मागच्या भागात आपण पाहिले की, रजनी आईने लिहलेली चिठ्ठी वाचून ताबडतोब वैभवला भेटायला निघून जाते. वैभवची केस तिला एकटीने सोडवणे कठीण होते. ती ज्ञानवला देखील बोलवून घेते. आता पाहुया पुढे,
" नमस्कार, तू जसा रजनीचा मित्र आहेस. तसा माझा देखील मित्र बनशील का? आपण थोडावेळ एकत्र गप्पा मारूयात."
" चालेल ना."
" मला सांग तुला ऐतिहासिक गोष्टी वाचायला खूप आवडतात ना."
" हो. मी आणि रजनी लहानपणी खूप चर्चा करायचो यावर."
" आपण देखील अशीच चर्चा करणार आहोत."
चर्चा करत असताना वैभवच्या मानसिकतेतील गडबड उलगडताना वेगळे वळण मिळाले होते.
" माझ्या बालपणी जी घटना घडली त्याचा अर्थ मला फारसा लावता येत नाही.पण तुम्ही मला यातून नक्की बाहेर काढाल. पण ती गोष्ट मी सांगू शकेल का? "
" हो. नि: संकोचपणे सांग मला. माझ्यापरीने मी पूर्ण प्रयत्न करेल. यातून बाहेर पडण्याचा."
" आपण एक ध्यानधारणा करुयात. आणि मी सांगेल तसे तू करत जा."
" हो."
ज्ञानव ध्यानधारणा करत असताना स्वत:च्या अवचेतन मनात प्रवेश केला होता. वैभव प्रमाणे तो देखील अवचेतन मनात प्रवेश करतो. त्याला देखील एक अत्यंत दडलेली घटना दृष्टिस पडते. बालपणी ज्ञानवचा मोठा भाऊ एका अपघातात मृत्यू पावलेला होता. ही ज्ञानवच्या गडबडीची मुख्य कारण बनली होती. कारण त्या अपघातानंतर भावाची स्मृती त्याने बंद केली होती. पण आज पुन्हा ती गडबड त्याला अस्वस्थ करत होती. ती वैभवच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरता.
वैभव देखील अतीताच्या गडबडलेल्या स्मृतीमधे अडकला होता. एका अपघातात त्याचा मित्र मृत्यू पावला होता. आणि त्या घटनेच्या प्रत्येक चरणात एक मानसिक ताण सतत त्याला अपराधी पणाची भावना करुन देत होता. त्याचा मृत्यूला वैभव स्वत: जबाबदार आहे असेच त्याला वाटत होते.
वैभवच्या मनाचा शोध घेताना ज्ञानवला स्वत:च्या मनात डोकावताना वैभव ज्या घटनेतून जात आहे ती आपलीच छाया त्याला वाटत होती.
" वैभव ध्यानावर ये. आज आपण इथे थांबूया. दोन-तीन दिवस माझे थोडे काम आहे. ते करुन मी पुन्हा इकडे आल्यावर आपण परत हि ध्यानधारणा करुया."
" छान वाटतय मला. हलके वाटायला लागले आता."
" काय चालले दोघांचे. फक्त तुम्हीच गप्पा मारा. मी पण तुमचीच मैत्रिण आहे. विसरले का मला."
" कस विसरणार तुला?"
" मी थोडे दिवस जावून येतो. नंतर पाहूया मी आलो की वैभवचे."
" हॅलो. तू काय जादू केली रे. वैभव आता पूर्वीसारखा वागायला लागला थोडा थोडा."
" होईल सुधारणा त्याच्यामधे नको काळजी करुस."
" तू ठिक आहेस ना."
" मला काय झालय. मी अगदी मजेत आहे."
काही दिवसांनी ज्ञानव वैभव कडे परत आला होता. उर्वरीत उपचार पूर्ण करुनच रजनी आणि तो जाणार होते.
" आपण आज ध्यानधारणेमधे आपल्या मनाच्या भूतकाळातल्या घटनांमधे जाणार आहोत."
" हो. मी गेलो आहे भूतकाळात."
" आपल्याला जे काही समोर दिसत आहे. ती घटना आपल्याला आत्मसात करायची आहे. ती खरी मानून आपल्याला ते सत्य समजून घ्यायचे आहे."
" बरोबर आहे. पण जर त्याला मी जबाबदार असेल तर. "
" खरच तू त्या घटनेशी किती जवळ होतास. दिसणारी दृश्ये तुला देखील न समजण्याच्या अंतरावर असतील. त्यातच जर हि घटना घडली असेल तर तुझा यात काय दोष."
" बरोबर आहे. मी तेव्हा तिथे होतो खरा. पण तो वेग थांबवणे माझ्या हातात नव्हते."
पूर्ववत आल्यावर वैभव पूर्णपणे यावर मात करुन बरा झाला होता.
" ज्ञानव, तुझ्यामुळे आज पूर्वीसारख आयुष्य जगत आहे मी. मनाला शांतता लाभली आहे."
" आपण जे काही भूतकाळात घडलेल स्विकारत नाही ते आपल्याला पुढे जावून देत नाही. आपल्याला त्या गडबडलेल्या मनाला समजावून त्यावर काम करावे लागते. तेव्हाच आपली मानसिक शांती पुन्हा मिळू शकते."
" ज्ञानव, तू तिकडे जावून लगेच आलास. कोणती केस अर्जंट आली होती का तिकडे."
" नाही ग. आपल मिशन यशस्वी करण्या करता मला माझ्या वडिलांनी दिलेली डायरी उपयोगी पडली. त्यात त्यांनी गडबडलेल्या मनावर विजय कसा प्राप्त करायचा याच्या नोटस लिहून ठेवल्या होत्या. ते मला वैभवची केस सोडवताना लक्षात येताच मी तिकडे जावून त्या डायरीचा शोध घ्यायचे ठरवले."
" डायरी मला पण देशील वाचायला."
" नक्कीच. मला आणखी थोड तुझ्याशी बोलयच आहे."
" मी वैभवची केस सोडवताना स्वत:च्याच भूतकाळात गेलो होतो. मी आणि वैभव एकाच सापळ्यात अडकाव असे झाले होते."
" अरे बापरे!! मला सांगायचं ना मग. मी काही मदत केली असती."
"इतक्यात मला वडिलांनी लिहलेली डायरीची आठवण झाली. आणि ताबडतोब मी तिकडे जावून आधी माझा भूतकाळावर विजय मिळवतो येतो का ते पाहिले. आणि ते यशस्वी झाल्यावर. वैभव वर करायचे ठरवले."
" आज तुझ्या बाबांनी लिहलेल्या डायरीमुळे वैभवला आपण सहिसलामत वाचवू शकलो. त्यांचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत."
" सगळ्यात आधी माझे आभार मान."
" का? "
" मी तुझा आधी मित्र झालो. नंतर माझे बाबा यांच्याशी तुझी ओळख झाली. पुढे आपण मग वैभवला पूर्ववत स्थितीत आणू शकलो."
" कितीतरी लोकांना आपण वाचवतो. मग माझ्या मित्राला अस झुरताना नाही पाहू शकत मी. म्हणून मी इथे येण्याचा निर्णय घेतला होता. मला ठावूक होते. तू माझी साथ नक्की देशील."
" आता एकमेकांची साथ आयुष्यभरासाठी द्या."
" आई-बाबा काय बोलताय तुम्ही."
" ज्ञानवचे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ काय मत आहे यावर."
" मी देखील लग्नाला तयार आहे."
" तुमच्या नविन घराच इंटेरीअर डिझाइन मीच करणार बर का."हसत हसत वैभव बोलत होता.
समाप्त:
रहस्य कथा
अष्टपैलू लेखक कथा
रहस्य कथा
अष्टपैलू लेखक कथा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा