डार्लिंग डॉट कॉम : भाग ५
ते पाच दिवस उलटून गेल्यानंतर काही महिन्यांनी सौदामिनी डिप्रेशनमध्ये जाऊ लागली.
मुंबईत राहणाऱ्या प्रतिष्ठित गृहमंत्री संजना सांगळे यांच्या जाऊबाई सौदामिनीच्या अचानक झालेल्या बदलामुळे संजना खूपच चिंतेत होती. सौदामिनी नेहमी हसतमुख असायची, परंतु काही दिवसांपासून ती आजारी पडली होती, कोणाशीही बोलत नव्हती आणि नैराश्यात बुडून गेली होती. संजनाच्या मनात विचार येऊ लागला की, घरात आलेल्या सुदर्शन गुरुजींच्या पूजेने काहीतरी काळं जादू केलं असेल.या गुरुजीला शोधायला हवं आणि खरं काय ते कळायला हवं.
संजना: "सौदामिनी, तू अशी अचानक का बदललीस? तुझ्या मनात काय चाललं आहे ते मला सांग."
सौदामिनी: "काही नाही, वहिनी. फक्त जरा तब्येत बिघडली आहे."
संजना: "तुझ्या तब्येतीत एवढा अचानक बदल कसा झाला? मला काहीतरी गडबड वाटते."
संजना विचारात पडली होती आणि तिने लगेच इन्स्पेक्टर राघवला फोन केला.
संजना: "हॅलो, राघव. मला तुझी मदत हवी आहे. माझ्या जाऊबाई सौदामिनीची तब्येत अचानक बिघडली आहे. मला संशय आहे की मागील महिन्यात एक गुरुजी आमच्या घरी पाच दिवस पूजेला आले होते , घरात आलेल्या त्या गुरुजींनी काहीतरी काळी जादू केली असेल."
राघव: "संजना मॅडम, तुम्ही काळजी करू नका. मी लगेच तपास सुरू करतो,मला त्या गुरुजींचा पत्ता द्या."
राघवने गंगाला लगेच संपर्क केला, जी आता नाशिकमध्ये पोलिस चौकीत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती. गंगाला खूप आनंद झाला ,या कारणामुळे तरी राघव आणि गंगा आता काही दिवस तरी सोबत असतील.
राघव: "गंगा, मला तुझी मदत हवी आहे. एका महत्त्वाच्या प्रकरणात मला तुझ्या अनुभवाची गरज आहे."
गंगा: "राघव, लवकर ये इकडं..मी वाट पाहतेय, आपण एकत्र काम करू."
राघव नाशिकला पोहोचला आणि गंगाशी भेटला. दोघांनी सुदर्शन गुरुजींच्या तपासासाठी काम सुरू केलं. गंगाने गावातल्या लोकांशी बोलायला सुरुवात केली आणि सुदर्शन गुरुजींच्या कार्याचा अनुभव घेतला.पण एकाही व्यक्तीने गुरुजींबद्दल काही वाईट सांगितलं नाही, म्हणून गंगा खुद्द गुरुजींशी बोलायला गेली.
गंगा: "गुरुजी, तुमचं कार्य खूप प्रभावी आहे. तुम्ही लोकांना खूप मदत करता."
सुदर्शन: "धन्यवाद, बाई. हे सगळं भगवंताच्या कृपेनेच शक्य आहे."
सुदर्शनशी सविस्तर बोलून झाल्यानंतर गंगाला सुदर्शनच्या वागण्यात काहीच संशयास्पद वाटलं नाही. ती परत राघवकडे आली.
गंगा: "राघव, मला गुरुजींच्या वागण्यात काहीच संशयास्पद वाटलं नाही. ते खूप साधे आणि धार्मिक व्यक्तिमत्व आहेत."
राघव: "गंगा, आपल्याला अजून तपास करावा लागेल. मला वाटतं की सौदामिनीच्या आजाराचं मूळ काहीतरी वेगळंच असावं."
राघव आणि गंगाने सुदर्शन गुरुजींवर नजर ठेवायला सुरुवात केली. त्यांनी पाहिलं की, गुरुजी विविध गावांमध्ये पूजेसाठी जात आहेत. त्यांनी कित्येकदा लांबून लांबून आलेल्या पूजांचे निमंत्रण स्वीकारले होते. याशिवाय, एक-दोन वेळा त्यांनी इतर धर्मीयांच्या घरीही पूजा केली होती. यामुळे राघव आणि गंगा अधिकच संभ्रमात पडले.
राघव: "गंगा, हे खूप विचित्र आहे. एक ब्राह्मण गुरुजी इतर धर्मीयांच्या घरी पूजा करायला का जातील?"
गंगा: "मला वाटतं की, आपण याचा सखोल तपास करायला हवा. गुरुजींच्या हालचालींवर बारीक नजर ठेवूया."
काही दिवसांनी त्यांनी सौदामिनीचा फोन तपासला आणि तिच्या चॅटमधून गुरुजींच्या दुसऱ्या रूपाबद्दल माहिती मिळाली. गुरुजींचं वेगवेगळ्या गावांमध्ये सतत जाणं आणि इतर धर्मीयांच्या घरीही पूजा करणं याचं खरं कारण आता राघव आणि गंगाला कळलं होतं.
गंगा : च्यामारी धोतरात गोंधळ आहे होय ह्या गुरुजींच्या, लोकासांगे ब्रम्हज्ञान पण स्वतः मदमस्त पाषाण..
राघव (हसून ): काहीही बोलतेय तू, या सुदर्शनला तोंडावर पाडावच लागेल आपल्याला.
राघवने आणि गंगाने एक ट्रॅप रचून गुरुजींना डार्लिंग डॉट कॉम साईटवरून भेटायला बोलावलं.
गंगा: "गुरुजी, मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे. कृपया तुम्ही मला या ठिकाणी भेटा."
सुदर्शन: "बाई, मी तिथे येईन. तुमचं मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमी तयार आहे.मार्गदर्शन झाल्यावर तुम्हाला स्वर्ग दाखवतो काय असतो ते"
गुरुजींचा हा मेसेज पाहून गंगा रागात राघवला म्हणाली की," मला स्वर्ग दाखवणार होय, येऊ दे या गुरुजीला त्याला सगळे मंत्र आठवायला लावते मी उलटा पाडून, तसं जर नाही झालं तर मीही स्वर्गातील अप्सरा गंगा नाही "
"अप्सरा होय ? "राघव गंगाकडे पाहून हसत हसत बोलत होता.
गुरुजी ठरलेल्या ठिकाणी आले, तिथे राघव आणि गंगा आधीच लपून बसले होते. त्यांनी गुरुजींना पकडण्याची योजना तयार केली होती. गुरुजी आले आणि गंगाशी बोलू लागले.
सुदर्शन: "बाई, तुम्ही मला का बोलावलं?"
गंगा: "गुरुजी, मला माझा बॉयफ्रेंड खुश नाही ठेवत मला मदत कराल का"
सुदर्शन: " अगं वेडे मी त्यासाठीच तर आलोय "
गुरुजी एक एक करून कपडे काढू लागले ,आता फक्त अंडरवेअर वर गुरुजी होते .गुरुजी गंगाच्या जवळ आले ,ते डोळे मिटून गंगाच्या गालावर ओठ टेकवणार तोच गंगाने जोरदार कानाखाली मारून गुरुजींचा गाल लाल केला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा