Login

डार्क डेथ भाग ६

Dark Web , Deep Web


डार्क डेथ

भाग ६

पूर्वार्ध:
शनिवारी किरणचे काही मित्र त्याचा घरी जमतात. ते लोकं एक चित्रपट बघत असतात. पण त्यांना तो आवडत नसतो. आणि तेजस त्यांना पोर्न व्हिडिओ बघण्याचे सुचवतो.

आता पुढे…


"पॉर्न व्हिडिओ बघुयात. मजा येईल." तेजस.

"माझ्याकडे तसले व्हिडिओ नाहीत." किरण.

"माझ्या मोबाईलमध्ये आहे दोन तीन. पण ते बघून बोर झाले. काय तेच तेच बघायचं? नवीन पाहिजे." समीर.

"थांबा, काही लिंक्स आहेत. त्यावरून बघू." म्हणत तेजसने व्हिडिओ लावले. सगळेजण लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून ते व्हिडिओ बघत होते.

५ मिनिटांनी….

"ओह शीट! बरोबर वेळेवर लिंक आऊट झाल्या. व्हिडिओ डाऊनलोड पण होत नाहीये. सबस्क्रिप्शन घ्या म्हणताय." तेजस म्हणाला.

"हा हा हा, याचं सबस्क्रिप्शन कोण घेतं?" समीर.

"घेत असतील. वड्डे लोगोकी वड्डी वड्डी बातें होती है. आपण तर नॉर्मल मूव्ही पण फुकटात बघणारे लोकं." तेजस हसू लागला.

"मी ऐकलेय, डार्क वेबवर खूप भारी भारी आणि हायफाय लोकांचे पॉर्न व्हिडिओ आहेत. बघुयात काय?" समीर.

"पण ती वेब सहजासहजी ओपन होत नाही ना?" तेजस.

"टोर ब्राउजर लागते. मी ट्राय केलेले. दोन स्टेज एनक्रीप्ट केल्या सुद्धा, पण तिसरी झाली नाही. तीस सेकंदात करावे लागते. टाइम आऊट झाले." समीर.

आता त्यांच्यामध्ये डार्क वेब बद्दलची उत्सुकता वाढली होती.

"किरण तू करू शकतो. तुझ्या हॅकिंग स्किल्स खूप स्ट्राँग आहेत." तेजस.

"अरे नको. जर चुकूनही माझ्या गर्लफ्रेंडला लॅपटॉपमध्ये पॉर्न व्हिडिओ दिसले तर माझा ब्रेकअप निश्चित आहे." किरण.

"पक्का फट्टू आहेस." समीर.

"राहवं लागतं बाबा. ब्रेकअप परवडणारं नाही." किरण हसत म्हणाला.

"बरं ऐक. तू जस्ट पेन ड्राईव्हमध्ये घेऊन ठेव. हे घे माझा पेनड्राईव. तुझ्याशिवाय हे काम कोणी करू शकत नाही. मस्त नवीन काहीतरी बघायला मिळेल." तेजस.

"बरं बघतो." किरण.

"ठीक आहे, मग करून ठेव. पुढल्या वीकेंडला पार्टी करूयात. मी ड्रिंक्स पण घेऊन येतो." समीर अती उत्साहात म्हणाला.

गप्पा आटोपून तेजस आणि समीर निघून गेले.


ते सगळं ऐकून राहुल आश्चर्यचकित झाला.


"डार्क वेबच्या आठ लेव्हल तू क्रॅक केल्या?" राहुल डोळे विस्फारत म्हणाला.

किरण सांगू लागला, "हो. तुला तर माहिती हॅकिंग म्हटले की मला किती उत्सुकता असते. मला त्या पॉर्न व्हिडिओ वगैरे मध्ये इंटरेस्ट नव्हता. पण मला त्या आठही लेव्हल क्रॅक करायच्या होत्या. त्यासाठी टोर ब्राउजरची गरज होती. ते मी इंस्टॉल केले. आणि मग माझी आयपी घोस्टींग सुरू केली. सर्व एनक्रिप्शन क्लिअर करत मी पुढे पुढे जात होतो. मला ते करणं काही कठीण जात नव्हते. मी ते खूप फास्ट करत होतो. आणि ते लवकर होतंय बघून माझ्यात पण जोश संचारत होता. मी खूपच हुशार आहे, असे मला वाटत होते. लास्ट लेव्हल पार केली तसे वेबसाईट ओपन झाली.

डिजिटल मार्केट सारखी ती विंडो दिसत होती. खुप सारे ऑप्शन्स होते. एक ऑप्शन ओपन केले तर तिथे खूप साऱ्या वस्तू होत्या. आणि त्यांची किंमत खुप म्हणजे खूपच कमी दिसत होती. माझ्या आवडीची वॉच, शूज सगळ्यांची किंमत अगदी फारच कमी होती. मी तिथे पैसे पे करण्याचे ऑप्शन्स बघितले. त्यात मला काही फॉरेन करन्सी दिसल्या. बीटकॉइन्सचे पण ऑप्शन होते.

ते बघून माझी क्युरिऑसीटी आणखी वाढली. मी अजून बाकी ऑप्शन्स ओपन केले. ते बघून तर मी शॉक झालो. तिथे ड्रग्स, हत्यार हे सुद्धा होते. ड्रग्सच्या किमती बघून तर माझे डोळे फिरले. ते बघून एवढे मात्र कळले की हे सामान्य लोकांना परवडणारे नाही. इथे श्रीमंत, पैसेवाले लोकच ॲक्टिव असतील. त्यानंतर मोठमोठ्या कंपनीजची कन्फिडेंशियल माहिती, फेक पासपोर्ट, व्हिसा, क्रेडिट कार्ड , बँक अकाऊंट डिटेल्स, हे सगळं सुद्धा उपलब्ध होते. मी आणखी डीपमध्ये जाऊ लागलो. तिथे स्त्री, पुरुष, लहान मुलांची विक्री म्हणजे मानव तस्करी पण होत होती. त्यांचा एक फुल फोटो आणि त्या सोबत त्यांच्या शरीराच्या एक एक अवयवांचे फोटो आणि शेवटी एक भली मोठी किंमत लिहिलेली होती. आणि जे जे मी बघत होतो ते सगळं बेकायदेशीर आहे हे कळत होते. ते सगळं बंद करून तेजस समीरने सांगितल्या प्रमाणे मी डाऊनलोड करायला पॉर्न व्हिडिओ बघत होतो. तिथे पण खूप ऑप्शन्स आले होते. चाइल्ड पॉर्न बघून तर मी घाबरलो. ते बघता बघता कुठेतरी क्लिक झाले आणि अचानक एक विंडो पॉपअप झाली. त्यात दिसत असलेले दृश्य खूप भयानक होते."


एका व्यक्तीला भिंतीला बांधून ठेवले होते. त्याच्या अंगावर अगदी नावासाठीच कपडे होते. बाजूला एका टेबलवर खूप अवजारे ठेवली होती. चाकू, ब्लेड, तलवार, बंदूक, स्क्रू ड्रायव्हर असे खुप अवजारे होती ज्यांची मला नावं सुद्धा माहिती नाहीत. त्या व्यक्तीच्या अंगावर चाकूने, ब्लेडने केलेले काही घाव दिसत होते. त्यातून रक्त सुद्धा वाहत होते आणि तो वेदनेने विव्हळत, तडफडत होता.

खाली काही छोट्या छोट्या विंडोज पॉपअप होत होत्या. त्यातून काही लोकांचे मेसेजेस येत होते. ती लोकं ते सगळं एन्जॉय करत होते, असे त्या मेसेजेस मधुन दिसत होते. त्या मेसेजेस मधुन त्या बांधलेल्या व्यक्ती बरोबर काय करायचे, त्याचे आदेश येत होते. बहुतेक ते सगळं लाईव्ह सुरू होते. ही बहुतेक ती रेड रूम होती. ज्या बद्दल ऐकून होतो.
थोड्या वेळाने त्या रूममध्ये एक मास्कधारी व्यक्ती आली.

"मला सोडा, जाऊ द्या." तो (भिंतीला बांधलेला) त्या मास्कधारी व्यक्ती समोर रडत रडत खूप विनवणी करत होता. पण त्याचा रडण्याचा, त्याच्या विनवणीचा त्या मास्कधाऱ्यावर काहीही परिणाम होत नव्हता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती व्यक्ती समोर असलेल्या लॅपटॉपमध्ये बघू लागली.

कॉमेंट सेक्शनमध्ये उजर्सनी आदेश द्यायला सुरवात केली. आणि प्रत्येकाच्या मागणी पुढे काही बिट्सकॉइन दिसत होते. ज्याची रक्कम जास्त, त्याची इच्छा पूर्ण केली जात होती.

"केस उपटले जावे."
अशी रिक्वेस्ट आली. तसे त्या मास्कधाऱ्याने बांधलेल्या व्यक्तीचे हातांनी केस उपटायला सुरवात केली.

"दोन्ही हाताचे अंगठे हवे." दुसरी रिक्वेस्ट आली. त्यापुढे ५०० बिट्सकॉइन दिसत होते.
मास्कधाऱ्याने बाजूला असलेला चाकू उचलला आणि त्या बांधलेल्या व्यक्तीचे दोन्ही अंगठे कापले. तो वेदनेने किंचाळत होता. ते बघून इकडे कॉमेंट्स सेक्शनमध्ये लोकं त्यावर कॉमेंट्स पास करत, खूप मजा करत होते.

"त्याचा आवाजात आणखी वेदना यायला हवी." त्यापुढे ६५० बिट्सकॉइन दिले होते. मास्कधाऱ्याने स्क्रू ड्रायव्हर हातात घेतला. भिंतीला बांधलेला व्यक्ती जीवाच्या आकांताने ओरडत होता.


आता त्या स्क्रीनवर एका कोपऱ्यात पुरुषी अवयवांचे फोटो आले होते. त्याचा बाजूला अवजारांचा फोटो त्यात ब्लेड, चाकू, बंदूक, मानवी दात असे ऑप्शन्स दिसत होते. त्या प्रत्येक फोटोच्या खाली एक खूप मोठी किंमत लिहिलेली होती. उजर्सने खूप भयानक अशी यातना आणि दात हे अवजार म्हणून निवडले होते.

मला ते बघावले जात नव्हते. ते सगळंच अमानवी होते. ती लोकं त्या व्यक्तीला त्रास व्हावा म्हणून इतकी भरमसाठ रक्कम मोजत होते. एव्हाना भिंतीला बांधलेल्या व्यक्तीचा जीव गेला होता. तरीसुद्धा या लोकांचे मन भरले नव्हते. अजूनही त्यांच्या रिक्वेस्ट येत होत्या. आणि मास्कधारी ते यंत्रवत पूर्ण करत होता. ते जे काही घडत होते ते फार राक्षसी वाटत होते. ती खूप विकृत डोक्याची लोकं वाटत होती. मला पुढे तर काहीच पहावले जात नव्हते. आणि मी त्यातून एक्झीट करण्याचा प्रयत्न करत होतो. मी वारंवार त्या विंडोला बंद करत होतो, एक्झीटवर क्लिक करत होतो, पण त्या व्हिडिओची विंडो बंद होत नव्हती. आणि माझे हे प्रयत्न सुरू असताना स्क्रीनवर एक मेसेज आला.