Login

डाव नियतीचा भाग : ४

ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे .
डाव नियतीचा भाग : ४
भरल्या डोळ्यांनी समर "हो बाबा ती खूप सुंदर आहे. तिच्यासोबत मी लग्न करणार आहे माझ्या कॉलेजच्या काळापासून मी तिला ओळखतो पण तिच्यावर मी प्रेम करतो याची साधी कल्पनाही तिला नाही. तिच्याच घरी आपल्याला स्थळ घेऊन जायचं आहे. जवळच्याच एका सोसायटीमध्ये ती राहते हे आज मला कळालं.पण आई बाबा ती काही बोलेल त्यांच्याकडून काही कळेल या आधीच सांगतो ती कदाचित कधीच आई होऊ शकणार नाही.आम्ही कॉलेजला असताना बाजूच्याच कॉलेजमध्ये ती शिकायला होती. एका दिवशी तिच्या पोटात खूप जोराच्या कळा आल्या. तेव्हा तिला प्रथमोपचारासाठी आमच्याच कॉलेजमध्ये असलेल्या ओ पी डी मध्ये आणले गेले तिथे कळालं तिला कॅन्सर असण्याची संभाव्यता आहे. यानंतर ती कधीच कॉलेजमध्ये किंवा त्या शहरात दिसली नाही. पण एवढं मात्र नक्की तिला स्वतःचा मूल होणं फार अवघड आहे. मी तिच्यावर मनापासून प्रेम केलं आणि ती मला वडील बनण्याचं सुख जरी देऊ शकत नसली तरी तिचा जीवनसाथी म्हणून तिचा हात माझ्या हातात घेणे हे माझ्यासाठी सौभाग्य आहे."
समर चे बाबा आपला मुलगा एवढा मोठा कधी झाला इतका समंजसपणा त्याच्यात आलेला पाहून समाधान वाटू लागलं. पण आपल्या वाटेला आलेलं घास मुलानेही तेच घ्यावं नियतीच्या या करणी पुढे विस्मित होतात. समर च्या आईचे उर भरून आला.थोडा वेळ शांतता पसरली नंतर आई-बाबा दोघे मिळून समर ला खूप सारा आशीर्वाद दिला.

समरचे बाबा त्या आठवड्या भरात ओळखीच्या एका व्यक्ती ला मध्यस्थी करून राणीच्या घरी निरोप पाठवला.मुलाची कसलीच अपेक्षा नाही हे पाहून मनुचे बाबा बघण्याचा कार्यक्रम ठरवला. घरातून निघण्याआधीच समरने त्याच्या आईवडिलांना विनंती केली होती की "गेला तो भूतकाळ होता त्या भूतकाळाचे व्रण जरी आजतागायत असले तरी पुन्हा त्याच्यावर आता किंवा भविष्यात चर्चा नको." समरचे आई-बाबा तसे खूप समंजस होते म्हणून त्यांनी देखील काहीच न बोलण्याचा शब्द दिला. समरच्या आईची धाक धूक होत होती. मुलाकरिता अभिमान वाटत होता. "प्रेम असही जपतात जपणारे. मी माझ्या मुलाला साथ देईनच राहीला प्रश्न आजी होण्याचा तर एखाद्या अनाथ लेकराची आजी होणे आवडेल मला." असे मनोमनी विचार समरच्या आईचे सुरू झाले होते.
पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावरच असलेले राणीचे घर आले. सर्वजण गाडीतून उतरले. सोसायटीत सफाई कर्मचारी म्हणून असलेले काका त्यांची पत्नी रुक्मिणीला शंतनूने बोलावलं म्हणून घेऊन आले होते. काकानी गेट उघडला. रुक्मिणी काकी ह्या हळदीकुंकू घेऊन दरवाज्यात उभ्या होत्या. औक्षण करून त्यांना घरात बोलवलं. समर आईला पुढे करून लेडीज फर्स्ट म्हणून; समोर उभ्या असलेल्या शंतनुला पाहून समरची आई थबकलीच. शंतनु समरच्या आईला पाहून त्याच्या हातातील मिठाईचे ताट खाली पडलं. रुक्मिणी काकी ते ताट उचलू लागल्या. समरने शंतनूला सोफ्यावर बसून पाणी दिलं. समरचे बाबा त्याच्या आईला सोबत घेऊन आले.
" काय झाले मामा? " समर.
" नाही ते जरा चक्कर आल्यासारखं झालं तर हात पाय गळाले." शंतनू.
" ठिक आहे ! आराम करा.."
मनू तिच्या रूममधे तयार होत असताना तिला आवाज आला म्हणून मनू कपडे घालून होताच पळत खाली आली. समरची आई तिला पाहातच राहली. तसाच मुलगी बघण्याचा कार्यक्रम आटोपून सर्वजण घरी आले.
येथे शंतनू आणि तेथे समरची आई कुसुम दोघांच्या भरलेल्या डोळ्यांत भूतकाळ उभा राहीला होता. शंतनु कुसुमवर प्रेम करत होता. कोणत्यातरी एका ज्योतिषाकडे सहज विचारल्यावर कुसुमला अपत्य सुख नाही हे कळलं. फक्त ज्योतिषाच्या एका वक्तव्यामुळे शंतनूने साखरपुडा मोडला होता. तेव्हा कुसुम शंतनूला म्हणाली, ”उद्या आपल्या पुढच्या पोरांना हेच ताट येऊ नये म्हणजे पावलं. पण आता तर ताट काय समोर आलेलं मुलांनी तोच घास उचलला होता. शंतनू तेव्हा किती विनवण्या करून देखील आपल्या नकारावर ठाम राहिला. कुसुमला तो कॉलेजपासूनच पसंत करत होता फक्त कोणाच्यातरी सांगण्यावरून काहीच कुठल्याच तपासण्या न करता शंतनूने निर्णय घेतला. त्यानंतर कुसुम किंवा शंतनू दोघेही कधीच एकमेकांना भेटत नाहीत कधीच नाही. इतक्या वर्षानंतर भेट झाली तेही अशी. शंतनु विचार करत होता सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आणि कुसुम ला बेचैन होत होतं म्हणून काहीच प्रत्युत्तर न देता "नंतर कळवू" फक्त इतकंच काय ते बोलून गेले. कुसुम ला नेमका त्रास कोणत्या गोष्टीचा झाला हे शंतनु ला ठाऊक होते. पण आता हे स्थळ कुसुम नाकारणार याची भिती वजा खात्री शंतनुला होती. आपण स्वतः साखरपुडा मोडला गावात किती बदनामी झाली तिची तरी तिला आपण नाकारले याचे आज खूप वाईट वाटत होते पश्चाताप होत होता. करणार तरी काय ना? माफी मागायला देखील तोंड नसताना पश्चातापच होणारच ना? आज त्याच कुसुमचा देखणा, सुशिक्षित, सुसंस्कारित मुलगा तिच्या मुलीचा हात आपल्या हातात घ्यायला घरी आला होता.
तिथे कुसुम भूतकाळात घडलेल्या त्या वाईट आठवणीने हुंदके देत बेडच्या कोपऱ्याला पडून होती. केतन ( समर चे बाबा ) हळूच शेजारी येऊन बसत "कुसुम काय झालं ?हो मला तसं माहिती आहेच तुझ्या या हुंदक्याच कारण; पण समरने आपल्यापासून काहीच लपवले नाही आणि राहिला प्रश्न तुझ्या भूतकाळाचा तर सध्या आपल्या वर्तमान किंवा भविष्या मधे त्या भूतकाळाला कोठेच जागा नाही. आता आपण समरच्या येणाऱ्या आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहायची वेळ आहे."
"अहो कळतंय मला हे आणि मान्य आहे हे स्थळ, या ऐवजी जरी दुसरी मुलगी असते तरी मी नकार देणार नव्हतेच" कुसुम उत्तरली.
"एक मिनिट ! या ऐवजी दुसरी असती तरी याचा अर्थ काय? तुझ्या मुलीला ओळखतेस ?" केतन प्रश्नार्थक नजरेने म्हणाला.
"या मुलीला नाही पण माझ्या भूतकाळात जे काही वाईट झालंय कोणीच लग्नासाठी पुढे येत नव्हतं या सर्वाला कारणीभूत तिचा बाप आहे त्याला मी खूप चांगलं ओळखते" कुसूम ने आपली बाजू मांडली.
" काय ?" केतन आश्चर्याने म्हणाला.
कुसुम उठून बसते केतनचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, "प्लीज त्या मुलीचा स्विकार करूया." कुसूम चे डोळे भरून आले व स्वर जड झाले होते.
केतन बायकोचे ऐकणार जरी नसला तरी दुसऱ्या बाजूला त्यांचा मुलगा होता. ज्याला या सर्व गोष्टींची कल्पना नव्हती. तरी समरचा निर्णय योग्य होता. म्हणून दोघे जण शांत राहायचा निर्णय घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मानिनीच्या वडिलांना समर समोरच कॉल करून होकार कळवला. शंतनू त्या दिवशी एकटाच समरच्या घरी गेला व कुसुमशी माफी मागितली. सर्व सोयीस्कर पार पडले होते.
पाच - सहा महिने उलटून गेले तोवर समर - मानिनी मनाने बरेच जवळ आले होते. कधीतरी बाहेरही जायचे फिरायला. मानिनी एका बॅकेत कामाला लागली होती. लग्नाची तारीख ठरवायचा विचार दोघांच्याही पालकांना आला. तारीख ठरवली गेली होती जी अजून ६ महिन्या नंतर ची होती. मात्र नियतीने घातलेल्या घाटाबद्दल सर्व जण अनभिज्ञ होते. याला ही कारण शंतनुची रहस्यमयी सवय.
समर देखील कॅन्सरवर सुरू असलेल्या त्याच्या संशोधनाचे कार्य हे सुरू ठेवत शहरातील एक चांगला कॅन्सर तज्ञ बनला होता. दिल्ली ला तो दोन महिन्याच्या सेमिनार साठी गेला होता.

क्रमशः
लेखिका : अहाना कौसर

🎭 Series Post

View all