राजस्थानी पद्धतीची दाल बाटी सर्वांना खायला आवडते. करायला पण सोपी अशी पद्धत सांगते,
बाटी बनवण्यासाठी साहित्य
चार वाटी कणीक
अर्धा वाटी बारीक रवा
चवी नुसार मीठ
अर्धा चमचा ओवा
अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धी वाटी तूप किंवा तेल
चार वाटी कणीक
अर्धा वाटी बारीक रवा
चवी नुसार मीठ
अर्धा चमचा ओवा
अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धी वाटी तूप किंवा तेल
कृती
परातीत सर्व साहित्य एकत्र करा. तेल किंवा तूपमोहन म्हणून थंड वापरा. रुम टेंम्परेचर असलेल उत्तम. ओवा तळहातावर चुरडून घ्या.मोहन सर्व कणकेला चोळून घ्या. पिठाचा गोळा होईल इतपत मोहन घाला. गरजे नुसार पाणी वापरा. घट्टसर कणीक मळून घ्या. अर्धा तास भिजत ठेवा.

दाल बनवण्यासाठी
मूग डाळ पाव वाटी
तूर डाळ अर्धी वाटी
दहा लसूण पाकळ्या
एक हिरवी मिरची
एक सुकी लाल मिरची
अर्धा चमचा तिखट
पाव चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
एक कांदा
एक छोटा टोमॅटो
पाच लवंग
एक वेलदोडा
हळद
हिंग
जिरे
तेल
मूग डाळ पाव वाटी
तूर डाळ अर्धी वाटी
दहा लसूण पाकळ्या
एक हिरवी मिरची
एक सुकी लाल मिरची
अर्धा चमचा तिखट
पाव चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
एक कांदा
एक छोटा टोमॅटो
पाच लवंग
एक वेलदोडा
हळद
हिंग
जिरे
तेल
मूग डाळ आणि तुर डाळ हळद हिंग आणि किंचित तेल घालून कुकरला शिजवून घ्या. फोडणीसाठी कढई मध्ये तेल गरम करा. थोड जीर हळद हिंग लवंग वेलची घालून चुरचुरीत फोडणी करा. मिरची आणि लसूण ठेचून घ्या.तांबूस रंगावर परतून घ्या.त्यात कांदा आणि टोमॅटो परतून घ्या. सुकी लाल मिरची घाला. चवीनुसार तिखट घाला. काश्मिरी लाल मिरची पावडर घाला.
शिजलेली डाळ घोटून घ्या. ती फोडणीत मिसळा. दाल परतून घ्या. त्यात कोमट पाणी घाला. तुमच्या आवडीनुसार पातळ करा. चवीनुसार मिठ घाला. झाकण लावून खळखळून उकळून घ्या. नंतर एक तडका पॅन मध्ये एक् चमचा तुप जिर हिंग ठेचलेला लसूण घालून चुरचुरीत फोडणी दाल वर घाला. आवडत असल्यास वरुन किंचित कोथिंबीर घाला.

बाटी बनवण्यासाठी कणकेचे छोटे गोळे करून घ्या. मोदकाच्या परी प्रमाणे पारी करा. आतल्या बाजूस थोड तूप लावा. पारी बंद करून घ्या. म्हणजे मध्ये एक पोकळी तयार होईल. एका अप्पे पात्रात थोड तूप किंवा तेल घाला. त्यात तयार बाटी शेकून घ्या. अलटी पलटी करून शेकून घ्या. बदामी रंगावर शेकून घ्या.
याच्या सोबत तिखट लसूण चटणी छान लागते.
आठ दहा लसूण पाकळ्या घ्या. चार सुक्या लाल मिरच्या भिजवून घ्या. लसूण आणि मिरची एकत्र ठेचून घ्या. कढईत थोडे तेल गरम करा. त्यात हे वाटणं परतून घ्या.
आठ दहा लसूण पाकळ्या घ्या. चार सुक्या लाल मिरच्या भिजवून घ्या. लसूण आणि मिरची एकत्र ठेचून घ्या. कढईत थोडे तेल गरम करा. त्यात हे वाटणं परतून घ्या.
दाल बाटी सर्व्ह करताना बाटी तुपात घोळून घ्या. गरम गरम दाल आणि कुरकुरीत बाटी वरुन साजूक तुपाची धार. तिखट आवडत असल्यास सोबत लसणाची चटणी.एकदम झक्कास.
मी मूग आणि तूर डाळ वापरून दाल बनवली आहे. तुम्हीं तुमच्या आवडीनुसार हरभरा डाळ मसूर उडीद डाळ वापरून देखील अशी दाल बनवू शकता.
तुम्ही दाल बाटी कशी बनवता ?
कमेंट मध्ये सांगा.
कमेंट मध्ये सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा