चौथा महिना सुरू असताना नेहाने सासूबाईंना काजू बदामचे लाडू करतांना पाहिलं आणि डोहाळे लागलेल्या तिने पटकन एक लाडू हातात घेतला,
"अगं अगं... माझ्या लेकीला द्यायचेत, त्यांच्या ऑफिसची ट्रिप जातेय म्हणून..."
नेहाने डोळ्यात पाणी आणतच लाडू खाली ठेवला,
"घे एक..उचल.."
सासूबाईंनी लाडू घेण्याची परवानगी दिली खरी पण आता मात्र नेहाला ईच्छाच उरली नव्हती. ती तशीच तिथून निघून गेली. सासूबाईंनी तिला परत आग्रह करायचे कष्टही घेतले नाहीत.
नेहाला तिच्या लग्नाआधीचा प्रसंग आठवला, लग्न ठरवलेल्या मध्यस्तीने सासूबाईंचं विशेष कौतुक केलं होतं,
"तुझ्या सासूबाई म्हणजे अगदी मायाळू, आपल्या लोकांना खूप जीव लावतात."
जवळपास ओळखीतली प्रत्येक व्यक्ती हेच सांगत होती. पण जसजसा नेहाला अनुभव येत गेला तसतसं सासूबाईंचं खरं रूप तिला दिसू लागलं होतं.
घरात भांडी घासायला एक बाई लावली होती, तिची सून पोटूशी आहे असं समजताच सासूबाईंनी तिच्यासाठी चार चार पदार्थ करून दिले होते, वर तिला सुट्ट्याही दिल्या.
"सुनेची काळजी घे बाई, हे तिला खायला घाल..आणि गरज लागली तर सुट्टी घे, मी काही म्हणणार नाही"
याच काळात नेहालाही नुकतीच बाळाची चाहूल लागली होती, भांडेवलीला सुट्ट्या देऊन सासूबाई तिची कामं नेहाला करायला लावत. तिथेच नेहाला खात्री पटली की सासूबाईंचं दाखवायचं तोंड वेगळं आणि खायचं तोंड वेगळं आहे ते. बाहेरच्या लोकांसमोर मी किती दयाळू आहे, मायाळू आहे असं दाखवत फिरायचं आणि घरात स्वतःच्या सुनेला मात्र मोलकरीणपेक्षा वाईट वागणूक द्यायची.
लेकीच्या सासरसाठी घरात सगळं बनायचं, पण त्यातली एकही गोष्ट नेहाच्या वाटेला यायची नाही. नेहाने काही बनवलं आणि सासूबाईंच्या पुढ्यात केलं की "तूच खा..." असं तुसडेपणाने म्हणायच्या.
एक दिवशी नेहाच्या पोटात अचानक दुखू लागलं. घरात फक्त ती आणि सासूबाई होत्या...
नेहाने सासूबाईंना सांगितलं,
"आई, पोटात दुखतंय.."
सासूबाईंचे जराही हावभाव बदलले नाही.
"हो का.."
एवढं बोलून त्या शांत बसल्या. शेवटी नेहाने नवऱ्याला फोन करून घरी बोलावून घेतलं आणि संध्याकाळी दोघेही दवाखान्यात जायला निघाले, स्वयंपाकाची वेळ होती.
"किती वाजता येणार? स्वयंपाक करायच्या वेळी घरी असणार ना?"
इथे माझ्या पोटात दुखतंय आणि सासूबाईंना स्वयंपाकाचं पडलं आहे, नेहाला जाम राग आला. मुलगाही रागाने म्हणाला,
क्रमशः
क्रमशः
****
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा