंतनू खोलीचा दरवाजा आतून बंद करतो कपाटात ठेवलेल्या एका वहीतून जुना फोटो काढतो.
" इतकी वर्षे उलटली तरी तुला विसरणे निव्वळ अशक्य !तू सोडून जाताना जे बोलली होतीस ते शब्द आजही अगदी तसेच आठवतात. प्रेम करायचीस ना गं? मग आपल्याच प्रेमाला असं कोण ग्रहण लावतं? या माझ्या निरागस लेकीची काय चूक?"

"बाबा ! दार उघडा." मनू चहा घेऊन दरवाज्याच्या बाहेर दार वाजवत उभी होती. शंतनु तसाच लगबगीने ती डायरी आत ठेवून दिली व चेहरा नीट करून हलकेसे हास्य चेहऱ्यावर आणून दार उघडला. दोघे बापलेक बसून चहा पिऊ लागले आणि सोबतीला गप्पा सुरू होत्या.
---
"आई -बाबा माझं लग्न यावर्षी ठरवाच,आणि हो यावर्षी नाही आत्ता या महिन्यात या आठवड्यात ठरवा" समरचे बोलणे ऐकून त्याचे आई-बाबा आनंदी तर झाले पण, हा असा 'लग्न करणार नाही' दृढ संकल्प केलेला त्यांचा एकुलता एक मुलगा अचानक " आठवड्यात लग्न ठरवा" कसे बरं बोलला असावा? कपाळावर भले मोठे प्रश्नचिन्ह घेऊन समरचे आई बाबा एकमेकांकडे पाहिलं. समर किचनमध्ये जाऊन त्याने आणलेली आईच्या आवडीची भेळ आणि बाबांच्या आवडीची मिठाई एका प्लेटमध्ये वाढून घेऊन आला. समरचे हे असे बदललेले स्वभाव पाहून त्याच्या आई-वडिलांना विश्वास होतं नव्हता. समर हॉलमध्ये येताच त्याच्या आईने समरची दृष्ट काढली.
"आई-बाबा हे आधी तुम्ही खाऊन घ्या.मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे."
"हो हो माहिती आहे तुझा महत्त्वाचा विषय काय ते" म्हणत समरचे बाबा मिठाई समरला भरवली.
"किती ती लाडीगोडी" म्हणत समरची आई समरचे कान खेचले. समर आपल्या आई-वडिलांना असे खुश होताना पाहून खूप आनंदी होता. एकाएकी समर आपल्या आई-बाबां समोर हात जोडून चेहऱ्यावर काहीसे चिंताग्रस्त हावभाव घेऊन बोलू लागला. "आई बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत.मला त्याची जाणीव आहे.मी एक मुलगा म्हणून जर कुठे कमी पडलो असेल तर मला माफ करा. पण आता पुढे जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि अजून एक विनंती मला अपेक्षा आहे तुमचा होकार मिळावा."
समर च्या वडिलांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटले. हळूच ते जवळच बसलेल्या आपल्या पत्नीचे हात आपल्या हातात घेत घट्ट धरला. "बोल समर.. संपूर्ण आयुष्यात तुला इतके हतबल तेही आमच्याच समोर तरी आम्ही कधी पाहिले नाही तुला जर कोणी पसंत असेल तर ती आम्हालाही पसंत असेल. ती मुलगी नक्कीच भाग्यवान आहे जिच्या आयुष्यात तुझ्यासारखा सोबती भेटणार. ज्या मुलीसाठी तू इतकं करत आहेस नक्कीच खूप सुंदर असेल ती"
-------
( राणी सुंदर तर आहेच. त्याहून कुरूप असे तिथे सत्य. काय समर च्या आई-बाबा ना राणीचे सत्य कळल्या स समर ला दिलेला शब्द पाळतील ? )

क्रमशः
लेखिका : अहाना कौसर
[सदर कथेचे कॉपीराइट्स हे कडे आहेत कथा चोरी हा गुन्हा आहे असे आढळल्यास कारवाई केली जाईल ]

🎭 Series Post

View all