सासुबाईचे दागिने
भाग 7
प्रिया आता समजून गेली ,प्रीतीवर जर ही जबाबदारी ढकलून द्यायची असेल तर आता गोडीगोडित तिला हाताळावे लागणार आहे..तशी तर मीच चूक करून बसले आहे..मीच हावरट झाले होते ते दागिने बघून पण आता अद्दल घडली आहेच तर सरळ जबाबदारी आपण मिळुन वाटून घेऊ म्हणून प्रकरण शांततेने घेऊ...तसे दागिने ही मिळतील आणि सासूबाईंच्या जबाबदारीतून हात झटकून घेऊ..
"नाही ताई तसे नाही ,मी खूप रागात रागात बोलून गेले हो तुम्हाला पण झालेच तसे काही घरात.."जवळ येत म्हणाली
"काय ना मी खूप सरळ स्वभावाची आहे म्हणून छान सोयी नुसार फायदा घेतात ,तू ही घे..हरकत नाही.." प्रीती लगेच तिला दूर करत म्हणाली
इकडे प्रीती सासूबाई कडे बघत होती ,त्या ही त्रासलेल्या दिसत होत्या... तर तिच्या लक्षात जरा जरा येत होते नेमके काय झाले असेल ,पण तरी मुख्य गोष्ट प्रियाने सांगितलीच नव्हती
"सासूबाई मला सर्व दागिने देऊन जबाबदारी माझ्यावर सोपवत आहेत ताई.."
"कसली जबाबदारी अशी ग मोठी?"
"दागिने ही घे आणि मला ही सांभाळ इथून पुढे.."
"हा तरीच तुझी इतकी आग पखड का चालू आहे हे कळलंय.."
प्रिया चहा ठेवत म्हणाली ,"अद्रक टाकू का तुमच्यासाठी चहात..?"
"राहू तो चहा ,नकोय मला काही.."
"ताई पण आता कशी निभावणार ही नसती जबाबदारी तुम्हीच सांगा, त्यात त्यांनी बॉण्ड ही लिहून घेतला आहे ह्या स्मार्ट सासूबाईने ,काय काही सुचते त्यांना.?"
शांत झालेल्या प्रियाला ,प्रीतीचे मन स्वतःवर झालेल्या अन्यायाकडे वळवायचे होते..
प्रीती आता कोणाचे ही ऐकून आणि समजून घेण्याच्या स्थतीत नव्हती.. झाला तो अपमान पुरेसा होता..
सासू आणि प्रिया यांनी परस्पर जे काही केले त्यात तिचा सहभाग नव्हता..पण हे अति झाले..सोने घेऊन बॉण्ड लिहून घेणे..म्हणजे पूर्णपणे आपला जबाबदारी ज्याला देत आहोत त्याच्या वर विश्वास नसल्या सारखे झाले..
नाहीच असावा प्रियावर कोणाचा ही विश्वास ,ती तशी विश्वास ठेवून घ्यावी अशी नाही..त्यात खुद्द सासूबाईने हे करावे म्हणजे विचार करून केलेला निर्णय असावा..
प्रिया आता जास्तच पुढे पुढे करत होती मोठ्या जावेच्या..तीच वाचवू शकणार होती ह्या बॉण्ड च्या विळख्यातून तिला..
"बघा मला ह्यावेळी ही जबाबदारी वाटून घ्यायला तुमची साथ द्या..सगळे मोठ्या जावा जश्या सांभाळून घेतात छोट्या जावेला अगदी तसेच सांभाळून घ्या...काहीच दिवसांचा प्रश्न आहे.."
"म्हणजे काय म्हणायचे आहे तुला ??"
"आम्ही ह्यांच्या कंपनीच्या मार्फत विदेशात जाणार आहोत...मग हे घर तुमचे..आणि जबाबदारी ही मग साहजिक तुमच्यावरच येणार...आईला तर आपला देश सोडवणार नाही..मग त्या कश्या येतील आमच्या मागे..त्यांना इथेच रहावे लागणार.."
प्रीती समजून चुकली की हे ह्या जबाबदारीतून काढता पाय घेत आहेत..आणि मग सगळे भार आमच्या खांद्यावर टाकून मोकळे..
"मी एकटी नाही ठरवणार हे..तुला तर माहीत आहे सासूबाई मला तुझ्यापेक्षा कमीच प्रेम करतात..तर त्यांना ठरवू दे..!"
आता पुन्हा प्रितीने हात झटकले ,आता तर सासूबाई ही ऐकणार नाहीत..त्या आमच्या मागे ही येतील...तेव्हा मात्र भारत सोडून द्यायला ही तयार होतील..आणि आपला नवरा तो ही तसलाच..
"मी कोणती ही नसली जबाबदारी घेणार नाही..त्यात सासूबाई तर नाहीच माझी जबाबदारी.." प्रिया अडवून म्हणाली
प्रीती आता तितकीच अडून बघणार होती.. आता समजदार असलेली प्रीतीच काय मार्ग काढेल बघू..
क्रमशः