Login

डाव नियतीचा भाग : १

ही कथा काल्पनिक आहे.
शीर्षक : डाव नियतीचा भाग१

मानिनी या कथेतील नायिका. एक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली मुलगी जिची आई मानिनीच्या जन्मानंतर दोन वर्षातच कसल्याशा पॉयझनमूळे निधन पावलेली. पत्नीच्या निधनानंतर शंतनूने दुसरे लग्न केले नाही. मानिनी ही एकटीच तिच्या बाबांसोबत वाढली. तिचा सांभाळ करण्यात कोणतीच कमतरता शंतनुने कधी भासू दिले नाही. प्रत्येक गोष्ट तिच्या आवडीनिवडीनुसार होत असे.

समर हा या कथेतील नायक. जो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. समरच्या जन्मावेळी त्याच्या आईची तब्येत फार नाजूक होती यात तिला मुलगा अथवा मुलगी जे काही होईल ते एकच अपत्य होणार हे डॉक्टरांनी आधीच सांगितले होते.खूप सारे जतन करून कसे बसे नऊ महिने गर्भात वाढवल्यानंतर सी सेक्शन द्वारे जन्माला आलेला समर. एकुलता एकच असल्याने समरचे प्रत्येक लाड पुरवले जातं. समरचे कुटुंब हे संयुक्त कुटुंब होते. यामुळे जसे प्रत्येक लाड पुरवले जायचे तसेच संस्कार देखील चांगले होत गेले. घरात सगळे सुशिक्षित असल्याने याचा समरच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडत गेला. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर पदवीचे शिक्षण घेण्याकरिता समर बेंगलोरला गेला. बेंगलोरमध्ये एका चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये समरने प्रवेश घेतला होता. समरचे मोठे काका बेंगलोर येथेच स्थायिक असल्याने समर त्यांच्याच घरी राहायला होता. कॉलेजही घराहून तासाभराच्या अंतरावर होते. समर कधी कधी त्याच्या काकांसोबत कॉलेजला जात असे तर कधी बसने देखील प्रवास करायचा. समर ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्याच्या बाजूलाच अभियांत्रिकी महाविद्यालय होते. यामुळे समरची ओळख शेजारच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत देखील झाली होती. असेच एके दिवशी बसने जात असताना एक मुलगी अभियांत्रिकी कॉलेजच्या गणवेशात बसमध्ये प्रवेश करते. मध्यम उंची,मध्यम कांती, नेव्ही ब्लू फ्रेम चा आयताकृती चष्मा, लेयर कट केलेले लहरी केस, नाजूकशी डायमंड टिकली, पॅन्ट शर्ट आणि वर जॅकेट सोबत एका खांद्यावर घेतलेली सॅग, कंडक्टरला आपला पास दाखवून जागा शोधत होती.
ती मुलगी जागा शोधत असताना समर आपल्या सिटवर तिला बसायला जागा देऊन पटकन स्वतः उभा राहिला. समरच्या मनात तिचा चेहरा घर करून गेला होता. पंधरा मिनीटांनी कॉलेजचा बसस्टॉप आला आणि समर व ती दोघे एकत्र उतरले. समर त्याच्या कॉलेज कॅम्पसमध्ये जाता जाता एक नजर त्या मुली वर टाकली.

आज समर पुन्हा त्या मुलीसोबत एका बसमध्ये जायचे या विचारात घडयाळ्याचा काटा पाहत पाहत दिवस कसाबसा काढला. चार वाजताच समर लवकर जायचे म्हणून कॉलेज मधून लवकर पडला. आजचा संपूर्ण दिवस मित्रांसोबत देखील धड बोलत नव्हता. बसस्थानकावर येऊन उभा राहिली. अर्धा तास उलटला तरी ती अजून आली नव्हती. समर, राहून राहून इथे तिथे नजर फिरवत मधेच फोनमध्ये काही रिल्स पाहात स्क्रोल डाउन करत बसला.

"इंतेहा हो गई इंतजार की आयी ना कुछ खबर मेरे यार की"

अशी रिल स्क्रोल करता करता अचानक समोर आली.समर डोळ मिचकावत तोंडाने 'म्च' करतो.

"अप्सरा आली .." पुन्हा फोन मधे वाजतं गाणं. खरंच अप्सरा आली का काय म्हणून मान वर केली. तर काय? साक्षात प्रकटलेली अप्सरा पाहून समर कोसळायचा राहून गेला.

" दिल के अरमां आँसूओ मे बह गए" हे गाणं फोन मधे नाही वाजलं तरी सर्व स्वप्नांवर त्सुनामी सारखी धावून आली एक फोर व्हिलर. मग काय ? डोळ्यांदेखत सर्रकन आलेल्या गाडीत बसून भर्रकन अप्सरा गुडूप.
अरेच्चा ! हा कोण म्हणायचा मधेच?
समर मनोमन स्वप्न रंगवू लागला. अच्छा ! माझी ही अप्सरा इथलीच असावी बहुतेक. आज कळालं की हे काय हार्मोन्स उड्या मारत नसतात इथे तिथे तर आपल्या अनारकलीला पाहून आपोआप दिल मे गिटार वाजतेच.
समर देखील घरी गेला. घरी असलेल्या समोर त्याचे मन मात्र बसमधील त्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या डोळ्यांत पार खोलवर बुडालेले होते.
दुसऱ्या दिवशी समर कॉलेजला जाताना काकांची परवानगी घेऊन बाईकने कॉलेजला गेला. कॉलेजमध्ये दुपारपर्यंत थांबून तो अभियांत्रिकी विद्यालयाच्या बाहेर थांबला.खूप वेळानंतर पुन्हा ती मुलगी कॉलेज कॅम्पसमध्ये दिसली.समोरचे मित्र होतेच म्हणा तिथे त्यांनाच भेटायचे निमित्त करून समर तिथे गेला. ती मुलगी कोणाशी तरी फोनवर बोलत होती तसेच एकटी होती हे पाहून समर तिच्या जवळ गेला. हात पुढे करून "हॅलो, मी समर" म्हणत स्वतःची ओळख करून त्या मुलीचे नाव विचारलं. ती मुलगी अनोळखी मुलाने पुढे केलेल्या हाताकडे पाहत अजून काही उत्तरणार एवढ्यात समर पलंगावरून खाली पडला; कारण हे फक्त समरचे स्वप्न होते.
बेडवरून पडताच समर जागा झाला व पुन्हा डोळे चोळत आजूबाजूला पाहिलं तर काय तो रूममधे होता. आज मी त्या मुलीचं नाव विचारणारच अशी गाठ बांधून समर कॉलेजला जायला निघाला. जाता जाता त्याला ते स्वप्न आठवत होता. त्याने त्याच्या काकांकडे परवानगी मागितली आणि बाईक घेऊन कॉलेजला गेला. स्वप्नातील पाहिलेले एक दृश्य तर खरोखरं पूर्ण झाले होते.

तुम्हाला काय वाटतं आज तरी समरला तिचं नाव कळेलं का? समर ने पाहिलेले स्वप्न आज खरे होणार का?