दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 13
मागील भागात आपण पाहिले एली आणि सुलभाताई यांचे छान जुळले होते. आशुला हळुहळू परिस्थितीची जाणीव होत होती. पूर्वा मात्र संभ्रमात होती. सुबोध अखेर रॉनीबद्दल माहिती मिळवण्यात यशस्वी झाला होता. आता पाहूया पुढे.
सुबोधने रॉनीबरोबर मैत्री केली. गेले पंधरा दिवस त्याने रॉनीचे निरीक्षण केल्यावर त्याच्या लक्षात आले की काही जण त्याला जास्तीची रक्कम देत असत. त्याने याबाबत पुरावे जमवायला सुरुवात केली. शिवाय स्वतः सुद्धा रॉनीशी जवळीक वाढवली. एक दिवस जिम बंद होताना रॉनी आणि सुबोध दोघेच शेवटी राहिले.
"हे, व्हॉट्स अप? एनी स्पेशल टुडे?" रॉनी त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाला.
"नथिंग, यू नो आय एम अलोन नाऊ." सुबोध हसून म्हणाला.
"येस ड्युड, बट इट्स अ चान्स टू लिव्ह युअर फॅनटसी. इफ यु वॉन्ट कॉल ऑन माय प्रायव्हेट नंबर." रॉनी नंबर देऊन निघून गेला.
इकडे सुबोध हसला. त्याचे अर्धे काम झाले होते.
रॉनी घरी आला. त्याने मस्त तयार होऊन स्वतः चे काही क्यूट फोटो काढले आणि त्याबरोबर मॅसेज लिहिला,"माय एंजल, आय एम वेटींग. विदाऊट यू आय फील टू लिव्ह इन हेल. युअर लव्ह."
तो मॅसेज पाठवला आणि त्यानंतर त्याने लगेच दुसरीकडे फोन केला.
"टुडे पार्टी इज ऑन. वुई वॉन्ट फोर बॉईज ओन्ली. बिकॉज ऑफ कस्टमर डिमांड."
फोन ठेवून तो स्वतः तयार व्हायला गेला. रॉनी अनेक कोवळ्या वयातील मुलामुलींना फसवून त्यांच्याकडून सेक्स पार्टीज मध्ये काम करून घेत असे. बदल्यात त्याला प्रचंड पैसे मिळत.
गेले कित्येक महिने काही कस्टमर भारतीय मुलगी मागत होते. नेमकी आशू निघून गेली होती. तर किमान वेबकॅमवर काही मिळवायचे त्याने ठरवले होते .
इकडे भारतात आशुने त्याचा मॅसेज पाहिला.तिला प्रचंड आनंद झाला. तिने त्या बदल्यात स्वतः चे काही सुंदर फोटो त्याला पाठवले. प्रोजेक्ट सुद्धा छान चालला होता.अनेक व्हिडिओ,स्केचेस,फोटो आणि स्वतः मिळवलेली माहिती यांचे संकलन आशू करत होती.
तेवढ्यात पुर्वाने आवाज दिला,"आशू,एली बाहेर या. मी तुमच्यासाठी खास मोदक घेऊन आले आहे."
दोघीही धावत बाहेर आल्या. मोदकांचा सुंदर सुवास पाहून एली प्रचंड उत्साहित झाली.
"वॉव,किती छान स्मेल येतोय. पूर्वा लवकर दे खायला." एलिला धीर धरवत नव्हता.
पुर्वाने त्यांना दोघींना मोदक दिला. दोघींनी हाताचा मोर करून तिला छान असे सांगितले.
"पूर्वा, काल आजी आणि मी तुला एका मुलाशी बोलताना पाहिले. कोण होता तो मुलगा?" आशुने मोदक खाऊन झाल्यावर प्रश्न विचारला.
"कृष्णा, त्याने मला काही विचारले आहे." पुर्वाच्या डोळ्यात पाणी होते.
"पूर्वा,डोन्ट क्राय. तुला काय म्हणाला तो?" एलिने तिला समजावले.
"त्याला मी आवडते,त्याचे माझ्यावर प्रेम आहे." पुर्वाला सांगताना अपराधी वाटत होते.
"हाऊ स्वीट! मग रडायला काय झाले? तुला आवडत नाही का तो?" एली म्हणाली.
" एली, आशू अग मला तो आवडतो. इतकेच पुरेसे नाही. ह्या वयात मी हे सगळ करत राहिले तर माझी अशी जी स्वप्न आहेत ती कधी पूर्ण करणार?" पुर्वाने शांतपणे उत्तर दिले.
"करिअर होईल ग. पण कोणीतरी आपले स्पेशल आहे. शिवाय त्याचा स्पर्श केअर सगळे मस्त वाटते."आशू बोलत सुटली.
"आशू,अग आता तरी शहाणी हो. विल्माचा जीव गेला. मी आज केवळ आंटी होत्या म्हणून जिवंत आहे. सेक्स इज नॉट एव्हरीथिंग." एली दुःखाने बोलली.
"अगदी बरोबर एली. अग ह्याच आपल्या गावात दोन वर्षांपूर्वी सुवर्णा ताईने जीव दिला." पूर्वा म्हणाली.
"पूर्वा,ही सुवर्णा कोण आहे? काल अनिताचे डॅड पण असेच काहीतरी म्हणाले. आण्णा आजोबा संध्याकाळी सांगतो बोलले."आशू जरा चिडली होती.
"मलाही जास्त माहीत नाही. आण्णा आजोबा सांगतील संध्याकाळी."पूर्वा विषय टाळून निघून गेली.
संध्याकाळी अनिता,सुनंदा, पूर्वा तिघी विजयाताईंकडे अभ्यासाला आल्या. पोरी छान समजून घेत होत्या. त्यामुळे विजयाताई उत्साहाने शिकवत होत्या. शिकवणी संपत आलेली.
पाहून पूर्वा हळूच म्हणाली,"बाई,एक विचारू का?"
"विचार की! काही अडचण आहे का?" विजयाताई म्हणाल्या.
"ते आण्णा आजोबा आज काहीतरी सांगणार होते. गावात कुणीच आम्हाला नीट काही सांगत नाही. फक्त आमच्यावर बंधने घालतात. नक्की काय झाले होते." पूर्वा विचारत होती.
"आण्णा भाऊजी आता पोरींना आणि मलाही सांगा. नक्की काय घडले होते? कोण होती ही सुवर्णा?" विजयाताई म्हणाल्या.
"सुवर्णा सावंत. आपल्या गावातील खोतांची पोरगी. नावाप्रमाणे गुणांची खाण. केतकी वर्ण, शेलाटा बांधा आणि अभ्यासात प्रचंड हुशार. गावातील शाळेत प्रत्येक कार्यक्रमात सुवर्णा अग्रेसर असे. तिच्या आई वडिलांना तीच खूप अभिमान वाटायचा.
तर अशी ही सुवर्णा दहावीला गुणवत्ता यादीत आलेली सुवर्णा मोठ्या कॉलेजात शिकू लागली. गावातून एवढ्या पुढे जाणारी मुलगी म्हणून खूप कौतुक वाटायचे. पण अशातच एक दिवस सुवर्णा गायब झाली.
सगळ्या गावाने तिचा शोध घेतला परंतु कुठेही ती सापडली नाही. तीन दिवसांनी खालच्या वाडीतील विहिरीत बाळूला सुवर्णाचा मृतदेह दिसला."
आण्णा थांबले.
"पण ते तर आम्हाला पण माहित आहे. तिने जीव का दिला?" अनिताने विचारले.
"कॉलेजला जाता येता सुवर्णाची ओळख एका बड्या घरातील मुलासोबर झाली.
अल्लड, फुलपाखरी दिवस ते. सुवर्णा आणि तो मुलगा नको तितके जवळ आले.
पोरींनो निसर्ग काही गोष्टींच्या खुणा बाईच्या शरीरावर सोडतो. दुर्दैवाने त्यातून सुवर्णाला दिवस गेले.
त्या पोराने हात वर केले आणि एका सुंदर,हुशार आणि मनमिळावू मुलीचा असा करून अंत झाला.
प्रेम जरुर करा पोरींनो पण प्रेम आणि आकर्षण ह्यातील फरक ओळखायला चुकाल तर आयुष्य भरकटत जाईल."
आण्णा आजोबा थांबले तेव्हा त्यांच्या आणि मुलींच्याही डोळ्यात पाणी होते. तसेच त्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर काहीतरी निर्धार होता.
सुबोध पुरावे मिळवू शकेल का? पूर्वा काय निर्णय घेईल? एलीचे आयुष्य सावरेल का?
वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा