सासुबाईचे दागिने
भाग 2
सासरी घरची परिस्थिती ह्या दोन मुलांमुळे चांगली झाली होती.. सासू सासऱ्यांना गरिबी माहीत होती , कसे दिवस काढले हे त्यांचे त्यांना माहीत होते..पण सुनांना कधी त्यांनी पैसे मागितले नव्हते...सुना करतील ही ,पैसे देतील ही पण आपण का त्यांच्या पुढे उगाच लाचार व्हायचं...म्हणून ते गरज पडल्यावर मुलांकडे पैसे मागत होते.
त्यात ही एकदा प्रीती नवऱ्याला म्हणाली , "आई बाबांना पैसे मागायची वेळच कश्याला येऊ द्यायची मी म्हणते...तुम्ही दोघे स्वतः महिनाच्या महिन्याला त्यांच्या हातात ठराविक रक्कम देत जा...हे म्हणजे पुन्हा गरिबीचे दिवस आठवल्या सारखे ..."
मोठी सून प्रीती समजदार म्हणून कधी कधी नवऱ्याकडे पैसे जरी मागितले तरी ती ते पैसे त्याच्या बहिणीला देत ,कधी त्यांच्या चुलत बहिणीला देत ,तर कधी त्यांच्या गरीब मामाला देत..पण मदत म्हणून दिली की त्यांना वाईट वाटेल.. तर ती त्यांना खाऊ घ्या ह्याचा तुम्हाला.. जसे तुम्ही आमच्या मुलांना देतात ना तसेच..."
त्यांना ही आवडायचे तिने अशी छोटी पैश्याची मदत केलेली..कोणी तरी काळजी घेत आहे हो ह्या वयात..गरिबी तेव्हा ही होती आणि आता पैसा असून ही लेका सुना कडे हात पसरावे लागतात हे खूप वाईट..
"ठरलं तर मग महिन्याचे पैसे तिला दिले जाणार, न विसरता.." गोविंद ने कबूल केले
तर प्रिया अगदी प्रॅक्टिकल ,तिला नाही समजायच्या ह्या भावनिक बाबी..तिला नाही समजायचे कोणाचे मन जिंकायचे असते.. कोणाला बरे वाटते आपण जर त्यांची जाणीवपूर्वक वेगळी मदत केली तर..ती म्हणायची लोक आपली जबाबदारी नाहीत.. मग आपण का म्हणून त्यांना नसती सवय लावायची.. तुम्ही ना प्रीती ताई नातेवाईकांना लाडाऊन ठेवू नका.. कारण तुम्ही हे करून त्यांच्या नजरेत चांगल्या होऊन रहातात ,मी मात्र वाईट..
दोघी जावा आणि त्यात हेवा दावा.. सासूचा कल कोणाकडे बर हवा सांगा
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा