Login

डाव नियतीचा भाग : ५ अंतिम

ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे
डाव नियतीचा भाग : ५ अंतिम
---------
समर ला सेमिनार करिता जाऊन पंधरा-वीस दिवस झाले होते. बेंगलोर हून दिल्लीला एक पेशंट आली होती. जिचा खूप रेअर केस होता कारण एकदा कॅन्सरवर मात केलेलं असून सुद्धा ती पेशंट मृत्यूच्या दारावर होती.
समर तज्ञ असल्यामुळे तसेच त्याला अजून बरेच संशोधन करायचे होते. ही केस देखील तो आपल्या वरिष्ठ डॉक्टरांच्या हाताखाली राहून हाताळणार होता. समर ला पेशंट दाखल करण्यात आले असल्याचे कळते. वरिष्ठ डॉक्टर तेथे उपस्थित असतात. समर एकदा पेशंटला पाहण्यासाठी रूम मध्ये जातो. समोर असलेली पेशंट पाहून समरच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिथे त्याच्यासमोर राणी होती. समर घामाघुम झाला होता. रूम मधून बाहेर येताच समर मानिनीला कॉल करतो तिची तब्येत विचारतो. मानिनी नीट बोलते त्याच्यासोबत हे ऐकून समरतीला विचारतो "तुला कधी कॅन्सर झालेलं?"
"नाही" मानिनी उत्तर देते.
सध्या त्याच्यासमोर एक सिरीयस पेशंट होता जास्त काहीच विचार न करता समर त्या पेशंट च्या इलाजा करिता जे शक्य होईल ते प्रयत्न करू लागतो. अथक प्रयत्न करून, जीवन मृत्यूच्या या दोन महिने सुरू असलेल्या संघर्षात शेवटी मृत्यूचा विजय होतो. समर तिचे काही फोटो आपल्याजवळ काढून ठेवतो. पेशंट सोबत तिचे बाबा होते. इलाज सुरू असताना बऱ्याचदा त्या एकट्या बाबाला पाहून समर चौकशी करतो. तेव्हाच कळाले होते की तिची देखील आई नाही. आणि ते बेंगलोरलाच स्थायिक होते फक्त तिथे कॉलेजमधील कोणीतरी एक मुलगा सतत तिची चौकशी करत येत असल्यामुळे राणीच्या वडिलांना त्या मुलाला कोणत्याही प्रकारचा द्यायचा नव्हता त्यांना माहित होत्या एक दिवस त्यांची मुलगी हे जग सोडून जाणार आहे.
दिल्लीतच राणीचे अंत्यक्रियाविधी पार पाडले जातात. समर स्वतःहून पुढाकार घेऊन तिच्या बाबांना विचारतो "कोठे राहणार आता ?"
"मुलगीच गेली माझी आता बघू वृद्धाश्रमाशिवाय माझ्याकडे पर्याय नाही" राणीचे बाबा.
"मला तुम्हाला काही सांगायचे आहे, जो मुलगा तुमच्या मुलीची चौकशी करत यायचा त्याचे नाव समर, जो आज एक कॅन्सर तज्ञ झाला आहे आणि तुमच्यासमोर आहे" समर.
राणीचे बाबा समर कडे पहातच राहतात. "शेवटी प्रेम जिंकलेच म्हणायचं" राणीचे बाबा म्हणतात.
समर त्यांच्याकडे चौकशी करतो तेव्हा कळतं राणी त्यांची सखी मुलगी नव्हती ती त्यांनी दत्तक घेतली होती.तिच्या खऱ्या बाबांचे नाव शंतनू आहे. ज्याने त्याच्या बायकोच्या निधनानंतर दोन जुळ्या मुलीं मधील एक रागिनी मोठी मुलगी याला दिलेली असते. त्या लेकरांची आई तर नव्हतीच त्यात त्या जुळ्या मुली. रागिनीच्या डाव्या पायाला एक पांढरा चट्टा जन्मजात होता. यामुळे शंतनुने ती मुलगी स्वतःपासून लांब केली होती आणि याला सोपवली होती. राणीच्या बाबाला कोणाचाच आधार नव्हता त्यांच्या बायकोने देखील घटस्फोट घेतला होता त्यानंतर पुन्हा त्यांनी लग्न केले नव्हते. शंतनु यांच्या चांगल्या ओळखीतला होता म्हणून त्याची एक मुलगी यांनी स्वखुशीने दत्तक घेतली होती.
समरला मानिनीच्या बाबांवर राग येत होता. मानिनीला या सगळ्यांची जरा देखील कल्पना नव्हती. कारण शंतनुने राणीच्या बाबांशी पुढे आयुष्यभर कोणतेही संपर्क ठेवले नव्हते मुळात तशी अटच त्यांनी घातली होती.
समर आपले सेमिनार संपवून खूप काही मनात साचवून घरी परतत होता. त्याने सोबत राणीच्या बाबांना देखील घेतले होते. दिल्लीच्या एअरपोर्टवर असताना समर ला त्याच्या आई- बाबांचा फोन येतो.
"समर कधी पोहोचशील ? मानिनी च्या बाबांना ॲटॅक आला आहे."
"आता एअरपोर्टवरच आहे अजून दोन तास वेळ आहे फ्लाईट टेक ओव्हर करेल पोहोचतो मी, तुम्ही मानिनीची काळजी घ्या." समर इतकं बोलून फोन ठेवतो.
दोन तासांनी फ्लाईट निघते. एअरपोर्ट वरून सरळ दवाखान्यात जातो सोबत राणीचे बाबा असतात. डॉक्टरांनी परिस्थिती सांभाळलेली असते. शंतनू दुसऱ्या दिवशी थोडं फार बोलू लागतो.
राणीच्या बाबांना पाहतो ओळख पटत नव्हती. तेथे समर शिवाय कोणाला काही कल्पनाच नसते त्यांना तेथे कोणी ओळखतही नसतं.
"मामा हे तुमचे मित्र शरद !" समर ओळख करून देतो.
शंतनुला रडू कोसळते तो विचारतो "माझी मुलगी कुठे आहे ?"
समर थंड श्वास घेतो शरदला गहिवरून येते. शरद हिमतीने पुढे येऊन म्हणतो "ती आता आपल्यात नाही."
" काय ? " शंतनु भरल्या डोळ्यांनी विचारतो.
इतरांना यातलं काहीच कळत नाही काय सुरू आहे ? कोण मुलगी माननीय तर कोणी भाऊ बहीण नव्हतेच. त्यावेळेस समर हे सर्व नंतर बोलूया सध्या पेशंटला आराम करू दे म्हणून वेळ मारून नेतो.
"रागिनी बाळा मला माफ करशील ना ?" असे मनात बोलून शंतनू डोळे मिटतो ते कायमचाच.
-----
आयुष्यातील जणू एका पर्वाला पूर्णविराम लागले होते. येथून नवा पर्व नवा अध्याय सुरू होणार होता.
ठरवलेल्या तारखेहून पुढे अगदी थोड्या लोकांमध्ये समर मानिनी सोबत विवाहबंध होतो. त्याच्या आदल्या रात्री राणी समरच्या स्वप्नात येते "तुला उद्या तुझी खरोखरची राणी कायमस्वरूपी भेटणार तिची काळजी घे, खूप प्रेम कर तिच्यावर, पुढे कधी मुलगी झाली तर तिचं नाव रागिनी ठेव ." इतकं म्हणून रागिनी जणू पुढच्या प्रवासाला निघाली.
समर पहिल्या रात्री मानिनी समोर या गोष्टी मांडतो जेव्हा रागिनी त्याला प्रश्न विचारते बाबा असे का म्हटले असतील "माझी मुलगी ? त्यांचे चेहऱ्यावरील भाव जणू काही त्यांची आपली सखी मुलगी असावी असे का होते?"

सर्व प्रकार ऐकून मानिनी स्तब्ध होते. तिचा विश्वास बसत नव्हता तरी तेच सत्य होते. लग्नकार्य तसेच त्याची लगबग दहा-पंधरा दिवसात संपते. समर देखील मानिनीला खूप प्रेम ,आदर देत होता. आता मानिनीच त्याची राणी होती.
दोघेजण आपल्या आपल्या कामांवर पुन्हा रुजू होतात. एके दिवशी मानिनीला कासावीस होतं, काहीही नको असं वाटू लागतं. समर ला तिने तसे कळवले देखील. समर तिला चेक करतो तर काय आश्चर्यम
मानिनीला दिवस गेले होते. समर बाबा होणार होता.कुसुम केतन दोघेही हे ऐकून खूप खुश होतात. मानिनीची व्यवस्थित काळजी घेतल्या जाते नऊ महिने सरतात.
मानिनीला प्रसुती कळा सुरू होतात. दवाखान्यात नेले जाते अर्धा दिवस वाट पाहण्यात जातो आणि गोंडस कन्यारत्न प्राप्त होते. मानिनी सारखीच अगदी समर तिला हातात उचलून कुशीत घेतो व राणी माझी म्हणतो. सर्वत्र आनंद लहरी पसरतात. पाहता पाहता बारशाचा दिवस येतो शेवटी नामकरण केले जाते आई बाबा उत्साहाने नावाचे पाटी दाखवतात समर म्हणतो माझ्या मुलीचे नाव"रागिनी."


समाप्त
लेखिका अहाना कौसर

🎭 Series Post

View all