जलदलेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय :दुसरी बाजू
शिर्षक : दादांच्या आठवणीत सुनेत्रा भाग - ५(अंतिम)
आता पुन्हा ही नवीन अग्निपरीक्षा आणि नवी जबाबदारी तिची कथा तर निराळीच दादा नव्हे आता मी अजित म्हणेल यावेळी.
अजित कपाळावरच्या कुंकवाची खूण ताजी असतानाच माझ्यासमोर एक अग्निपरीक्षा आली.
आज तुमच्या निधनानंतर तुमच्याच जागी माझी निवड झाली. मी ती स्वीकारली, पण का? तर फक्त तुमची अधुरी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी.
कारण जनता म्हणाली, दादाची स्वप्ने वहिनीच पुरी करणार.पण या सगळ्यात 'मी' कुठे आहे? माझं अस्तित्व, माझ्या भावना आणि माझा शोक कुठे हरवला?
लोक चर्चा करतायत. काही म्हणतात, "वहिनींनी १३ दिवस थांबायला हवे होते, सुतक पाळायला हवे होते," तर काही म्हणतात, "वेळेची गरज ओळखून घेतलेला हा योग्य निर्णय आहे." पण या चर्चा करणाऱ्यांना काय माहीत, माझ्या मनावर कोणता डोंगर कोसळला आहे?
तुमच्या जाण्याचे दुःख उराशी घेऊन, डोळ्यांतील पाणीही नीट वाळले नसताना, दुसऱ्याच दिवशी मला बारामतीची वेस ओलांडावी लागली. मुंबईत जाऊन जबाबदारी स्वीकारावी लागली.
कपाळावरचे कुंकू अजून तसेच ताजे असतानाच , तुमच्या चितेची आग अजून विझली नसताना मला मंत्रालयाची पायरी चढावी लागली. का तर जनतेच्या हितासाठी नवीन जबाबदारी माझ्या अंगावर पडली होती.
दादा माझ्या सासरी किंवा माहेरी, अशा परिस्थितीत कोणत्या स्त्रीच्या नशिबी असा प्रवास आला असेल याचे उत्तर आहे आपल्या कडे ?
आता माझा शेवटचा प्रश्न हा प्रश्न शेवटचा नाही असंख्य प्रश्न आहेत भुंग्यासारखे. मनात भुणभुण करत आहेत. तरीही शेवटचा म्हणेल.
हे पद, हा मान, हे अधिकार... हे सर्व तुमच्या विरहाच्या दुःखापेक्षा मोठे कसे असू शकतात? हा प्रवास माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे.
एकीकडे तुमची आठवण आणि दुसरीकडे ही मोठी जबाबदारी. मनाची नुसती घालमेल होतेय. तुमची स्वप्ने पूर्ण करायची की स्वतःच्या दुःखात हरवून जायचे? आज या प्रश्नांची उत्तरे कोणाकडे मागायची?
तुमच्या नावाने ओळखली गेले, तुमच्या कामात सावली बनून राहिले आणि आज तुमच्याच स्वप्नांसाठी स्वतःच्या भावनांना मूठमाती देऊन खुर्चीवर बसले.
पण यातली 'मी' कुठे आहे? हा प्रश्न मला कायम सतावत राहील. तुमच्या स्मृतींना आणि या अधुऱ्या प्रवासाला माझे हे शेवटचे शब्द!
हे पद, हा मान, हे अधिकार... हे सर्व तुमच्या विरहाच्या दुःखापेक्षा मोठे असू शकतात का? हा प्रवास माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. एकीकडे तुमची आठवण आणि दुसरीकडे ही मोठी जबाबदारी. मनाची नुसती घालमेल होतेय.
हे परमेश्वरा, तू माझे कुंकू हिरावून नेलेस आणि माझ्यावर जबाबदारीचे ओझे टाकलेस. हे तुझे अकालनीय संचित मला मान्य नाही. या प्रवासात मी अडखळले किंवा पडले, तर हाक कोणाला मारू? याचे उत्तर कोणाकडे शोधू?
शेवटी काय बोलणार.. शब्द तर केवळ कागदावर उतरवण्यासाठी असतात, डोळ्यांतील आसवे हीच माझ्या भावनांची पोचपावती आहे.
"दैवजात दु:खं भरता दोष ना कुणाचा,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!"
तुमचीच या जन्मी आणि पुढील साताजन्माच्या वाटचालीसाठी तुमच्या सोबत चालणारी तुमचीच फक्त तुमचीच
"सुनेत्रा"
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा