दप्तराविना शाळा
भाग-१
भाग-१
अनुने (अनन्या)बातमी ऐकली
टीव्हीवर अन् नाचु की उडू.धावतच आजी विणाकडे आली.
वीणा,"अगं हळू .पाय तर जमिनीला टेकू दे.काय आभाळ कोसळलं काय?अशी अगदी वारं कानात भरलेल्या वासरासारखी धावतोय.
पडशील ना."
अनु स्वतःभोवतीच गिरकी घेत,''आनंद पोटात माझ्या माईना...''
किती सांगु मी सांगु कुणाला आज आनंदी आनंद झाला...आज..."
वीणा विचार करत होती ," काय झालं आज स्वारीला ?खुषी ओसंडून वहातेय."
तिची अवस्था बघून वीणाला हसू आले.
तोच अनु "आज्जी... याहू..."
करत आजीला येवून बिलगली.

सहाव्या वर्गात गेलेली अनु नाचत उडत अत्यानंदाने आज्जीला कसे सांगू अन् कसे नाही अशा अवस्थेत सांगत होती,'' आज्जी आज्जी ,आता दर शनिवारी
दप्तराला सुट्टी,
खेळांशी गट्टी
आहे ना मज्जारज्जू आश्चर्याने तिच्याकडे बघत होती.ही काय सांगतेय म्हणून. कारण नेमक्या आज आजीने बातम्या ऐकल्याच नव्हत्या.

"अगं आज्जी ,
बघ आता आम्हाला वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीज शिकवतील शाळेत.नवनवीन ठिकाणी ट्रिपला नेणार आहेत म्हणे.माईंड गेम मज्जाच मज्जा.तू तुझ्यावरचे शिक्षण सांगायची तर मी म्हणायचे, "ई...मातीने हात भरवायचे.."
तर तू म्हणायचीस, " बाळा,त्यातूनच जीवनाचे धडे मिळतात.मग
तू मला घरी शिकवायचीस ना मातीचे खेळभांडे बनवायला.आंबा, पेरु,वांगं फळं बनवायला पण शिकवायचीस. वर्तमानपत्राच्या कागदातून बोट विमान, कमळाचं फुल करायला शिकवायचीस.पेपरची भिंगरी,दोन रंगी चटई अजून काय काय ... मग मला हेवा वाटायचा तुझा.तुमची शाळा किती छान होती.होमवर्क नाही.मस्त खेळा बागडा हुंदडा.
आजी माहित आहे मी रोज देवाजवळ प्रार्थना करायची 'अशी शाळा मला मिळू दे'
आज्जी तू म्हणतेस ना गं आपण मनापासून प्रार्थना केली की देव ऐकतो म्हणून. माझं ऐकलं बघ देवानी.आता दर शनिवारी दप्तराला सुट्टी.
आता शाळेत शिकवणार आम्हाला हे सर्व. अजून नवीन काही काही शिकवतील.मग मज्जा येणार. याहू...''

विणालाही हायसं वाटलं तिची खुषी पाहून .तिच्या चेहर्यावरचा आनंद
पाहून वीणाही सुखावली.
पाहून वीणाही सुखावली.
"किती सुखावलं गं माझं पिलु.
एक दिवस का होईना लेकरांचा भार हलका केला त्याबद्दल शतशः आभार मानेन गं मी."
'देर आये दुरुस्त आये'
"पण पिलु फक्त एक दिवसच का? रोजचेच या कोवळ्या पाठीवरचे ओझे थोडे हलके झाले तर जास्त आनंद होईल ना गं बाळा.
पेलवेल एवढं ओझं ठीक असतं नाहीतर कोवळं बालपण कोमेजतं.''
आमची पिढीपण शिकली.मोठमोठ्या हुद्द्यावर पोहोचली.संशोधन क्षेत्राला गवसणी घातली.प्रगती केली.विकासही साधला.पण आज...
आजची विकासाची वाट विनाशाच्या अंधारी बोगद्यातून जातेय. याचे परिणाम आज नाही उद्या जाणवतील. जेव्हा पुढच्या पिढीला चाळीशीतच म्हातारे वाटायला लागेल तेव्हा.काय ती चढाओढ,स्पर्धा.खेकड्यासारखे एकमेकांचे पाय ओढायला टपलेत.
एकमेकांचे कौतुक तर विसरलेत पण नुसता एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न.परस्परांविषयी आकसबुद्धी. या बालवयातच बीजारोपण होतेय गं याचं.मग आयुष्यभर तेच.हे सर्व बघितले की मीच कासावीस होते.तुझं बालपण करु नये म्हणून मी करते माझा खारीचा प्रयत्न पण कमी पडते गं..."

अनु आजीला म्हणाली," आजी तू मला रोज दोन जिने उतरून सोडायला येते अन् परत रोज मला घ्यायला येते.जिन्यावरून चढ उतर करतांना रोज तुच माझे दप्तर पकडते.माझी स्कूलबस आली की.माझं दप्तर घेऊन तुच तिथवर येते. तुला वाटतं माझ्या पिलुचा भार हलका करावा.आई तुला म्हणते सुद्धा,'' घेऊ देत नं तिला.सवय व्हायला हवी.नाहीतर ऐदी बनेल.आपलं आपण न्यायचं हे कळायला हवं तिला."
तर तू म्हणते ,'' होते गं सवय आपोआप. काय त्या इवल्या पाठीवर ते जीवापेक्षा जास्त ओझं बघवत नाही मला.त्यांची हाडं कोवळी असतात.पुढे मान- पाठीचे विकार जडतात."
आजी,तुझं ऐकलं बघ त्यांनी.
आजी,तुझं ऐकलं बघ त्यांनी.
अनु तर अत्यानंदाने नाचत बागडत पसार झाली सगळ्यांना गुडन्युज द्यायला.मैत्रीणींना सांगायला.
हो सर्वप्रथम मी सांगितलं सगळ्यांना
त्याचंही क्रेडीट .
हो सर्वप्रथम मी सांगितलं सगळ्यांना
त्याचंही क्रेडीट .
पण विणाचे विचार चक्र कुठले थांबायचे. ते तर वेगाने पळत होते. तिचे मन तर भूतकाळात चक्क शाळेतल्या पट्टीवर जाऊन बसून आले. दगडी पाटीवर अआई लिहून आले. क्रीडांगणावर खेळून आले.
सगळ्या आठवल्या कुंदा,मंदा,शालू, मालू.
मैत्रिणींशी कट्टीबट्टीही करून आले.
ते मोरपंखी दिवस कधी पुसल्या जाणार होते का मनःपटलावरून ?
दप्तर म्हणजे एक कापडी थैली.त्यात पाटी लेखन एखादे पुस्तक बस.
पाणी शाळेतच चपराशी मावशी भरायच्या.बाटलीचं ओझं नाही.
शाळेतच बाई शिकवायच्या आणि अभ्यासपण करून घ्यायच्या.होय बाईच, आता सारखं मॅडम टीचर नव्हतं.बाई शब्दातच किती आपलेपण किती ओलावा होता.तो आजच्या टीचर मधे आहे का ?
कधी चुकलं अभ्यास असो की वागणुक तर धपाटा.
'छडी लागे छम छम विद्या येई घमघम'
मायबापही कधी गेले नाही का मारलं विचारायला.उलट अजून मारा म्हणत.पण आज एकुलतं एक लेकरु त्याला घरी न शाळेत कुठेच थप्पड माहितच नाही.
क्रमशः
बाकी भाग -२मधे
©®शरयू महाजन

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा