सासूबाईंचे दागिने
भाग 3
भाग 3
सासूबाईने निर्णय घेतला ,आणि दोघांना दोन घर देऊन मोकळ्या झाल्या होत्या ,पण दागिने मात्र अजून ही वाटले नव्हते.ते वाटून द्याचे नाही पण कोणा एकीला देऊन आपली पुढील जबाबदारी सोपवायची.
आज सासूबाई दोघींची परीक्षा घेणार होत्या असे वाटत होते..त्यांना उरलेल्या सोन्याची दोघी सुनांमध्ये वाटणी करायची होती.. त्यांचा त्यांच्या छोट्या मुला मध्ये खूप जीव होता ,म्हणून त्यांचा कल जास्त छोट्या सुनेकडे होता... पण छोटी सून त्यांच्या कडे कधी अशी कलली नव्हती... तिच्या मनात तर सतत आता हेच येत होते... ह्या घरातून लवकरात लवकर आपणच बाहेर पडावे...म्हणजे सासूची म्हतारपणातील सेवा आणि उठाठेव आपल्याला करावी लागणार नाही..
"मी आज का बोलावले आहे तुम्हाला माहित नसेल ही ,पण माझे काही दागिने आहेत जे मला तुम्हाला दोघींना द्यायचे आहेत...तर मी ते देऊन माझी जबाबदारी संपवते आणि त्या बदल्यात तुमची जबाबदारी वाढवते...!"
"दोघी ही चांगल्या कमावतो आम्ही आई तर तुमची ही जबाबदारी तुम्ही ताईला द्या.. त्या सांभाळतील तुमचे हे दागिने आम्हाला गरज नाही त्यांची...उलट आमचेच खूप आहे.. तेच कधी घालणे होत नाही..त्यात हे कधी घालणार आम्ही..."
प्रीती त्यांना नको नको म्हणत ती दागिन्यांची जबाबदारी टाळत होती.
प्रीती त्यांना नको नको म्हणत ती दागिन्यांची जबाबदारी टाळत होती.
सासूबाईने प्रीतीचे ही म्हणणे ऐकले होते... त्यांना ही हेच पाहिजे होते आणि त्यांना हे दागिने छोट्या सुनेला द्यायचे होते ,कारण छोट्या मुलावर जीव होता..त्यांनी मुलीला विचारून ठरवले होते..की जिला ह्या दागिन्यांची हाव निर्माण होईल तिलाच मी माझ्या म्हतारपणाची जबाबदारी सोपवून देईल..पण देव करो ही हाव मोठीला निर्माण ना होवो..छोटीला झाली तर देव पावला..
"प्रिया चल तू ये पुढे आणि बघ हे दागिने कसे वाटत तुला ,आणि तुला हवे ते ते दागिने घे आणि मला बाबा जबाबदारीतून मुक्त कर हो...हा हार पाच तोळ्याच्या आहे ,कुंदन आहेत त्यात जडलेले..ह्या बांगड्या जवळपास सहा तोळ्याच्या आहेत ,ही नाथ ,ह्या बिचुड्या...सोन्याचे कडे...ही ठुशी बघ...आणि तुला जे हवे ते ते घे...."
इकडे प्रिया सोन्याची हाव नसलेली तिला हे सोने बघून हाव सुटली होती ,तिला वाटले हे सगळे आपले आहे आता ,मग आपण आलेली संधी का गमवायची.. आपल्याला मुलगी आहे ,तिला हे कामी येईल...माझे आहेच त्यात ही भर...जुने आहेत ,मस्त भरीव आहेत..कोणालाही नजरेत भरतील असे...
"आई पण मी कशी घेऊ हे सगळे एकटी ,मला हाव नाही सोन्याची हो..! "
"नाही नाही हे तुझेच आहेत आता सगळे ,तूच घे मला लवकर मुक्त कर ,किती सांभाळून ठेवू...मी मेले तर ते वाटून दिले नाही वेळीच म्हणून आत्मा भटकत राहील गो...तर आज दिवस ही चांगला आहे...प्रितीने ही नको म्हणायला नको होते पण असू दे तिला नकोत तर तू घे.." सासू खुद्द हावरट होत्या त्यांना मन होत नव्हते आपले दागिने द्यायचे पण कधी ना कधी स्वार्थ बाजूला ठेवण भाग होते.. मुलगी म्हणत होती मला नकोत तुझे दागिने तू सुनांना दे...जी हे घेईल तिच्या कडे तू शेवटच्या दिवसात रहा..तुझी संपून सेवा करण्याचे तिच्या कडून वचन घे ,आणि मग तिचा पदर सोडू नकोस.. मी घेतले असते पण परत मला दागिने दिले आहेत तर मग आईला तूच सांभाळ हे म्हणतील दोघे ही जण..त्यात आधीच माझ्या हावरट पणा मुळे माझ्या सासूने मला घर आणि दागिने देऊन फसवले आहे.. आणि बाकीचे विदेशात निघून गेले आहेत मस्त मजा करत आहेत...जबाबदारी मी निभावात आहे... म्हणून तू ही हीच शक्कल लढव..
सासूबाई छोट्या सुनेला खूप लाडिगोड लावत होत्या ,तिलाच जणू हे द्यायचे ठरवले असावे असे आता प्रीतीला वाटत होते ,हा काय डाव आहे ह्यांना काही कळत नव्हते तिला... पण ह्याबाबत प्रियाला काहीच माहीत नाही ,असे होऊ शकते का ??? जर प्रियालाच द्यायचे ठरवून बसल्या होत्या तर मला का बोलावले ते काय फक्त तोंड देखले पणा करायला होते का?? मी त्यांची कोणीच नाही जणू असें म्हणून असे वागतात की काय... माहीत आहे मी त्यांच्या लेखी अति हुशार ,व्यवहारी आहे ,मला काहीच अक्कल नाही..मला माझ्या चांगुलपणाने त्यांना जिंकता आलेच नाही..सगळ्यांना मी ह्याच स्वभावांमुळे जिंकले पण हा गड राहिला जिंकायचा...आणि आता तो शक्य नाही..
"आई मी जरा झाडांना पाणी घालून येते ,तुमचे चालू द्या ..प्रिया घे हवे ते ते ,लकी आहेस बघ तू..तुला सासूचा खजिना मिळणार आहे... जबाबदारी ही येणार आहे त्यासोबत..."
मोठीला आज पुन्हा सासूची कमाल वाटली, आपली कदर त्यांनी कधीच नाही केली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा