एक भीषण वास्तव!

The government has cancelled some exams that means, there is a big reality behind that we all know. We are aware that whatever this is happening in the world, India is very dangerous.

सरकारने काही परीक्षा रद्द केल्या अर्थात त्या मागे मोठं वास्तव आहे जे आपल्या सगळ्यांना माहित आहे. हे जे काही सध्या जगात,भारतात चालू आहे ते खूप भीषण आहे याची जाणीव आपल्याला झालीच आहे. आपली अर्थव्यवस्था कोलमडली हे सगळेच जण अनुभवताय पण फक्त अर्थव्यवस्था कोलमडली म्हणजे काय पडद्या मागच्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या. 

परीक्षा रद्द होणे, पुढच्या वर्गात घालणे हा जरी पर्याय आपण स्वीकारला असेल तरी हे सगळं नंतर आपल्याला च निस्तराव लागणार आहे. 

फाळणी नंतरच सर्वात मोठं स्थलांतर आज ह्या कोरोना च्या काळात होताना आपण बघतोय. किती तरी मजूर आपल्या गावाला निघून चाललेय आणि परत येणार नाही अस म्हणताय. आज च्या घडीला किती तरी काम अर्धवट पडलेय जिथे भविष्यात ह्या मजुराची गरज पडणारच आहे. याचा सर्वात मोठा फटका उदयॊगधंद्याला पडणार आहे. किती तरी बांधकाम अर्धवट आहे, कंपनी मध्ये किती तरी उत्पादन बाकी आहे

सर्वात जास्त समस्या हि तरुण वर्गाला उद्भवणार आहे किंबहुना तरुण वर्ग घरी बसून डिप्रेशन मध्ये जातो कि काय अस वाटायला लागलाय. साधारण २०-३५ वर्गातील लोक आज संकटात सापडले आहे काही नुकतेच पास आऊट झालेय त्यांचं settle होयच वय आहे, इथून पुढे सगळं च उशिराने होत जाणार. 

जरा त्यांच्या दृष्टीने विचार करून बघू, आधीच अर्थव्ययवस्था धासळली आहे त्यात नोकरी ची मारामार आधी पासून आहे. ज्यांना आज नोकरी आहे ती उद्या असेल च याची शाश्वती नाही. कंपन्या बंद पडायच्या मार्गावर आहे. भले इतर खर्च कमी करु पण खायला तर लागेलच ना. या सगळ्या मध्ये चोऱ्या वाढल्या नाही म्हणजे मिळवलं. शेतकऱ्याची सुद्धा तीच अवस्था, जरी आज भाजीपाला असेल पण ज्या काळात पेरणी व्हायला हवी होती ती १००% पूर्ण झालीच नाहीये. नंतरच्या काळात पीक कुठून येणार? सगळं अवघड होऊन बसलय. कुणाच्याच हातात काही नाही. 

फक्त तरुण वर्गाला एक विनंती बाबानो डिप्रेशन मध्ये जाऊ नका