Login

सासुबाईचे दागिने भाग 4

Dagine
सासूबाईंचे दागिने
भाग 4

आई मी जरा झाडांना पाणी घालून येते ,तुमचे चालू द्या ..प्रिया घे हवे ते ते ,लकी आहेस बघ तू..तुला सासूचा खजिना मिळणार आहे... जबाबदारी ही येणार आहे त्यासोबत..."

मोठीला आज पुन्हा सासूची कमाल वाटली, आपली कदर त्यांनी कधीच नाही केली.


प्रिया तिच्या मोठ्या जावे कडे बघतच राहिली ,तिला ही मध्येच खटकले आईने ताईला ना म्हणा एखादा दागिना घेण्याचा आग्रह तरी करायला हवा होता ,त्यांना ही वाटत असावे ,मी नाही म्हणाले तरी जर सासूबाईने आग्रह केला असता तर मी घेतला असता एखादा दागिना..छोटा का असेना..माझा ही हक्क आहेच ना त्यांच्या वर...ताईला नाही पटले आईचे वागणे...पण मी का इतका विचार करते.. मी आधी मोठे मोठे दागिने घेते आणि मग मोठेपणा मिळवून आईना म्हणते ,हे छोटे छोटे दागिने तुम्ही मला न देता ताईंना द्या..मला तशी ही हाव नाही..माझे मन तृप्त झाले बाकी छोटी छोटी जबाबदारी त्यांना सोपवून द्या आई...आणि व्हा जबाबदारीतून मोकळ्या..

"आई मी घेते हे मोठे मोठे दागिने हो ,तुमचा खूप आग्रह आहेच तो मी मोडू शकत नाही पण मला एक सांगायचे आहे..ते तुम्हाला ऐकावेच लागेल...तुम्ही इतके ऐकाल ना माझे...काय मोठी जबाबदारी मी उचलते पण निदान छोटी छोटी जबाबदारी तुम्ही ताईला द्यावी...तितकाच माझा भार हलका होईल इतकेच..."

सासूबाईला ही आज कुठे छोट्या सुनेचे बोलणे पटले होते ,पण त्यांच्या डोक्यात एक शिजत होते ते म्हणजे माझी म्हतारपणातील जबाबदारी ती ही आजच सोपवते हिच्यावर कारण हिने सगळ्यात मोठा वाटा उचलला आहे माझ्या किमती दागिन्यांचा तर माझी जबाबदारी आता हिची...त्यांनी एक बॉण्ड पेपर आणला होता करून ,त्यावर ही तसेच लिहिलं होतं की जी माझे सगळ्यात जास्त दागिने घेईल स्वखुशीने तिला माझी इथून पुढे सगळीच जबाबदारी घ्यावी लागणार..आणि त्यावर जी सून हे दागिने घेईल तिची सही असणार..

सासूबाईने तिच्या आनंदात आता एक काम करायचे ठरवले होतेच ,तर त्यांनी तिच्या समोर हा कागद ठेवला होता आणि तिला हे वाचून ही दाखवले होते... त्यात असे होते की मी सासूबाईंची सर्व जबाबदारी स्वखुशीने घेणार आहे...तिने ही ते वाचून घेतले होते आणि तिने त्या आनंदाच्या भरात बॉण्ड पेपर वर सही केली होती..

सासूबाईने आता तिला सांगितले हे दागिने तुझे ,ही माझी जबाबदारी आज पासून तू घेतली आहेस असे तू लिहून दिले आहेस..हा तो बॉण्ड पेपर..आणि हे छोटे छोटे दागिने हे प्रीतीचे ,म्हणजे माझी जी काही छोटीत छोटी जबाबदारी असेल ,ती ती घेईल पण जर तिने हे दागिने नाहीच घेतले तर मग ही जबाबदारी तुझीच असणार आहे.. हयात आता तू ठरवले तरी काहीच बदल होणार नाहीत.. माझ्या पुढील आयुष्याची तुला काळजी घ्यावी लागेल ,तू घेणार आहेस अशी तूच मान्य केले आहे..

हे ऐकतात आता प्रियाच्या चेहऱ्यावर असलेला आनंद क्षणात गायब झाला होता ,आणि सगळे मोठे मोठे दागिने तिच्या हातातून खाली पडले होते.. आपण हे काय करून बसलो आहोत..ही कसली जबाबदारी घेऊन बसलो आहोत..ह्याची किती मोठी शिक्षा सासूबाईने दिली आपल्याला.. मी सोने सांभाळण्याची जबाबदारी समजत होते ,आणि ह्यांनी माझी जबाबदारी समजून त्यावर सह्या घेतल्या.. म्हणजे ताई सुटल्या ह्या जबाबदारीतून आणि ती माझ्यावर येऊन पडली..

हाव हाव पणा नडला, आता तर कायद्याने तिला ह्यातुन सुटका नव्हती... सासू हुशार निघाली आणि तिने लेखी घेतले..

🎭 Series Post

View all