ईरा रेसिपी लेखन स्पर्धा
डाळिंबाची कोशिंबीर
साहित्य:- १ मध्यम आकाराचे डाळिंब,चार ते पाच हिरव्या मिरच्या , अर्धा वाटी दही, किसून घेतलेली काकडीच अर्धी वाटी, छोटे २ चमचे साखर आणि चिमूटभर मीठ(दोन्ही पर्यायी)
कृती:-
१)सर्वात आधी डाळिंबाचे दाणे १ वाटीभर काढून घ्या.नंतर दही थोडे एकसारखे फेटून घ्या.
२) त्यानंतर डाळिंबाचे दाणे,दही आणि किसलेली काकडीची एक वाटी एकत्र करून त्याचे एक मिश्रण करा.
३) त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाका. चमच्याने पुन्हा सर्व एकजीव करा.
४) साखर आणि मीठ जर तुम्हाला त्यात टाकायचे असेल तर दोन छोटे चमचे साखर आणि थोडे मीठ त्यात टाका. डाळिंबाची कोशिंबीर तयार झाली.
अगदी झटपट होणारी ही डाळिंबाची कोशिंबीर लगेच बनवून तयार होते.
वरती सांगितलेली कृती ही सैंधव मीठ वापरल्यास उपवासासाठी सुद्धा उपयोगी येते.
तेच जर उपवास नसेल तर त्यात बारीक केलेली कोथिंबीर ,कांदा आणि टोमॅटो तसेच थोडी धना-जिरेपूड आणि तिखट हवे असल्यास थोडा लाल मसाला टाकू शकता.
ही कोशिंबीर बनवताना एकच काळजी घ्यायची की,बनवल्यानंतर ती जास्त वेळ ठेवायची नाही कारण काही वेळाने काकडी आणि दही त्यातून सुटणारे पाणी ह्यामुळे मिश्रण पातळ होते. त्यामुळे ज्या वेळेस खायची असेल तेव्हाच लगेच बनवावी.
थोडीशी चवीला आंबट,गोड आणि तिखट असणारी ही वेगळी कोशिंबीर चविष्ट आणि आरोग्यदायी आहे.